परवा पुण्यात जाताना सिंहगड पकडायची होती.ऑफिस मधून निघायला आधीच उशीर झालेला. CST ला पोहचलो तर तिकिटासाठी भली मोठी लाईन गाडी सुटायला अवघी १५ मिनिटे बाकी कदाचित गाडी सुटेल अशा बेतात मी होतो. पण एकदा कुणाला तरी मस्का लावून बघावा म्हणून एकाला गाठला सर एक तिकीट काढून देणार का ? मी बिचारा चेहरा करून त्याला विचारल ,कदाचित मी सर बोललो म्हणून तो खुश झाला असावा. त्याने लगेच व्हाय नॉट म्हणत त्याच्यासोबत माझीहि तिकीट काढली आणि आम्ही दोघ पळत सुटलो ते थेट डब्यात जावून थांबलो. किमान ३- ४ तासाचा प्रवास म्हणून मी नेमही सोबत वाचनासाठी पुस्तक , किव्हा मासिक ठेवतो .कलमनामाचा ( जेष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांच हे विकली पाक्षिक) दिवाळी अंक होता हो काढून वाचायला सुरवात झाली. एव्हाना गाडीने ठाणे सोडलं होतं. खरतर अंक घेवून २ महिने झाले पण अजूनही बरच वाचायच बाकी होत.आज अनायसे वेळ मिळाला होता म्हटल पुण्यात पोहचेपर्यंत अंक निम्मा वाचून पूर्ण करायचा.राकेश शिर्के म्हणजे आमचे मास्तर यांना प्रतिक्रिया द्यायची अजून बाकी आहे. विद्या बाळ यांचा मिळून साऱ्याजणी हा स्वप्रवास लेख वाचत होतो. इतक्यात समोरून हाक आली.नमस्कार सर मी जरा चेहऱ्यावर वैचारिक भाव आणून कोण मी ?सोमोरून हो सर तुम्हीच मी मनात म्हणालो हो खरतर मी मास्तरच ह्वायचा चुकून या क्षेत्रात आलो.
मी - हं बोला.
समोरून - नातेसंबध म्हणजे काय हो ?
मी - आता याला काय सांगू मी हातातलं मासिक पालटल तर मेन पेज वर लिहिल होत कलमनामा नातेसंबंध
मी उत्तर दिल अहो या मासिकात जे लेख , कविता आणि कथा आहेत त्या या विषयावरच्या आहेत.
समोरून - अस वह्य !
मी - सुटलो बाबा म्हणत पुन्हा विद्या ताईचा लेख वाचायला घेतला.
समोरून - फार तुटक उत्तर देत राव तुम्ही.
मी - पील्ज मला वाचु द्या कि ?
समोरून - तुमच्या सोमर जिवंत माणस असताना पुस्तकातली निर्जीव माणसात तुम्हाला भारी रस दिसतो आहे.
मी - आता माझी सटकली मी म्हटल नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा.
समोरून - अहो प्रॉब्लेम असल्यावर आठवण यायला आम्ही काय मुंबई मध्ये राहत नाही .
आता मात्र हद्द झाली मी गप गुमान मासिक बाजूला ठेवल. काही वेळ गेला असेल त्याने पुन्हा मला डिवचल सर जरा तुमच पुस्तक देता का ? अहो हे magazine आहे पुस्तक नाही त्यावर तो म्हणाला तेच ते
मी निमूटपणे कलमनामा त्याचा हातात दिला आणि डोळे बंद केले. कदाचित तो अजून प्रश्न विचारण्याची दाट शक्यता होती. त्यावर १ तास गेला आणि पुन्हा हाक आली झोपला का हो सर मी मुद्दामून काही उत्तर दिल नाही. आणि एक झोप काढून घेतली जेव्हा मला जाग आली तेव्हा त्या माणसाने तब्बल अर्ध मासिक वाचून पूर्ण केलं होत. आणि तो याच मासिकातल्या डॉ.बाबा साहेबांच्या लेखावर त्याच्या मित्राशी बोलत होता. मराठा आणि ब्राम्हण समाजाच्या लोकांची मानसिकता ,अजूनही वेशी बाहेर असणारा समाज etc etc.
एक दोन वेळा तर त्याने खालच्या शब्दात त्याने मराठा आणि ब्राम्हण समाजावर टीका केली आणि मग मला काही राहवलं नाही मी स्वतः मराठा समाजाचा आहे. पण खरतर माझ्या दुष्टीने माणुसकीचा समाज सर्वात श्रेठ आहे .काही असल तरी प्रत्येकाला त्याच्या समाजाचा स्वाभिमान असतोच तो माझ्यातही आहे. मी त्याला तिथेच रोखल . सरसकट कोणावरही आपण टीका करू शकत नाही कारण समाजात जितकी वाईट माणस आहेत तितकीच चांगली देखील आहेतच कि . मुळात मी आरक्षणाच्या विरोधात आहे .पूर्वी मला या विशिष्ठ समाजाचा प्रचंड राग यायचा. त्याला कित्तेक कारणे आहेत ती अशी उघडपणे इथे लिहिता येणार नाहीत.पण जेव्हा मी भोतमांगे या दलित कुटुंबाच अमानुष खेर्लांजी प्रकरण पहिल त्या दिवसापासून माझा दृष्टीकोन बदलला आणि मी माणुसकीचा धर्म स्वीकारला .काही दिवसांपूर्वी मला मराठा समाजाकडून एक समारंभासाठी बोलावणं आल होत .पण त्यांची अट मला मान्य करता आली नाही. ती अट होती तुम्ही फक्त मराठा समाजाबद्दल बोला मी साफ नकार दिला. मला अभिमान आहे मी मराठा असल्याचा पण म्हणून मी फक्त माझ्या समाजाबद्दल बोलणं मला पटणार नाही. आज समाज ,जाती, धर्म यांच जे नागडं तांडव नृत्य चाललंय त्यावर बोलू का ? माझा प्रश्न कदाचित त्यांच्या पचनी पडला नसावा . आणि ते आयोजक आल्या मार्गी परत गेले.
कलमनामामुळे खरतर त्या समोरच्या व्यक्ती सोबत संवाद सुरु झाला आणि हळूहळू आमच्यात सुसंवादाला सुरुवात झाली . काही तासांपूर्वी ज्याच्याशी बोलताना मी जो तुसडेपणा दाखवला तोच मेघराज आव्हाड त्याच्या गावातल्या व्यसनमुक्तीच्या चळवळीचा प्रणेता आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास समितीचा अध्यक्ष आहे .आता तर मला तो नुसता बोलत रहावा असा वाटत होत. कारण त्याच्या बोलण्यात तो ग्रामीण महाराष्ट्र होता जो आमच्या मंत्रालयातल्या सरकारी अधिकाऱ्यानी आणि नेत्यांनी कधीच पाहिला नसेल.
काही वेळातच पुण्यात पोहोचणार होतो. मी त्याला कलमनामा भेट म्हणून दिला. अंक मस्तकाला लावत तो म्हणाला साहेब आज महाराष्ट्राला या विचारवंताची गरज आहे. मी हसलो आणि म्हणालो अहो म्हणून तर नातेसंबंध जपावी लागतात कारण मग धर्म , जात आणि समाज कोणताहि असो जिव्हाळा असला कि माणस आपली होतात..........
--- संतोष टाकळे

No comments:
Post a Comment