
काल हिला साडी घ्यायला दादरच्या एका शोरूम मध्ये गेलो. येत्या आठवड्यात मित्राचं लग्न आहे. त्याचीच तयारी ………… १ तास झाला किमान ढीगभर साड्या समोर येवून पडल्या त्यातल्या दोन तीन आवडल्या बाईना पण त्यातही अनेक गोष्टी खटकत होत्या उदा … अय्या हि डाळिंबी कलरची मस्त आहे नाई पण हिचा काठ उठून नाही दिसत ………… हि मोरपिशी पण बरी आहे . पण पदर फारच साधा आहे. नक्षीकाम कमी वाटतंय …………खरतर मला ना हि शेवाळी कलरची बनारसी पट्टी फारच आवडलीय पण जड बघा किती आहे, मी साडीच्या काठाला आतल्या बाजूने लावलेला किंमतीचा ट्याग पहिला …………Rs - ७ , ८ ० ० /- only . एव्हाना मला आणि साडी दाखवणाऱ्यालाही घाम फुटला होता. माझी नेमकी reaction त्याला उमजली असावी …………… तो म्हणाला madam मला वाटतं हि डाळिंबी कलरचीच तुम्हाला जास्त सूट होईल. price tag पहिला तर …Rs - २ , ५ ० ० /- only माझा आनंदलेला चेहरा पाहून सेल्समन म्हणाला साहेबांनाही हीच साडी आवडलेय या वेळेस त्यांच्या पसंतीची घ्या …………………… साहेबांची पसंती ……………. अहो मागे दिवाळीला आणलेल्या साडीचा कलर एका धुण्यात गेला गोणता झालाय त्या साडीचा …………त्यांची कसली डोंबल्याची choices ………….…………. तरीही माझ्याकडे पाहत ती म्हणाली अहो सांगाना कोणती घेऊ हि ……… कि……… ती ७ , ८ ० ० ची साडी त्या ढिगाऱ्याच्या खाली कोंबत मी म्हटलं तुला डाळिंबी कलर काय खुलून दिसेल नाई .
७ , ८ ० ० ते २ , ५ ० ० हि लांब उडी अचूक मारल्याच्या निखळ आनंद सोबत घेऊन शोरूम मधून बाहेर पडताना नेमकं काय फील केलं ते असं शब्दात मांडण कठीण आहे.
- संतोष टाकळे
No comments:
Post a Comment