रविवारी ठरल्या वेळेत आम्ही निघालो. आमंत्रण पत्रिका सोबत घेतली होतीच. नवी मुंबईत पत्ता शोधणं तस फार कठीण नाही. सेक्टरच्या हिशेबात वसलेल हे उपनगर झपाट्याने विस्तारतय, पत्रिकेत नमूद केलेल्या पत्त्यावर आम्ही पोहचलो. प्रशस्त मोठ्या गेट मधून गाडी आत गेली. समोर थक्क करणारं ल्याविश complex उभं होतं. सुखवस्तू म्हणजे काय हे पाहताच क्षणी कळाव अस काहीसं हे ठिकाण. गाडी पार्क करून आम्ही C विंग च्या दिशेने वळलो. entrances गेट वर सो कॉल expensive फुलांची सजावट होती. स्वागताला स्मार्ट लूक मधले attendant होते. स्मिताने गाडीतून उतरण्यापूर्वी चेहऱ्यावर पुन्हा एकवार मलमली कापसाने पावडरचा एक थर चढवला होताच पण तरीही आणि एकदा खात्री करून घेण्याकरिता पर्स मधल्या आरशाने चेहरा तपासून घेतला. गळ्यातलं मंगळसूत्र पुढे काढत डाव्या हाताने केसांच्या बटा सेट केल्या. मधेच माझ्याही केसांना वळण देत अहो तो शर्ट नीट इन करा , घाम पुसा आधी , बुटाची लेस सुटलीय अशा अनेक सूचना ऐकवत आणि त्या सुधारत एकदाचं छबी मावशीचं घर आलं . दारात चपलांचा गोतावळा जमा झाला होता. अनेक ओळखीचे नातेवाईकहि दिसले.त्या गर्दीत मावशी मात्र कुठे दिसत नव्हती . काही वेळात आम्ही तिथल्या माणसांत मिसळलो आणि कुणी तरी सागितलं छबी मावशी त्या पलीकडच्या रूम मध्ये आहे. या इतक्या मोठ्या घरात वावरतांना थोडं गांगरून जायला होई . १ bhk ची सवय झालेले आपण अशा आलिशान घरात भेदरनारच. मावशीच्या रूम मध्ये हि भारी फर्निचर होतं डबल बेड मोठा LCD tv आणि इतर बऱ्याच गोष्टी ………. आज इतका आनंदाचा दिवस पण मावशीच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेशही दिसत नव्हता. मी जवळ जाऊन विचारलं कशी आहेस बरं नाहीये का तुला ? नाही रे हल्ली गोंधळात गेलं कि मन सैर भैर होतं . मी फार खोलात न विचारता स्मिताला मावशी साठी आणलेली साडी द्यायची खुण केली . साडी स्वीकारतांना तिचे डोळे पाणवले अर्थात तिच्या साठी माझी साडी खास असणार मी तसाही तिचा लाडका पडतीच्या काळात मावशीला आईने सावरलं ती का नाही आली त्याची चौकशी तिने केलीच. आम्ही निघतो म्हणत मावशीला नमस्कार केला. अरे जेवून जा ना अशी गळ मावशीने घातली पण अजून बऱ्याच विधी बाकी होत्या आणि स्मिताच्या मैत्रिणीकडेहि जायचं होत. तिने जेवणाचा बेत केला होता. तसही छबी मावशी सोडली तर बाकी तिच्या घरच्यांना कोण आलय गेलंय त्याचं काही पडलं नव्हतं ते त्यांच्या हाय क्लास मध्ये वावरत होते. आणि आम्ही पै पाहुणे आमच्या प्रत्येकाच्या क्लास मध्ये स्वागता पासून ते चहापाणी पाजण्या पर्यंत सगळ्यासाठी भाड्याची माणसं होती. आणि घरची मानसं मात्र शोभेच्या बाहुल्या सजवून उभ्या कराव्यात तशी निर्विकार पसरली होती. मला या वातावरणात गुदमरल्यागत झालं.
c wing च्या तळमजल्यावर लिफ्ट उघडली आणि स्मिता आणि मी दोघांनीही एक दीर्घ श्वास घेतला. स्मिता गाडीत बसता बसता अनेक तक्रारी करीत होती. हि काय वागण्याची पद्धत, इतका कसला पैशाचा माज , साधं हळदी कुंकू लावायला हिला वेळ नाही , कुणाला दाखवतायत पैशाची गुर्मी , यांच्या सारखं आम्ही गावातलं घर दार विकलं नाही. २० हजाराची साडी, १० - १२ तोळ्याचे दागिने , पार्लरचा मेकउपचा नखरा करणारी हीच ती माझ्या साड्या आणि दागिने उसने घालायला नेत असे . निदान माझ्या सोबत तरी तिनं अस वागायला नको होतं. …………. गाडीतला ac वाढवत. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला खरा पण स्मिता सहसा कुणावर एव्हढी चिडत नाही. पण आज तिचा राग आनावर झाला होता. साहजिक होती तिची प्रतिक्रिया मलाही तसाच काहीसा अनुभव आला. नेमही गळ्यात पडणाऱ्या महेश ने आज फक्त एक कोरडं हसू देत मला प्रतिसाद दिला. अभिनंदन केल्यावरही thanks या शब्दा खेरीज तो अधिक काहीच बोलला नाही. कदाचित त्याला त्याच्या आजच्या यशाने भुरळ घातली असावी. मीही फार मनावर घेतलं नाही. पण स्मिता मात्र यापुढे यांच्या कोणत्याच कार्यक्रमात आपण यायचं नाही इथवरच्या निर्णयापर्यंत पोहचली होती.
पूर्वी मिडल क्लास आणि लोवर क्लासच्या रेषेवर जगणारे आपण नवश्रीमंत या नव्या बोनस लाईनच्या आत गेल्यावर असे काही react होतो . त्याचा भडकपणा लगेच जाणवतो. गरज नसतांना केलेली पैशाची उधळपट्टी , बोलण्यात ,चालण्यात , वागण्यात आलेला नाटकीपणा, पैशाच्या जोरावर काहीही करू शकतो आंधळा आत्मत्विश्वास, आणि बरच काही ………
पण तसही मातीच्या भिंती सिमेंटने लीपल्या कि वाड्याचा- राजमहल होत नाही . आणि साजूक तूप टोपभर प्यायल्यावर लगेच राजबिंड होता येत नाही. हे कधी कळणार या नवाश्रीमंतांना ………
- संतोष टाकळे
पोस्ट काल्पनिक असली तरी यातले बरेच संधर्भ सत्य घटनेशी निगडीत आहेत .
