कालपरवाचीच गोष्ट काहीतरी बिनसलं होतं माझा मूड खराब होता खुप दिवसांनी माझं माझ्यावर नियंत्रण नव्हतं जे अपेषित नसतं ते घडल्यावर असं होतं मी माझ्या कामाच्या बाबतीत फालतू थेरं सहन करत नाहि विषय असा कि या सगळ्या गाबडीत माझ्या कामावर परिणाम झाला मी कधीच वैतागून काम केलं नाहि आणि तेंव्हा मी लहान सहन गोष्टीवर वैतागत होतो कुणावरही ओरडत होतो
नेहमी हसत खेळत काम करणारा हा असं का वागतो आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला शेवटी आमच्या ऑफिस म्यानेजर ने मला बोलावलं नेमकं कारण विचारलं तेंव्हा तो म्हणला संतोष कितीही काही झालं तरी कामावर परिणाम होवू देवू नकोस आज तू इतक्या माणसांच्या नजरेत खुप चांगली इमेज तयार केलीस ती बदलायला वेळ लागत नाहि अगदी सोप्या भाषेत आणि सहजपणे तो बोलून गेला आणि झटका लागावा तसा मी पुन्हा जागा झालो
हा अनुभव तुमच्या सोबत शेअर करण्यामागे एकच उद्देश आहे तुम्ही जे वर्षानुवर्षे काम करून गुडविल तयार करता ते असं एका क्षणात घालवू नका थोडा विचार करा हवं तर ब्रेक घ्या तुमचा प्रॉब्लेम काही जवळच्या मित्रांसोबत बोलून सोडवता येवू शकतो पण रागाच्याभरात तुमच्याकडून असं काही घडू देवू नका कारण एकदा वेळ गेली कि परत येत नसते आणि शेवटी काम, पैसा आणि तुमचं पद हे क्षणीक आहे.
दिनेश (आमचा अड्मीन म्यानेजर )
मित्रा Thanks Yaar
- संतोष टाकळे
Sanntosh Taakale

No comments:
Post a Comment