महाराष्ट्र कि 'बि' हार ……!



तोंडाला काळ फासून वर हुशारी करणारे निर्लज्ज राजकीय नेते काल मोकाट पत्रकार परिषदा घेत होते. ज्या प्रांगणात महाराष्ट्राच्या विकासाची गंगा उगम पावते अशी आपली समजूत आहे त्या विधान भवनाच्या आवारात जीव जाई पर्यंत एका शासकीय अधिकाऱ्याला चोपून वर हो आम्हीच त्याला मारलं अशी खात्रीलायक बातमी पत्रकारांना देतांना राम कदम नामक नवनिर्माण पक्षाचे राजकीय गुंड ब्रेकिंग न्यूजच्या रखान्यात झळकताना पाहून मला महाराष्ट्राचा नागरिक असल्याची अक्षम्य लाज वाटली. काहीवेळ मस्तकात अशी कळ गेली कि जर हे उपटसोंडे माझ्या समोर असते तर पायतानांनी  थोबाड फोडत त्यांना सामान्य माणसाच्या प्रतीरोषाची एक झलक दाखवली असती. आज राग अनावर झालाय खरं ….

कालच्या प्रकारची दखल … 

the hindu च्या न्यूज update मध्ये मी जेंव्हा हि बातमी वाचली तेंव्हा काही क्षण मुंबई आणि महाराष्ट्र हे ठिकाण कदाचित चुकून लिहल गेलं असावं अशी शंका आली. बातमी सविस्तर कळावी म्हणून tv ऑन केला. तेव्हां फुटेज पाहून वाटलं बिहार तरी बरा आपल्या पुढे सत्तेच्या चर्बीवर माजलेले हे आरोपी रेडे जेव्हा स्क्रीन वर एकमेकांशी खोचट हसत आपल्या कर्तुत्वाची कहाणी सांगत होते. तेव्हा तर रागाचा पारा लिमिट क्रॉस करून गेला. या प्रकरणावर मुख्यमंत्री नेहमी प्रमाणे हतबल होत. कारवाईचे आदेश देत सारवासारव करत होते. फारच विदारक चित्र होतं तुम्हा आम्हाला लाजवणारं अर्थात महाराष्ट्रात राजकीय शिष्टाचार आणि त्याच्या कायद्याची भीती आत्ता कुणालाही उरलेली नाही. 

कारवाई … 

दरम्यान, या मारहाणीप्रकरणी आमदार क्षितीज ठाकूर, राम कदम तसंच अभिजीत अडसूळ यांच्यासह चौदा जणांवर मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे आमदार राम कदम, क्षितिज ठाकूर, प्रदीप जयस्वाल, जयकुमार रावल, राजन साळवी यांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलंय . फार नॉमिनल शिक्षा आहे ही सभागृहातून असल्यांची कायमची हकालपट्टी करायला हवी . जनतेचे प्रतिनिधी होण्याची लायकी नाही अशा प्रमाणपत्रा सोबत यांना घरी पाठवायला हवं होतं . पण ते महाराष्ट्रातल्या तथाकथित नियामालावीत बसत नसावं कदाचित .. कायद्या पेक्षा या नेत्यांच्या वजनाने न्यायाची तागडी खाली बसली असावी … 

आपणही जबाबदार……

अशा राजकीय प्रतिनिधिना  आपणच निवडून देतोय.  हे वास्तव मात्र विसरता कामा नये.  मध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनात right to re call हि संकल्पना भन्नाट होती. त्याचं मग सगळं बासनात गेलं आणि आंदोलन गुंडाळल हे अजून एक कटू सत्य .  जे होतंय त्याला आपणही जबाबदार आहोत हे आत्ता मान्य करा . राम कदम , क्षितीज ठाकूर  आणि अन्य आरोपी नेत्यांच्या मतदार संघातले लोक असल्या गुंडाची आमदारकी आम्हाला नको म्हणून का पुढे येत नाहीत. ? त्यांना याचं वागणं पटतंय का ? राजकीय नेत्याला कानाला धरून जेंव्हा जाब विचाराल तेंव्हा कुठे लोकशाही म्हणजे काय ते यांना कळेल नाहीतर हे गल्ली बोळातले अनाडी पुढारी त्यांच्या महागड्या गाडीतून ओम साई राम चं भजन ऐकत ,काम ना धाम करत, सोन्याने मडवलेल्या रुदराक्षाच्या माळा गळ्यात घालून . व्हाईट कपड्यात काळे धंदे विस्तारत आणिक माजत जातील.  साहेब साहेब करत लाल गाळणं आता तरी सोडा आणि विकासाच्या निधीच काय केलंत याचा हिशोब आणि जाब विचारत यांची सत्तेची धुंधी उतरावा … 

नाहीतर आज सूर्यवंशीवर हल्ला झालाय उद्या कदाचित याच भवनात कुणाचा मुडदा पडायची बेर्किंग न्यूज पहायची वेळ येऊ शकेल याची आता खात्री वाटायला लागली आहे . 


- संतोष टाकळे 

No comments:

Post a Comment