पूर्वी तुळशीच लग्न लागल की मग माणसांच्या लग्नाचे मुहूर्त निघत पण हल्ली वर्षभर लग्न होत असतात तरीही आजही एकादशी नंतर गावात तुळशीच लग्न साग्रसंगीत लावल जात .....आंब्याच्या काटक्या बांधून बनवलेल्या नवरा- नव्हारीच्या बाहुल्या त्याला रुईच्या पानावर काजळाने डोळे चेहरा रेखाटून काढलेला मुखवटा .... रुई चाफ्याच्या फुलांच्या मुंडावळ्या .......आणि मग रात्रभर हळदीच्या पाण्यात भीजत ठेवलेल्या वस्त्रांनी गुंडाळुन तयार झालेले बाहुले तुळशीच्या मधोमध रोवून ......रुखवात म्हणून आवळे -चिंचा -बोरं- आणि इतर गोड- धोड पदार्ध मांडून गावातली माणस लग्न लावायला येईस्तोवर नविनच केलेल्या सारवलेल्या अंगणात डोंगर का पाणी..... विष अमृत .....संत्र का लिम्बु ....रा रा राम असले तेव्हाच खेळ खेळले जायचे .अखेर फिरता भटजी येई .अक्षदा वाटल्या जात .रितसर लग्न लावल जाई .शेवटच्या मंगल अष्टकेला शंभरची माळ लावत सोहळा पार पड़े .....भटजीही दक्षिणेचे दहा रुपये खिशात कोम्बत पुढच्या घरी जाई मागे मागे वाढत व्हराड पुन्हा त्याच्या मागून दुसऱ्या तुळशीच्या लग्नालाची अक्षदा घ्यायला नव्या अंगणात जमत .रात्री उशिरा पर्यंत ही लग्न लागत असत .आणि लोक अक्षदा टाकून टाकून दमत असत.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नवरा- नवरीला घराच्या छपरावर फेकण्याची प्रथा आहे.
आणि मग जो नवरा नव्हरी फेकल सुखवतीच्या आवळे चिंचा बोर हा सगळा माल त्याचा .शिवाय मामा म्हणून तुळशीत उभा केलेला काळा उसही त्याचाच
यंदा हे सगळ आई -बाबां सोबत सुप्रिया ने केलय.
सो क्रेडिट गोज टु हर & ब्रो अमित .
© Santo

No comments:
Post a Comment