रेल बजेट वरची कॉमेंट



आज सकाळ वृत्तपत्रात माझी रेल बजेट वरची कॉमेंट प्रसिद्ध झाली मित्रांचे फोन ,sms , whats up आणि BBMवर शुबेच्या आणि reply मिळाला. काहीना आवडल काहीना उगाच लालू प्रसाद ना support का केलं असा संभ्रम झाला. मुळात लालूंनी जेंव्हा रेल बजेट सदर केल तेव्हा मी सकाळ मध्ये काम करत होतो. तेव्हाच्या अंकासाठी मी लोकांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. लोकांनी लालूंच्या बजेटच स्वागत केलं मुळात त्यांनी सामान्य लोकांना दिलासा दिला होता. हे विशेष काही घोटाळे आणि त्यांची दहशत सोडली. तर हा नेता तसा असामी म्हणावा लागेल. हम रेल मिनिस्टर हु अशी सुरवात करत सदनात एकाच हशा पिकवून देत . त्यांच्या घरगुती इंग्लिशची उजळणी घेत या मंत्र्याने त्यांचा रेल मंत्री पदाचा कार्यकाळ गाजवला. अनेक धाडसी निर्णय घेतले त्यात

१ भाडे वाढ नाही
२. कित्तेक वर्ष कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांना सेवेत सामावून घेतलं.
३. सामान्य लोकांसाठी गरीब रथ सुरु केला.
४. माल वाहतुकीला प्राधान्य देत त्यातून रेल्वेच्या तीजोरीतली तुट भरून काढली.
५ आरक्षणाची मुदत ३० दिवसांवरून ९० दिवसांवर नेली

विशेष म्हणजे लालूंच्या म्यानेजमेंट स्किलची खूप तारीफ झाली. इतकी कि त्यांना देशा परदेशातल्या Management colleges मधून बोलावणी आली. आणि लालू तिथवर पोहचले.नवोदित पोरांना हम गाय भैस वाला आदमी हु ओर अब रेल मंत्री हु म्हणत Management formula शिकवला.

नुसती टीका केली म्हणजे होत नाही. काही चांगल्या गोष्टी समोर आल्याच पाहिजेत . मध्यंतरी ममता दीदीनी राजीनामा दिल्यावर आलेले. दिनेश त्रिवेदी यांनी देखील तसा बारा रेल बजेट सादर केला होता पण ममता दीदी पेटून उठल्या आणि ये ना चालबो ! म्हणत त्यांनी त्रिवेदीनां पाय उतार करायला भाग पाडल.

काही असो लालू प्रसाद बेस्ट अस मी का ? म्हणालं त्याच स्पष्टीकर दिलंय पटलं तर बघा .

काही निवडक रेल मंत्र्यांची यादी

1. लाल बहादूर शास्त्री - 1952- 1956
2. अटल बिहारी वाजपेय - 1996 ला फक्त १३ दिवसांसाठी रेल्वे मंत्री
3.नितेश कुमार - 1998-1999 / 2001- 2004 .
4.लालू प्रसाद यादव -2004-2009
4.ममता ब्यानेर्जी -2009-2011/ 1999-2000
5.मनमोहन सिंग - 2011 ममता दीदींच्या राजीनाम्या नंतर चक्क देशाच्या प्रधान मंत्र्यांनी रेल्वे मंत्रालय चालवलं

पण आजही आपण कोंबून प्रवास करतो आहोत . सुरक्षेच्या नावाने बोंब आणि विकासाच्या नावाने शिमगा चालू आहे.
तरीही पवन भन्सल म्हणतात ….

सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं !
हमें देश को विकास और ले जाना चाहते है !



- संतोष टाकळे

* सकाळ वृत्तपत्र आणि माझा पत्रकार मित्र मंगेश फदाले यांचे मनपुर्वक आभार

No comments:

Post a Comment