आजची संध्याकाळ अतिशय भावनिक होती. भाच्या सोबत फटाके आणायला गेलो त्या दुकानात शाळेतले गुरूजी भेटले योगायोग म्हणजे ते दुकान त्यांचच होत. त्यांना नमस्कार केला तेंव्हा त्यांनी ओळखल नाही .गुरुजी मी टाकळे उदयनगर शाळेत होतो.आता वय झालय रे तरीही आठवतोयस तू टाकळ्या ......काय करतोस वैगरे चौकशी झाली आणि मग फटाके घेतले दहा बारा आयटम जमा करत हे द्या म्हटल्यावर त्यांनी यादी केली
एका कोपऱ्या कागदावर त्यांची आंकड़े मोड़ सुरु झाली .अगदी तशीच जशी वर्गात गणित शीकवत असतांनाची असायची तशी आणि मग लमसम आकड़ा शेवटी मांडत त्यांनी पावती समोर धरली म्हणाले बघ बरोबर आहे ना तपासून घे ........गुरूजी अहो अंकलिपी तुम्हीच शिकवलित मला आता मी तुमची बेरीज कशी तपासू…...ती अचूक असणारच ....तेंव्हा गुरुजीनी जवळ घेतल आणि म्हणाले तू काय बोलायला ऐकणार नाहीस अतिशय आनंद होतोय मला तुला भेटून हे घे अजुन एक फटाक्यांची माळ माझ्याकुडून तुला...... कधीकाळी गणितं चुकली म्हणून पाठीत धपाटा घालणारे .तलाठी गुरूजी आज हळवे झाले होते. बदडवून काढ़णारे तेच हात आज मायेने पाठीवरून फिरत होते. कित्येक वर्षानी पुन्हा शाळेत गेल्यागत वाटत होतं कारण तलाठी गुरुजीनी कितीही मारल झोडलं तरी शाळा सुटायच्या आधी ते बोलवून जवळ घेत समजुत काढत म्हणत शिकलास तर आयुष्यात काहीतरी चांगल करता येईल आणि शिवाय नोकरी धंदा मिळेल नाहीतर अडाणी राशील तर आयुष्य खूप खडतर आहे रे तु नीट अभ्यास केलास तर गद्यड्या मग मला हात उचलावा लागणार नाही.जा उद्या येतांना आजच काय शिकवलंय त्याची उजळणी करून ये.
माघाशी निघता निघता त्यांनी पुन्हा पाठीत धपाटा घातला आणि म्हणाले टाकळ्या . खुप मोठा हो अगदी आम्हाला तुला भेटायला ताटकळत उभ राहाव लागेल इतका .........आणि पुन्हा त्यांचे डोळे पाणावले गुरूजी कितीही मोठ व्ह्ययच स्वप्न असल तरी तुम्हाला माझी वाट बघावी लागेल इतकं मोठ् नाही व्हायचय मला.
© Santo

No comments:
Post a Comment