क्लास..............!



१ ७ तारीख उलटून गेली तरी मी पास काढला नाही काल ऑफिसला येताना 2nd क्लास ने प्रवास केला.  आणि कित्तीक दिवसांनी गर्दीचा आस्वाद घेतला .धक्का मारत डब्यात घुसणं यालाहि स्किल लागतं  आणि एका सेकंदात रिकामी जागा शोधून ४ थ्या सीट वर खेटून बसायला कसब आयला अजून नाही विसरलो आपण मला भारी आनंद झाला. एवढ्या गर्दीतही लोकप्रभाचा अंक बाहेर काढला आणि महिला दिनावरचा वंदनाचा लेख वाचून काढला. एव्हाना चर्नी रोड आलं होतं डबा अर्धा रिकामा झालेला. मी दारात आलो आणि मागच्या 1st क्लासच्या डब्याकडे लक्ष गेलं कुलकर्णीने हात केला काय मग आज क्लास बदललात. मी म्हटलं हो फॉर अ change

हा कुलकर्णी माझा train friend नुकताच ओळख झालीय आमची जबरी माणूस अगदी business क्लास वाला. आमची रोज नव्या विषयावर चर्चा असते . अख्या डब्याला आमचं फुकट मनोरंजन आम्ही पुरवतोय गेली ३ महिने नाहीतर या 1st क्लास मध्ये कुणाच्या तोंडावरची माशी हलत नाही जो तो त्याच्यात गुंतलेला कुणी bbm वर चाट करतोय कुणी भलं मोठं इंग्लिश पुस्तक वाचतोय ( माझ्या हातातलं मराठी पुस्तक कुतूहलाने पाहत असतात यांचे चेहरे ) , कुणी महागड्या मोबईल वर गेम खेळतोय तर कुणी कानात कॉड टाकून समाधी लावून बसलेले कुलकर्णी भेटल्या पासून जरा बरं आहे नाहीतर मला अवघडल्या सारखं वाटायचं नुसतं अहो फार फॉरमल असत इथलं वागणं नुसता सीट वर बसताना कुणाला चुकून धक्का लागला तर असे react होतात हे 1st क्लास वाले  जशी १ ० ० ० रुपयाच्या पासात अख्खा डबा विकत घेतलाय यांनी …. 

मी पूर्वी दुसऱ्या क्लासनेच यायचो इथे भेटणारी सगळी माणसं आपली वाटायची माझ्या हातातलं पुस्तकं हक्काने मागून पहायची , पाण्याची बाटली घेवून दोन तीन सिप मारायाचीत , कुणाला चुकून धक्का लागला तर चालसे भाया म्हणून गोड हसयाचीत ,खूप वेळ  उभं राहिलेलं पहिल तर स्वतः उठून बसायला जागा द्यायचित त्यांच्या घामाच्या वासाची मला कधी किळस नाही वाटली कारण त्यांच्या कष्टाच्या घामाला माणुसकीचा गंध आहे . क्लास बदलला कि माणसं बदलतात काल परवा बस ने जाणाऱ्या माणसाकडे अचानक कार आली कि त्याच्या बोलण्यात जो शहाणपणा येतो तो जास्ती डार्क असतो आणि जाणवणाराहि आमच्या गावी पहिली कार घेणारा जेंव्हा कानटळ्या बसतील अशा आवाजात मुजिक लावत गाडी पैशाच्या गुर्मीत उडवत नेतो तेव्हा त्याचा माज डोक्यात जातो

असो माणसाचं वागणं आहे ते ज्याचा त्याचा क्लास त्यांनी ठरवावा पण तरीही पंचतारंकित हॉटेलात भुवया उंचावत चेहऱ्यावर so much attitude ठेवत बेचव पास्ता आणि कसलासा परदेशी सरबत पाजणाऱ्या bee professional फायदे बहादूर मित्रा पेक्षा रस्त्यावरच्या टपरीवर एक कटिंग चहा पाजणारा आपल्या जिवाभावाच्या मित्राच्याची सोबत मला हवी हवीशी वाटते कारण त्याने खांद्यावर टाकलेल्या हातात त्याच्या मैत्रीचा एक आश्वासक विश्वास असतो आणि त्याला आपल्या क्लासशी काही देणं घेण नसतं … 

No comments:

Post a Comment