आयुष्यात बहिणीच महत्व काय ?या प्रश्नाच उत्तर नेमक कस द्याव माहित नाही पण मला ज्या बहिणीच प्रेम मिळाल ते अवर्णनीय आहे . मला आळू वडी आवडते म्हणून खास माझ्यासाठी अळूवडी करणारी कल्पना ,मी आजारी असताना रात्रभर उशाला बसून हनुमान चालीसा वाचणारी नंदा ताई ,माझ्या खिशात फक्त १०० रुपये पाहून ५०० ची नोट गुपचूप माझ्या पाकिटात ठेवणारी अर्चू ताई, मला कुणी काही बोललं तर पदर खोचून किमान तास भर भांडणारी अपर्णा आणि मंदा माई,आणि संतोष दादा साठी स्पेशल दुधाची चहा बनवणारी माझी पारू नाती आपण गुंफू तशी ती वळतात नात्यांचा गुंता होऊ नये म्हणून काय कसरत करावी लागते ते तुम्हा सर्वाना माहित आहेच परवाच पारूच लग्न झाल.बिदाई होताना खूप रडली तिला जाताना पाहून डोळ्याच्या कडा पाणावल्या पण मनात एक आनंद होता. तिच्या नव्या आयुष्याच्या सुरवातीचा ......
पण एक प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरिच आहे. ज्या घरात या मुलीनी जन्म घेतला. इथ त्यांना आई , बाबा , भाऊ ,बहिण , मावशी आत्या अशी कित्तेक नाती मिळतात त्या त्यांच्या हक्काच्या घरातून परक्या घरात जाताना त्यांच्या मनाची अवस्था नेमकी कशी असेल ????
--- संतोष

No comments:
Post a Comment