हवेत कशाला ११ थर "गिनीच" बुकात नोंदवायला . असा रेकॉर्ड केला कि ते "गिनीच" बुकवाले थरातल्या प्रत्येकाला सरकारी नोकरी देतात का ? मुळात तुम्हां तमाम मंडळाच्या पोरांनी गेल्या काही वर्षात स्वतःच्या जीवावर बेतून ……………राजकीय भाऊ - दादांना करोडपती बनवलंय हे लक्षात घ्या …. …………. लाखात बक्षिसं देणारे हे भामटे या उत्सवात करोडोंची उलाढाल करून आपली बोचकी बांधतात हे कधी कळणार आपल्याला ………. भाऊनसाठी आपण काय पण करून यंदा ९ थर लावणारच असा संकल्प करणारा दुसऱ्या दिवशी KEM च्या खाटेवर आडवा असतो . ……………………… त्याला लीलावती किंवा हिंदुजात का बरं उपचार मिळत नाहीत . ………………. दिवसभर किमान ५-६ वेळा कपडे बदलत भाऊ जेंव्हा मोठाल्या स्टेज वर सेलिब्रिटीसोबत ठुमकत असतो . तेंव्हा त्याचा घाम पुसायलाहि ब्रांडडेड टिशू ………आणि आपण मात्र चिखलात लोळत इतक्या थराला तितके रुपये देणाऱ्या हांडी च्या शोधत फिरत असतो. ……………. प्रसंगी न्यायालयाचा अवमान करीत तिच्या आईला बघतोच आता कोण आडवंतय आम्हाला हा नेमका कशाचा माज …………………तर काहींनी यावरहि डोकं लावीत दही हांडी साहसी खेळ म्हणून जाहीर करा अशी मागणी केली . अर्थात बसल्या जागेवर एका दिवसात रग्गड कमवून देणारं दुकान बंद पडायची वेळ आली तर एव्हडी फडफड होणारच ……………नाहीतर दहीहांडी वर बहिष्कार टाका अशी गोविंदा पथकांची टाळकी फिरवणारे काही राजकीय नेतेच मुख्य आयोजक आहेत / होते (काहींनी आजच आपला ठेला उचललाय ) . अरे पण ते कोवळं पोर जेंव्हा इतक्या उंचीहून खाली निसटत तेंव्हा त्याच्या आईच्या काळजात कसली उसळी भरत असेल याचा वेध कुणी घेतलाय का ? …………एकीकडे आपण कृष्णजन्माचा गोपाळकाळा करीत उत्सव घालतो आणि दुसरीकडे त्याच बाळकृष्ण स्वरूपाला जिंदगी- मौत के खेलमैं दावावर लावतो. विकृत आहे हे सारं ……………………अरे मान्य आहे ना हा आपला मराठमोळा सण आहे. पण याच सणाला पॉलीटिकल भाऊंनी हाय ज्याक केलंय आणि दिवसभर LIVE कव्हरेज देणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी त्याला लोकप्रियतेच्या hype वर नेलंय . आता सामाजिक भान आल्यागत घसा फोडून कोकलणाऱ्या माध्यमांनीच या गल्लीतल्या भाऊच्या हांडीला एक्ट्रा स्पेस देत international BIG NEWS केलंय हे Ignore करता येणार नाही. .
पूर्वी चाळी - वळीत खेळला जाणऱ्या गोविंदाच्या टोळीत अपघात होतंच नव्हते असा युक्तिवाद कोणी केला नाही आणि करणार देखील नाही . पण त्यावेळेस हा निव्वळ सण होता . नाक्यावर लटकणारी मटकी फोडण्याचा निखळ आनंद घेण्याचा …………एकमेकांच्या कंबरेत हात घालीत खालू बाज्यावर बेधुंद होत नाचण्याचा . तेव्हाच्या लोकांना बेभान व्हयला आता सारखा ओह्ह एस कमॉन म्हणीत उड्या मारणारा हनी सिंग लागत नव्हता . त्यांच्या रक्तातच तो जोश सळसळत असे . …………………काही असो पण यंदा "नो बाल गोविंदा" हि मोहीम फत्ते झालीच पाहिजे . ढाकू -माकूम बाज्यावर यावर्षी चाळीसमोरच कल्ला करूया कि …………दह्या दुधानी भरलेल्या हंड्या दोन तीन थर रचित आपल्या आपणच फोडूया ना भावा………………. आपल्या मंडळाच्याच पोरांनी वर्गणी काढून एकत्रच जेवण मागवूया कि ……………लय धम्माल घालू ………………आपल्याच घरासमोर …………………त्या ५ -१० हजारच पाकीट घ्यायला भिकाऱ्या सारखं कशाला कुणाच्या दारात जायचं ……साला आपली बी काय लेवल हाय का नाय …………बाकी संस्कृतीच्या नावावर अर्निंगइवेंट करणाऱ्यांना बसुद्यात बोंबलत आपल्या बापाचं काय जातंय .
© संतोष टाकळे

No comments:
Post a Comment