दवाखान्यातला उग्र वास आणी तब्बल ४० एक नंबर वासंती आधीच उलट्या करून बेजार झालेली. तिला घेवून कदमाची प्रभा मिसाळाच्या खासगी रिक्षातून आलेली. आत डॉक्टर बाई पेशंटला तपासात होत्या. शिवाय आज शनिवार आठवडा बाजाराला बाया आल्या कि गोळ्या
अवषद घ्यायला पटवर्धन बाईच्या दवाखान्यत डोकावून जातात आठवड्याचा हा सर्वात जास्त पेशंट असलेला दिवस तरीही तशा चार पोरी कामाला होत्या नर्स म्हणून पण कधी कधी त्यांची तारांबळ होई , डॉ. मुक्ता पटवर्धन तसं नवीन नाव असलं तरीही कमी वेळात गाजलेलं पंचक्रोशीत सध्याच्या घडीला बाई फारर्मात होत्या अनेक गुंतागुंतीच्या केसेस डॉ. मुक्ता पटवर्धन यांनी सोडवल्या होत्या . मागे एकदा किश्या सोनाराची सून अडली . जुन्या जाणत्या सुयनीने हात टेकले पण डॉ. पटवर्धन बाई आल्या आणि बाळंतीन सुखरूप सुटली. आड गावातल्या बाया सकाळीच ८ ला येवून लायनीत बसत त्या उगाच नाही बाईच्या हाताला गुण होता आणि मनात माणुसकी कुणाकडे अवशदाचे अधिकचे पैसे नसतील तर बाई स्वतः पैसे देवून अवषद आणायला सांगायच्या आडल्या नडल्याला धावून जायच्या कमी वेळातल्या लोकप्रियतेच हे अचूक गणित म्हणा हव तर
एव्हाना वासंतीची तळमळ अधिक वाढलेली ओटी पोटात जास्तच कळा मारत होत्या कदमाची प्रभा तिच्या पोटावर हात फिरवत सोस ग बये जरा नको नको सांगताना या फंदात पडलीस आता भोग तुझ्या कर्माचे व्याप प्रभाच तोंड सुटलं तर अख्खा गाव जमा होतो तर हा दवाखाना काय चीज आहे. नंबर लिहून घेत असलेल्या पोरीला प्रभान हटकलं काय ग झिपरे तुझी बाई आत काय कुणाचा पोट फडतेय काय ? मेली जावून कधीची एका - एका बाईला तपासायला एव्हडा येल तिचा जल्ला म्होरा तो तिला सांग हि हयित मेली कि ये एजिक्शना घेवून मुडदा बसवला मेलीचा , त्या नव्या नवख्या पोरींना काय कराव समजेना इतक्यात पटवर्धन बाई आल्या हा दवाखाना आहे आठवडा बाजार नाही . प्रभा अजून तापली हो ग बाय लवकर आलीस तरी आता हिला बघ काय झालाय तो ओम्बैच्या डाकटरानी सांगीतल्यानी हिला पोर होणार नाय आणि तू लगेच हिला कसा काय पोटाशी ठेवलास तोच मला काय तो सांग आधी
वासंती कळवळत होती तरीही ती प्रभावर भडकली ये भवाने तोंडाची चक्की बंद कर , आग लाव तुझ्या मुसक्याला माझा इथ जीव जातोय आणि तुला काय नको त्या भानगडी पडल्यात ग भटके आलीस तशी चालती हो सोंडके ……
पटवर्धन बाईना ज्याची शंका होती तेच झाल पिंड खाली सरकल होत तातडीने वासंतीला दाखल करायला हव होत त्यांनी लगेच डॉ शशांकना कॉल केला आणि वासंतीला त्यांच्या ममता हॉस्पिटल मध्ये रवाना केल . चिपळूणातल हे पहिलच ३ स्टार हॉस्पिटल अगदी गोवा हायवेला लागून ५ माजली भव्य इमारत , गार्डन , कॅफेटेरिया, ICU , सुसज्ज ऑपरेशन थेटर , वातानुकुलीत रूम्स , सगळंच हाय फाय ,ambulance emergency गेट वर आली आणि डॉक्टरची एक टीम समोर तयार दिसली सोबत डॉ शशांक देखील होते त्यांनीच वासंतीला ऑपरेट केलं. अर्थात त्यांच्या बायकोने पाठवलेली स्पेशल केस होती आणि आता पर्यंतच्या करियर मध्ये डॉ. मुक्ता पटवर्धन यांच्या हातून एकही केस दगावली नव्हती. वासंतीला इंटरनल ब्लीडींग झाल होत. आणि पिंडाने जागा सोडून बराच वेळ झाला होता कदाचित पुन्हा त्याला जागेवर सेट कराव लागणार होतं. अर्थात लगेच तिला OT मध्ये घेतलं ४ नवे उमदे