Engaged" म्हणून






"Engaged" म्हणून मी update केलं आणि likes comments यांची रिप रिप सुरु झाली काही जवळच्या मित्रांनी फोन करून शिव्या घातल्या आम्हाला नाही सांगितलस वेगरे वेगरे पण बरेच जणांनी मात्र perfect ओळखलं आणि update पाहूनही सावध पणे दुर्लक्ष केलं रस्त्यात खड्डा पाहून आपण कसे त्याला वळसा घालून जातो तसे हे शिस्तीत पुढे सटकले . तुमच्या हुशारीला दाद दिली पाहिजे मित्रानो पण अहो खरच हल्ली लग्न ठरणं तसं कठीण होऊन बसलंय मुली हल्ली फार अपेक्षा ठेवतात . गाडी हवीच , निदान ४ BHK flat हवा , एकत्र कुटुंब नको हो…

मुली कडचे काही मजेदार प्रश्न

१ बँक ब्यालांस किती आहे म्हणायचा तुमचा ?
२ काही व्यसन बिसन ?
३ मुंबईत ठेवणार ना मग बायकोला लग्नानंतर ?
४ गावी पाणी डोक्यावरून आणावं लागत का ?
५ तरी तुमच्या property ची मार्केट value किती असेल अंदाजे माहित असावं म्हणून विचारतोय ?
६ . etc etc


आमच्या कडची उत्तरं इति आमची - चंदो मावशी …

१ नुसतं घर झाडलं तरी ५ एक लाख मिळतील
२. सुपारीच्या खंडाला पण शिवत नाही पोरगा
३. मुंबई मोठा घर आहे २ खोल्यांचा इथ कशाला ठेवील बायकोला
४ . घरात ५ नळ आहेत नुसता फिरवा भदा भदा पाणी हवा तेव्हडा वापरा
५ दापोलीत जागा आहे म्हटलं माझ्या भाच्याची दापोलीत सध्या मातीला सोन्याचा भाव आलाय
६ आता काय विचारीत बसू नका पत्रिका बघा जमतेय का ? आणि ठरावा पोरगी तशी बरी आहे आणि आमचा पोरगा आमच्या शब्दा बाहेर नाही


मी नुसता गप्प बसलेला कांदा पोहे ची जागा इडली डोसा , ढोकळा ,पराठा आणि तत्सम पदार्थांनी घेतली आहे . सोमारच्या हॉटेलातून आणलेला सामोसा आमच्या राणीनीने बनवलाय हो असं उघड खोटं लोक काय बिंदास बोलतात

बाप रे डोक्यावर अक्षदा पाडून घेणं किती महादिव्यं आहे याची अनुभूती गेल्या काही दिवसातल्या कांद्या पोह्यांनी ठसका देत दाखवून दिलय ….


- संतोष टाकळे

बाकी एप्रिल फुल्ल साठी …. I AM SORRY FRIENDS PLEASE DON'T MIND ...

No comments:

Post a Comment