इनिस्पेक्षण करतेय …………. असं वाक्य कानावर पडतं आणि चक्क माधुरी दीक्षित कामवाल्या बाईच्या क्यारेटर मध्ये दिसते . भुवया उंचावून लोक म्हणतात हिला काय भिक लागलेय अशी जाहिरात करायला ……… असो पण सध्या घरकाम करणारी बाई मिळणं कठीण झालंय …… working वुमनच्या जमान्यात यांचा भाव वधारलाय आणि डिमांडहि.
कालच एका मित्राकडे जेवणाचं आमंत्रण होतं. साग्रसंगीत स्वयंपाक झाला होता. मोसमातल्या शेवटच्या आंब्यांचा आमरस, कुर्मा भाजी, पुरी , चटणी , कोशिंबीर , भरलेल्या मिरच्या, आणि साजूक तुपाची धार टाकून केलेला मसाले भात, कित्तेक दिवसांनी असं ब्राम्हणी जेवणाचा आस्वाद घेत होतो. अगदी तृप्त होऊन हातावर पाणी सोडताना म्हटलं वाहिनी मस्त झाला बेत "मसाले भात "तर अफलातून ………… त्यावर मित्राने लगेच चान्स मारला ……अरे तुझ्या वाहिनीने स्वयंपाक करून काळ लोटलाय ………… त्यावर - इति वाहिनी ……… Sunday ला पास्ता , पिझ्झा, बर्गर , हादडतोस ते काय तुझी ………… करते का ? मी मनात म्हटलं उगाच आगाऊपणा करायची काय गरज होती जेवण कुणी का करेत ना पोट भरलंय तर सरळ घरचा रस्ता पकडायचा सोडून मार तरीफा करत बसलाय …………. त्या दोघांची खडा जंगी अजून चालूच होती. मी जरा अव्ह्गडून म्हटलं बरं येतो मी बराच वेळ झालाय… ……… कदाचित त्यांना मी इथे आहे याच भान राहिलेलं नसावं. ………भानावर येत दोघेही शांत झाले. वाहिनी म्हणाल्या अहो हे नेहमीचंच आहे. जरा म्हणून कवतुक नाही माझं या माणसाला ………. ते जाऊदे अहो पण फालुदा केलाय तो खाल्या शिवाय मी बरी सोडेन तुम्हांला ……… वाहिनी किचनकडे वळल्या आणि मित्र म्हणाला हसतोस काय तुझ लग्न झालं कि हे सगळं तुलाही भोगावं लागणार आहे .
हाह्हाहः अरे पण हा स्वयंपाक कुणी केला ? ………. अरे कुणी म्हणजे काय आमच्या सुलभा काकूंनी ……… ओह्ह म्हणजे तुमच्या कामवाल्या का ? हो त्याच पण त्यांना आम्ही कधी कामवाली म्हणून वागवलं नाही अरे गेली ३ ० वर्ष त्या आमच्याकडे काम करता आहेत सगळं घर आम्ही त्याच्या हवाली करून जातो. पण इथली वस्तू तिथे काय होयील …………. मी तर लहानपणा पासून सुलभा काकूंच्या हातचं जेवतोय आई सरकारी नोकरीत बाबा शिक्षक ,सुलभा काकूंनी घर सावरलं …… आत्ता त्या पार थकल्यात काम जमत नाही त्यांना पण तरीही येतात. अगदी मनापासून करतात सगळं सध्या त्यांची सून येते सोबत बाकी जड काम त्यांची सून उरकते पण जेवणाच्या फोडण्या मात्र सुलभा काकूच घालते अस्सल चव आहे तिच्या हाताला. कामात त्यांच्या सुनेने जरा धूसमुसळेपणा केला. तर तिला तिथल्या तिथे झाडतात अगदी हक्काने ……… सकाळी आम्ही आज काय बनवायचं याची यादी ठेवतो त्यानुसार सगळे पदार्थ संध्याकाळी तयार असतात एकादी वस्तू कमी पडली तर सुलभा काकू तिच्या नऊवारीच्या पदराच्या कोपऱ्यात बांधलेल्या पैशाची मोड करून ती वस्तू घेवून येते आणि आठवड्याच्या शेवटला हिशोब देते … आजतागायत आम्ही तिचा हिशोब कधी तपासाला नाही. कधी वेळच नाही आली तशी. सुलभा काकूंन बद्दल बोलतांना मित्राच्या डोळ्यात आपलेपणाची चमक होती. आणि जिव्हाळा तर स्पष्ट जाणवत होता.
समोर फालुद्याचा ग्लास होता. त्यातल्या तीन चार थरात भरलेला प्रत्येक पदार्थ वेगळा होता. वर दिसणारा सुका मेवा , आईस्क्रीम, सब्जा लाल रंग आणि इतर सगळं बाहेरून उठून दिसत होतं मात्र या फालुद्याची खरी मजा ज्या मलाई दुधामुळे येते तो मात्र या सगळ्या सजावटीत अनोळखी झाला होता. अगदी सुलाभा काकुं सारखा ……….
- संतोष टाकळे

No comments:
Post a Comment