सिग्नलला गाडी थांबली आणि १ ० एक वर्षाची पोर गुलाबाच्या फुलांचा झुबका घेवून जवळ आली. साब लो ना ताजा फुल है ! पावसात भिजून गुलाब अधिक फ्रेश वाटत होते . एक क्षण ते घेण्याचा मोह झाला . पण इतक्यात ग्रीन सिग्नल लागला आणि गाडीने पुन्हा वेग घेतला. गेले काही दिवस रोज याच सिग्नलवर ती चिमुरडी दिसते. कधी गुलाब घेवून तर कधी निशिगंधाच्या पांढऱ्या शुभ्र काड्यांचा गठ्ठा घेऊन . प्रत्येक गाडीच्या काचेसोमर ती फुलांचा झुबका धरते आणि डोळ्यात करुण भाव आणत ते विकण्याचा प्रयत्न करते. विस्कटलेले केस,मळलेला झगा, काळवंडलेला चेहरा इतकं असूनही तिच्या डोळ्यात मात्र एक वेगळी चमक दिसते . नहि चाहिये म्हणत कुणी तिला झिडकारल ……………कि काही सेकंद तिचा चेहरा कोमेजतो पण क्षणार्धात पुन्हा ती दुसऱ्या गाडीच्या काचेतून डोकावते………………. हातातल्या गुलाबाच्या झुबाक्याकडे पाहत … आणि एकदा त्याची बोली लावते. कुणीतरी म्हणत ६ ० नाही ४ ० दुंगा बोल देना है ! साब ५ ० तो दो म्हणत ती तिची शेवटीची गळ घालते . पण हातच गीऱ्हाईक जातंय असं वाटलं तर लगेच लो साब ……… म्हणत तो झुबका काचेतून आत सरकवते . इतका वेळ सिग्नलला रेंगाळत असलेल्या त्या गुलाबांच्या नशिबी आलिशान गाडीत बसलेल्या madam च्या हातात जाण्याचं भाग्य मिळतं . आणि ती बापडी १ ० च्या चार नोटा नाचवत फुटपाथच्या दिशने धाव घेते. तिच्या कित्तेक तासांच्या प्रयत्नाला यश आलेलं असतं. फुलांचे गुच्चे बांधत बसलेली तिची आई लेकीला जवळ घेते. तिच्या गालावरून हलकासा हात फिरवत तिला शाबासी देते.ती कोवळी पोर या प्रेमाने भारावून जाते. आईला घट्ट कवटाळून तिच्या मिठीत विसावातेय इतक्यात तिचा बाप पुन्हा एक गठ्ठा तिच्या हातात कोंबतो ……………. पदराने तिची आई लेकीच तोंड पुसते, केस निट करते, फडक्याखालच्या बाटलीतल दोन घोट पाणी पाजते. पुन्हा त्या पोरीला तरतरी येते. सिग्नल लाल होतो गाड्या थांबतात ………… धावत ती गाड्याच्या दिशेने पळते……. आणि पुन्हा साब लेलो ना म्हणत ती गाड्याच्या गर्दीत हरवून जाते ………एवढ्या तेवढ्या अपयशाने खच्चून जाणारे आपण हिला पाहून शरमलो नाही तर नवल…………तिची जिद्द , परिस्थिती आणि च्यालेंज स्वीकारण्याच जिगर पाहिलं कि वाटत. आपण का रडतो नेमही .
सुखावणाऱ्या AC कारच्या आत बसलेल्या माझ्या आणि पावसात भिजत फुलं विकणाऱ्या तिच्या जगण्यात नेमका काय फरक . …………. तिचं जगणं जिगरबाज आहे. बेधडक संघर्षाचं आणि माझ जगणं "शो"बाज आहे. diplomatic मुखवट्याच …………. !

No comments:
Post a Comment