डॉक्टर आणि डॉ. पटवर्धन प्रयत्नांची पराकाष्टा करत होते वासंती घाबरली होती आणि रक्ताने माखलेलि साडी तिने जेव्हा पहिली तेव्हा तर ती जास्तच हबकली मुल व्हाव म्हणून घेतलेला निर्णय जीवावर बेतला नाही म्हणजे मिळवलं अस म्हणत ती मनातल्या मनात जानाई आई चा धावा करत होती . आणि काही वेळात वासंती बेशुद्ध झाली. डॉ. पटवर्धन यांच्या लक्षात आलं केस अधिकच complicated होतेय . त्यांनी काही वेळसाठी वासंतीला ऑक्सीजन वर ठेवलं आणि नेमकं काय कराव लागेल यावर एकदा सखोल विचार केला काहीवेळात त्यांना त्याचं उत्तर मिळालं आणि त्यांनी आवशक मेडीसीनची मागणी केली आणि ते फायनल प्रयत्नांच्या तयारीला लागले. काही वेळात डॉ. मुक्ता वासंतीच्या एकंदरीत गेल्या ७ महिन्यांपासूनचे सगळे reports घेवून आल्या. डॉ.पटवर्धन आणि त्यांच्या टीमने त्यांना अनेक प्रश्न विचारले आणि डॉ. मुक्ताने त्याची उत्तरं दिली एकंदरीत केस वाचू शकते असा विश्वास आला आणि डॉ. पटवर्धन म्हणाले madam तुमचा प्रयोग महागात पडेल अस वाटतंय एकंदर एखदा विचार करा पुन्हा कुणाच्या जीवाची किमंत मोजून आपण आपल्या प्रयोगाची चाचणी घेवू शकत नाही पण डॉ. मुक्ता पटवर्धन त्यांच्या निर्यायावर ठाम होत्या हातातला गरम कॉफीचा कप दोन बोटांनी घट्ट दाबत त्यांनी डॉ.पटवर्धन आणि टीमला सुनावलं मी परदेशातल्या बेस्ट university मधून डिग्री घेतली आहे. परदेशात मला माझा experiment करता आला नसता पण इथे भारतात ते सहज शक्य आहे. आई होण्यासाठी इथले लोक देवाला नवस करतात, बाबा बुवाला हजारो रुपये देतात पण मी तर एका बाईला आईपण देणार आहे. तेही माझ्या प्रयोगातून डॉ. मुक्ता पटवर्धन यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास अहंकारात डूबला होता. पण डॉ. शशांक पटवर्धन इतके हुशार आणि तज्ञ असूनही काही बोलू शकत नव्हते कारण हे अलिशान हॉस्पिटल डॉ. मुक्ताच्या पैशातून उभं राहिलं होतं
एकदाची वासंती शुद्धीवर आली. पायाशी बसलेल्या कदमाच्या प्रभाला बघून जराशी हसली आणि मनात म्हणाली कशी असो मेली पण अजून थांबली हाय . तिच्या पण घरत ४ पोर म्हातारी सासू , पाच सहा गुर तिचा पसारा मोठा, अजून काय करतेस मेले घरात जायचा ना मी काय रायली असती एकटी यांना फोन केलास काय ग ? वासंती हाताच्या लसणाऱ्या सलाईनकड बघत म्हणाली , प्रभाच्या तोंडात पानाचा चुबडा भरलेला. समोरच्या बेसिन मध्ये पिचकी मारत प्रभा म्हणाली अगं हो तू बेसूद पडलीस तवाच फोन केला. जाधवाच्या दुकानात भावोजी नेमकं तीतच होतं विडी फ़ुकत मी आपली म्हतला भावोजी वासंती जायची फटकन लवकर या जाताना निदान घोटभर पाणी जायील तुमच्या हातचा. वासंती पुन्हा भडकली भावाने तुझ्या जिभेला काय हाड प्रभा सवयी प्रमाणेच वागत होती. पण वेळेला देवा सारखी धावून आली होती म्हणून वासंती राग गिळून गप्प होती. काहीवेळात डॉक्टर राऊंडवर आले. सोबत डॉ. मुक्ता पण होत्या किमान अजून ४ दिवस सुट्टी मिळणार नाही म्हणत त्यांनी वासंतीच्या नवऱ्याला मेडिसिनची लिस्ट आणि सोबत काही पैसे दिले. प्रभाने पैसे आणि लिस्ट दोन्ही स्वतःकडे घेतल्या आणि वासंतीच्या नवऱ्याला गावात पाठवून कडपे आणि इतर गोष्टी आणायला सांगितल्या अर्थात प्रभा आता ४ दिवस इथंच मुक्काम ठोकून बसणार होती हे वेगळं सांगायला नको .
