आमची पहिली वाहिली गाडी .................!



आज आम्ही गाडी घेतली आम्ही म्हणजे माझे जीजू संजय यांची हि पहिली गाडी अर्थात आमच्या घरातली हि पहिली चार चाकी गाडी ,बंगला ,पैसा सुंदर बायको किवा हंड्सम नवरा हि माणसाची रंजक स्वप्न असतात ती सत्यात उतरली कि नेमक कस फील होत हे त्याच त्यालाच ठाऊक असो पण आज अर्चू ताईचा आवर्जून फोन आला तिचा आनंद तसा तिच्या बोलण्यावरून ओसंडत होताच. खूप खुश झाली ती या आनंदच क्रेडीट तिने मला दिल , का दिल ? त्याची हि नेमकी स्टोरी सांगायची तर चांगल २-४ पानं लिहायला लागतील तुम्हाला माझ लिखाण आवडत असल तरी मलाही आता कित्ती लिहावं याच भान असायला हव पण तरीही थोडक्यात सांगतो

अर्चू ताईच लग्न ठरतानाचा हा प्रसंग आम्ही तिला मुलगा शोधत होतो आणि याच दरम्यात संजयच स्थळ रवि दादाने सुचवलं तस संजयला या पूर्वी मी पाहिलं होत पण हाच तो मुलगा अशी लिंक लागत नव्हती शेवटी माझा लहान भाऊ पप्पू ( अमित ) त्याला विचारल अरे तू ओळखतोस का या मुलाला तर तो म्हणाला, हो तो उदय नगरचा संज्या आपला खास दोस्त काही वेळ मी पप्पूची रीअक्शन पाहत बसलो आणि इतर चोकशी केली मुलगा तसा चांगला वाटला आणि हो नाही करता करता अखेर लग्न जमलच यात मध्ये एक सीन झाला. संजयकडचे फायनल बोलणी करायला घरी आले होते चहा पाणी झाल पण मूळ विषय कुणी काढेनात अखेर संजयच्या मावशीने सुरवात केली. लग्नाची तारीख काय ,देण्या घेण्याच कस वेगरे वेगरे विषय मागोमाग आले .त्यांना जरा थांबवून माझी थोरली बहीण म्हणाली पण आम्हाला अजून विचार करायला वेळ हवा आम्ही तुम्हाला काय ते कळवतो.तिचा बोलण्याचा सूर थोडा कडक आहे. आणि इतक्या पाहुण्यात ती बोलली हे त्या मंडळीना रुचल नाही संजय राजकारणात आहे आणि त्यावेळेस त्याच्या सोबत इतर मान्यवर मंडळी होती त्यांच्या समोर असं ट्रीट होण खरतर मलाही नाही पटलं आणि संजय कडून निरोप आला आता हे लग्न होवू शकत नाही तेव्हा तो खूप रागावला होता अगदी काही न एकूण घेण्याच्या मनस्थितीत होता काही वेळ मीही आशा सोडली आणि दुसरा मुलगा बघू म्हणत पुन्हा शोध मोहीम सुरु करायच्या तयारीला लागलो. दुपारचे दोन एक वाजले असतील रवि दादाचा फोन आला संध्याकाळी केदार दादा संजय आणि मी भेटून बोलूया अस ठरल आणि अखेर केदार दादा - रविदादा आणि आमच्या संयुक्त बैठकीत पुन्हा लग्न जुळलं एका ओळीत मी जरी हे लिहिल असल तरी इतका सोप्प नव्हत ते

मुळात माझे आणि संजयचे अनेक मतभेत होते आणि आहेतहि पण संजय मेहनती आहे धडपड्या आहे, जिद्दी आहे स्वाभिमानी आहे. अर्चू ताईला संजयला होकार दे अस मी काही वर्षांपूर्वी बोललो खरं पण तेही अंदाजे मला बऱ्याच वेळा माझा निर्णय चुकला असा राहून राहून वाटत होत. पण आज ती स्वतः म्हणाली जे मला मिळालय ते तुझ्यामुळे मला काही क्षण भरून आल. आज मी खूप मोठा झाल्याच वाटलं कारण मी तिच्या आयुष्याचा निर्णय अंदाजे घेतला होता. इतक्या वर्षात मी तिच्या बाबतीत ज्या काळजीत होतो ती आज जर कमी झाली काही असो आपल्यामुळे कुणाच आयुष बिघडू नये हीच प्रामाणिक इच्चा कारण मी आयुष्यात माणस जोडली नाती जपली कुणाला मुद्धामून दुखावलं नाही .पण जेव्हा माझ्याच अंगणातला पारिजात कुणा परक्याच्या अंगणात जेव्हा पानोपानी फुलतो तेव्हा त्याचा दरवळ त्या परिसरला ओरडून सांगत असतो माझ मुळ त्या अंगणातल्या पारिजाताच या घरीही मला पालवी फुटलेय एका नव्या बहरासाठी ...........

--- संतोष टाकळे

No comments:

Post a Comment