महामानव ….… !





आंबेडकरी जनतेचा भीमराय आणि राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमांना आज रात्री १ २ नंतर D .J वरच्या गाण्यांसोबत निघणाऱ्या भीम फेरीने सुरवात होईल येत्या ३ दिवसात आमच्या वरळीच्या मंडळात तर दरवर्षी प्रमाणे डोक्याला वात आणे पर्यंत DJ दामटवला जायील . रिमिक्सच्या रिदमवर मैं भीम राज कि बेटी हू या गाण्यांवर तरुण कार्यकर्ते आणि जुने जाणते हिडीस नाच करतात तेव्हा मात्र नक्की काय चाललाय हे लोक वळून वळून पाहतात आणि समोर बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या चेहऱ्यावरचे असीम भाव पाहून पुढे होतात काही जरा नाक मुरडत यांना बघा कसा उत आलाय. अशी खोचट टोचण लावून रस्ता काढतात तर काही काय म्हणावं यांना अशी करतात का ? जयंती आम्ही बघा महाराजांचा पुतळ्याला हार घातला चार पाच पोवाडे ऐकले एक मिरवणूक काढली कि झाली जयंती यांना D.J कशाला हवा नाहीतरी आरक्षणामुळे वाटोळ केलंय या बाबांन ?

पूर्वी मी देखील या दुसऱ्या गटात मोडणारा होतो . मला प्रचंड संताप होता या समाजा बद्दल खरतर मी शाळेत असताना यांना फी माफ का ? आम्हाला का नाही ? असा सवाल क्लार्क ला विचारला होता तेव्हा मला कळलं आरक्षण म्हणजे काय ? मुळात ते वय फार सखोल न समजणारं होतं अर्थात त्यामुळे गैरसमज वाढत गेले आणि मी कट्टर आंबेडकर विरोधी बनलो अगदी मी BA पूर्ण करे पर्यंत … पण पत्रकारितेच्या अभ्याक्रमात मी गिरणी कामगार या विषयावर काम करणाऱ्या संथेत गेलो होतो तिथ अजित , योगिता , संजय आणि इतर कार्यकर्ते भेटले आणि हे सगळेच आंबेडकरी विचारांचे निघाले काही काळ मी माझा विरोध लावून धरला. पण अजित कांबळे आणि योगिता साळवी या दोहोंनी मला आंबेडकरवाद समजावून दिला. या दरम्यान मी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आणि इतर काही पुस्तक झपाट्याने वाचून काढली . आणि मला आंबेडकर समजलेच नाही तर पटलेहि आणि मी सकारात्मक विचार करायला लागलो. अजित , ज्योती , वर्षा, योगिता ,संजय, मी आणि इतर समविचारी कार्यकर्ते अनेक वस्त्यात जावून काम करत असू नुसता म्हार शिवला तरी अंघोळ करणाऱ्या मराठा समाजातला मी, बहुजनाजांच्या वस्त्या पाड्यात जाऊन चहा पाणी घेत होतो. काही ठिकाणी तर योगिता , मी आणि अजित एका ताटात भाकरी खात असू अजित तेव्हा गमतीने म्हणे पोरा बाटलास तू आमच्यात राहून योगिता मुद्दामून सांगे जय भीम म्हणणारा हा पोरगा मराठा समाजाचा आहे. तेव्हा लोक उगाचच मग मी परदेशी असल्यागत माझ्याकडे कुतूहलाने बघत ....

ते दिवस भारावलेले होते . वस्ती वस्तीवर आमचं काम सुरु होतं योगिता , अजित यांच्या सामाजिक जाणिवां मी जवळून पहिल्या आहेत . एकदा तर मेधा पाटकरांच्या एका आंदोलनात योगिता , अजित श्याम आणि मला अटक झाली होती पहिल्यांदा मला पोलिसांनी पकडलं होत आझाद मैदानात लाठी चार्ज झाला तेव्हा मेडिया ग्रुप मध्ये आम्ही माध्यमांना आमची आजू सांगितली मुळात त्या दिवसात सच्ची सामाजिक चळवळ चालू होती जी आज थोडी विरळ आहे फायद्यासाठी रस्त्यावर उतरणारे नेते आज डझनभर उदयाला आलेत. हे दुर्देव म्हणा नाही तर गरज पण बाजारू झालाय सारं हे मात्र तुम्ही देखील मान्य कराल ..

जयंती हा आर्थिक कमाई करण्याचा मोका झालाय. हनुमान जयंती आली फाडा पावती , दत्त जयंती आली द्या वर्गणी आणि आता तर शिव जयंतीला इच्छुक राजकीय नेते पैसे देतात. शिव जयंतीला यावेळी सकाळी ८ ला पोवाडा लागला तो रात्री १ ० ला बंद झाला. वर्षभर झोपलेला महाराष्ट्र प्रेम असा एका दिवसात ओसंडून वाहत होता. ज्या व्यासपीठावर महाराजांचा पुतळा ठेवला होता त्याच व्यासपीठाच्या मागच्या अंधारात तोंडाला बाटली लावून दारू पिणारा स्वतः ला मावळा समजणारा कार्यकर्ता दिसला आणि वाटलं हातात तलवार असती तर शीरसषेद केला असता याचा मी …

आंबेडकर जयंतीला निघणाऱ्या शोभा यात्रा असोत वा शिव जयंतीला निघणारे देखावे यांची काय गरज ? जिथे विचारांची लयलूट होणं अपेक्षित आहे तिथे हिडीसपानाची रंगचेल पाहवत नाही
बाबासाहेबांच्या नावाने निळ वादळ उठवणारी आंबेडकरी जनता असो वा शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची गाथा सांगत माथा फिरल्यागत काम करणारे आमचे संभाजी ब्रिगेट व अन्य लोक असोत
मला अजूनही वाटतंय डॉ बाबासाहेब आंबेडकर असोत वा जनता राजा शिवराय आपण यांच्या नावाने नुसता सावळा गोंधळ घातला आहे हे महामानव कुणाला नक्की कळलेत किंवा समजलेत का ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे …………….

- संतोष टाकळे

No comments:

Post a Comment