दोन दिवस उलटले आणि वासंती जरा बरी झाली ती स्वतः बाथरूमला जात होती हाताने जेवत होती. आणि प्रभा लांब तगड्या करून पुढच पाऊल, देवयानी , साथ निभाना साथिया अशा रंजक मालिका बघत होती. पोरां - ढोरांच्या रगाड्यात तिला पण कधी असा मोकळा वेळ मिळाला नव्हता. वासंतीच्या निमित्ताने तिला पण आराम होता सकाळी उशिरा उठायचं हातावर खरपूस भाजलेली तंबाकूची मशेरी घेत चांगली आडवी उभी दातावर घसायची मग हॉस्पिटलच्या कॅफेटेरियामध्ये जावून केलॉक्स, बुफ़ॆ नाश्ता त्यात मग फ्रुट्स, ज्यूस , बेड बटर आणि असले भारी आयटंम खायचे. मग थोडा वेळ पुन्हा एकदा इकडच्या तिकडच्या बाता मारायच्या ,TV बगायचा आणि दुपारी परत veg -non veg जेवण दाबून खायचं अहाहा वासंती मुळे प्रभाला हे दिवस जगता येत होते फाटक्या गोधडीवर झोपणारी आणि मागच्या परसात मोकळ व्हायला जाणारी कदमाची प्रभा आज मलमली गादीवर लांब होत होती आणि इंग्लिश संडासात मोकळं होत होती . तिला तर हे दिवस संपूच नये अस वाटत होत.
चवथा दिवस उजाडला सकाळीच हेड नर्स बाई आल्या चेक उप करून त्यांनी कसलेसे रिपोर्ट बनवले आणि त्या निघून गेल्या ९ च्या सुमारास डॉ. मुक्ता येताना दिसल्या प्रभा नेहमी प्रमाणे TV बघत समोरच्या बेड वर पसरली होती तिच्या हातात सफरचंद होता ती लगेच सावरून उठली सफरचंद पदरा खाली लपवला. गेल्या दिवसात. वासंतीला बघायला आलेलेल्या माणसांनी आणलेल्या फळांचा फडश्या प्रभानेच पडला होता. वासंती कधी तरी नारळ पाणी प्यायली असेल बाकी सगळ प्रभाच्या पोटात, डॉ. मुक्ता आणि टीम यांनी वीस एक मिनिट तपासलं पिंड पुन्हा जागेवर सेट झाल होतं आता तशी चिंता नव्हती पण काळजी घेणं गरजेचं होतं डॉ. मुक्तानी तिला समजावलं काय करावं काय करू नये पुन्हा एकदा सागितलं आणि हॉस्पिटलच्या गाडीनं वासंतीला घरी सोडायच्या सूचना दिल्या. प्रभा जरां नाराज झाली तिच्या आरामाचे दिवस संपले होते पिशव्या भरताना तिनं डॉ. मुक्ताला कईक शिव्या घातल्या असतील मेलीला अजून चार पाच दिवस ठेवायला काय धाड भरली होती नाही तरी स्वतःचा दवाखाना आहे हिचा प्रभा ३ स्टार हॉस्पिटलला दवाखाना म्हणत होती.
