आज प्रेमाचा उत्सव तिच्या किंवा त्याच्याशी मनातलं सार शेअर करायची नामी संधी काय घ्यावं तिला याच्या शोधत कित्तेक दुकानं पालथी घालून शेवटी एकाद्या दुकानात चटकन नजर जाते ती डायमंड नेकलेस वर ( खरे खुरे नाही हो आपले अमेरिकन डायमंड ) जरा जास्तच भाव आहे म्हणत थोडी घसा घीस होते आणि अखेर तुझ माझ राहूदे करत एक किमंत ठरते पट्या खुश नेकलेस एव्हाना गिफ्ट प्याक होत असतो आणि याची कल्पना शक्ती तो तिच्या घेरदार गळ्यात घालून मोकळा होतो काय तो आनंद असा शब्दात सांगता येणार नाही राव तो अनुभवायला मजा येते गिफ्ट च झाल पण साला आत्ता भेटायचं कुठे मध्येच जर खिसा चेक केला जातो साला गिफ्ट जरा महागच आहे पण साला आपली .......( शब्द जरा रावडी आहे ) पण भारी आहे ना राव हिला पटवायला साला त्या हलकट रघूच्या पाया पडलोय तिचा मानलेला भाव आहे ना तो काय अकडत होता तो माझा असली लव नसता ना संध्या वर तर फोडला असता त्या रघुला पण आपला हात दगडा खाली गावलाय राव मी काय तुम्हाला स्टोरी सांगत बसलोय संध्या निघाली असेल आज चुलत भावाच्या साखरपुड्याला जातेय अस सांगून ती लवकर निघणार आहे ऑफिसातून आज तिला गिफ्ट देवून खुश करतो ..
एव्हाना बाईकचा स्पीड वाढलेला आणि मनात तरंगी गाण्यासोबत फक्त ६०० रुपये उरलेत यार भागेल ना यात पोपट नको होवूदे म्हणजे मिळवलं आणि सोमर संध्या दिसली लाल गुलाबी ड्रेस चेहरा मस्त खुललेला गालावर हलकीशी गुलाबी पावडरचा थर आणि तिच्या ओठावर नेहमी पेक्षा आज जराशी डार्क पण ड्रेसला सुट होणारी लिपस्टिक तिला नुसतं पाहवत राहावं
हेय बरा आहेस ना चल लवकर मला घरी वेळेत जायला हवं तिनं नेहमी प्रमाणे भानावर आणलं मला मी पण मग बाईक वळवली आणि थेट आरे कॉलनिच्या रस्त्यावर लावली तिनं विचारलं काय झालं जॉबच मी ऐकून न ऐकल्यासारख काय बोललीस काही नाही जावूदे मग बोलते हवा खूप मस्त आहे नाही मी .. हो मस्त आहे आणि तू पण मस्तच आहेस ती लाजली आणि नुसतं पाठीवर एक धपका मारत तिच्या मनातलं व्यक्त केलं.
गाडी नेहमीच्या स्पॉट वर थांबली ती उतरली आणि मीही काही क्षण तिच्या डोळ्यात मी स्वतःला हरवून बसलो तिला जवळ घेत म्हटलं सीम i love you so much तिने नुसतं हुम्म म्हटलं आणि आम्ही एकमेकात विरघळलो...
तिला घाई होती जायची म्हणून फार वेळ न घालवता मी माझं गिफ्ट तिला दिलं तिने प्याकिंग पाहूनच ओळखलं नेकलेस आहे का ? मी काय बोलणार फक्त मान हलवली तिनं लागलीच ते गळ्यात घालून दाखवलं त्या अंधाऱ्या संध्याकाळी तिच्या गळ्यातल्या चांदण्या चमचम चमकत होत्या तिचा हात हातात घेत मी म्हटलं अशीच कायमची सोबत राहशील ना ती घट्ट बिलगली मला.. आणि माझ गिफ्ट दिलं काय आहे अस विचारावं तर ती म्हणाली बघ उघडून मी ऱ्यापर काढलं आणि आत पहिल तर वॉलेट तेही विथ १००० रुपये कोऱ्या करकरीत नोटा होत्या आत ...
मी पुन्हा तिला बिलगणार इतक्यात हाक आली अहो आज ऑफिसला रजा आहे का ? उठा ८ वाजलेत मी निघालेय जाताना नानुला स्कूल बस मध्ये बसवून जाते तुम्ही फक्त तुमचं आवरून निघा .. हीच ती संध्या तेव्हाची सोनकळी आजची माझी सदाफुली झालीय
हंगाम असो वा नसो सतत फुलत राहायचं पाकळ्या कितीही सुकल्या तरी ............
प्रेम दिनाला विरोध करणाऱ्या तथाकथित नवोदित राजकारणी पोरांनी जरा खरं प्रेम करून पाहावं मग कळेल कार्ड जाळण्यात आणि दुकानं फोडण्यात जी आक्रमकता आपण दाखवतो ती प्रेमातल्या हळुवार पणा पुढे कूच भी नाही यार
सो असल्या उडण टप्पू ना काय घाबरता राव प्यार करो बिंदास ...
पोस्ट काल्पनिक आहे याची कृपया नोंद घ्यावी पण प्रेम दिनाला विरोध करणाऱ्या राजकीय आणि इतरांवर केलीली टीका मात्र सत्य कथेवर आधारित आहे ...
-- संतोष टाकळे
प्रेम दिनाच्या मनस्वी शुबेच्या .............!

No comments:
Post a Comment