जरा वैतागत ती गाडीत जावून बसली वॉड बॉय ने वासंतीला गाडीत भरलं आणि गाडी खेर्डीच्या रस्त्याला लागली प्रभा मागे वासंती सोबत बसली होती तिचं तोंड फुगल होत एकतर पान खावून आणि दुसरं म्हणजे पुन्हा तिला पोराबाळांच्या रगाड्यात आणि म्हातारीच्या कचाट्यात जाव लागत होतं गाडी वखारी वरून मारुतीच्या देवळाला वळसा घालत कदमवाडीत पोहचली. बाय बापड्या जमा झाल्या होत्या रामा कादामाच्या घरात हा माणूस गोळा झालेला. बायांनी प्रभाला बाजूला घेतलं आणि सगळी हकीगत विचारली काय ग प्ररभे काय म्हणाली डाक्तारीन बाई पोर पाडलन काय ? जाधवाची नर्मदा काकु पुढं होवून सवाल विचारत होती प्रभा वैतागली म्हातारे जरा दम धर मला पाण्याचा घोट तर घेऊदे कप भर चाय तर पिवदे मग सांगता तुला काय झाला तो. नर्मदा काकूला ऐकायला कमी येत ती म्हणाली काय बोलीस पोर झाला मला नाय बा माहित आता तू बोलीस तवा समजला आपल्याला बा कोण सांगतोय , प्रभाने मस्तकावर हात मारून घेतला . हिला कुणी अनलान रे तेव्हड्यात भीमा लोहाराची लेक सगुणा चहाचा पेला घेवून आली गरम गरम कोऱ्या चहाचे दोन घोट पोटात गेले आणि मग प्रभाने सारी हकीगत रंगवून रंगवून सांगितली मधेच बाया तोंडाला पदर लावून - आए ग , अगो बाय , देवां , काय बोलतेस तरी काय , खराच काय गो ? , मेलीत जाऊन ती असा भरगोस प्रतिसाद देत होत्या तिकडं वासंती बाजल्यावर पडून प्रभाची गम्मत बघत होती.
मध्ये बरेच दिवस गेले आणि वासंतीचा शेवटचा महिना लागला . ममता हॉस्पिटलची गाडी अधून मधून येत होती. आणि आता शेवटचे काही दिवस राहिलेत अस म्हणून डॉ. मुक्ता त्या दिवशी गावाततून निघून गेल्या आणि मोजून २ दिवस झाले असतील दुपारची वेळ प्रभा वासंतीच्या पडवीत चकाट्या पिटत बसली होती.
वासंतीचा ओरड्या आवाज एकूण ती माजघरात धावली . तिला खाली बसवत तीन शेजारच्या कदमाच्या पोराला हाक मारली त्याच्याकडं मोबाईल होता. डॉक्टरच्या पावतीवरचा नंबर त्यानं लावला आणि गाडी मागवली. नर्मदा काकू पुन्हा बांधावरन धडपडत आली. सुती लुगड्याचे फडके, ओवा , कानाला बांधायला मोठा जाड कपडा , आणि बारीक सारीक गोष्टी तिने पिशवीत घालून आणल्या होत्या , तयारी होतेय इतक्यात गाडी आलीच वासंती विव्हळत होती ओरडत होती तिला वेदना सहन होत नव्हत्या कस बस बायांनी तिला गाडीत चढवलं आणि भरल्या डोळ्यांनी तिला निरोप दिला. बाया अजून कुजबुजत होत्या. देवानं लग्नानंतर १० वर्षांनी कूस उजवलान हाय आई जानाई सोडव ग सुकान ........
ममता हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला होता. डॉ. मुक्ता पटवर्धन यांची हि खास केस आहे म्हणून लेबर रूम नेहमी पेक्षा अधिक जास्त सतर्क होती . सगळ्या हेड नर्स जातीनं हजर होत्या. आणि डॉ. मुक्ता पटवर्धन यांची BMW कार गेट वर आली. वासंती लेबर रूम मध्ये होती. हेड नर्स ने तिला लेबर पेन चा ईंजेक्शन दिल होत . डॉ. मुक्ता यांचा प्रयोग आज शेवटच्या टप्यात आला होता वासंती सुखरूप सुटली कि त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण होणार होता आणि अर्थात त्यांना या प्रयोगाच पेटंट मिळणार होतं. मनात एक अविस्स्मित लहरी संचारल्या होत्या. काही वेळेत OT च दार बंद झाल. बाहेर प्रभा वासंतीचा नवरा आणी गावातल्या चार बाया बाकड्यावर बसल्या होत्या , नॉर्मल डिलिवरी होणार नव्हतीच म्हणून सीझरला सुरवात झाली. डॉ. मुक्ता प्रशिक्षित सर्जन होत्या त्यांच्या हाताला वेग आला. त्यांची जेनेटिक टेस्ट टूब बेबी या जगात येणार होती. सगळ सुरळीत पार पडल होतं आता फक्त बेबीची नाळ कापून दोन जीव वेगळं करायचे बाकी होते हेड नर्सने नाळ कापायला ब्लेड घेतला आणि वासंतीचा दम गुदमरला तिला ऑक्सिजन पण घेतां येईना डॉ. मुक्ता गांगरल्या त्यांनी त्यांचे प्रयत्न केले पण वासंती नॉर्मल होणं जवळ जवळ अशक्य होतं , सगळेच काही वेळ गोंधळले आज नेमके डॉ. पटवर्धन नाशिकच्या आरोग्य परिषदेसाठी गेलेले वेळ फार कमी होता. डॉ. मुक्तानी अनेक references आठवले पण काही सुचत नव्हतं. हेड नर्स म्हणाली डॉक्टर नाळ कापुया म्हणजे निदान एक जीव तरी वाचेल . डॉ. मुक्तानि होकारार्थी मान हलवली हेड नर्सने कचकन नाळ कापली आणि वासंतीने अखेरचा श्वास घेतला. डॉ. मुक्ताच्या हातातली सीझर खाली पडली. हेड नर्से ने बाळ नाळेतून सोडवून आया बाईच्या हातात दिलं आणि वासंतीच्या पोटाला गोधडी शिवावी तसे उभे टाके घातले . डॉ. मुक्ता OT च्या सेंटर चेयर वर बसल्या होत्या अंगात त्राण नसल्यागत त्यांची अवस्था झाली होती. आया पण वाईट बातमी घेवून आली बाळ गेलं होतं . डॉ. मुक्ताच्या आयुष्यातला हा पहिला अपयशाचा प्रसंग पचवणं तसं फार कठीण होतं . त्या बाहेर आल्या तेव्हा प्रभा वासंतीचा नवरा आणि गावातल्या बाया उठून उभ्या राहिल्या त्यांना sorry म्हणून डॉ. मुक्ता थेट गाडीच्या दिशेने चालत्या झाल्या. प्रभा , गावातल्या बायका आणि वासंतीच्या आक्रोशाचा बांध फुटला प्रभाने डॉ. मुक्ताच्या नावान शिव्यांची लाखोली वाहिली बाय बापड्या डॉक्तारनीच्या नावाने बोटं मोडत होती. आणि वासंतीचा नवरा सुन्न होवून मांडीत डोकं घालून बसला होता. त्याचं सारं जग उधवस्त झालं होतं मुल होणार नाही आणि प्रयत्न केलात तर जीव गमवावा लागेल असा सल्ला त्याला ५ वर्षापूर्वी मिळाला होता पण आज डॉ. मुक्ताच्या हट्टा पाई आणि वासंतीच्या आई होण्याच्या लालसेपाई वासंती आई झाली होती पण तिच्या दुधाला पान्हा फुटायच्या आत सार आटलं होतं ............
गाडीच्या मागच्या सीट वर बसून डॉ. मुक्ता खूप रडल्या त्यांनी डॉ शशांकना कॉल केला. मी हरले रे म्हणत एक मोठा हुंदका घेतला . डॉ शशांकनी तिला आधीच याची कल्पना दिली होती त्यामुळे ते फक्त this is disgusting i cant accept तू तुझ्या प्रयोगासाठी दोन जीव घेतलेस तू this is ridiculous गाडी एव्हाना बंगल्याच्या डोअर समोर उभी होती . अतिशय हताश होवून पहिल्यांदा डॉ. मुक्ता घरी आल्या होत्या थेट बाथरूम मध्ये घुसत आधी शॉवर खाली उभ्या राहिल्या अंगावरचे कपडे तसेच होते किती वेळ पाणी वाहून गेल असेल पण मनावरचा ताण काही केल्या जाईना सतत वासंतीचा चेहरा डोळ्या समोर येत होता. काहीवेळाने ती बाहेर आली कपडे बदलून गच्चीत गेली. हातात रेड वाईनचा फुल्ल भरलेला ग्लास होता. सोबत डॉक्टर शशांक पितात ती सिगार साटासट दोन पेग रिचवून डॉ. मुक्ता अपयश पचवायला पाहत होत्या . आणि इतक्यात त्यांची नजर समोरच्या कुंडी कडे गेली त्यात वडाच्या झाडाचं बोन्साय होतं त्याला लाल फळ आली होती पण त्यातली बरीच फळ गळून खाली पडली होती. अगदी वासंती सारखी निस्तेज , अपरिपक्व .............
- संतोष टाकळे
कथा काल्पनिक असली तरी यातले बरेच संधर्भ सत्य घटनेशी निगडीत आहेत .
आवडल्यास कळवा
धन्यवाद !!

No comments:
Post a Comment