७ वर्षांची मनसे …. !



आज मनसेला ७ वर्ष पूर्ण होत आहेत. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राज बाहेर पडले तेव्हा प्रसारमाध्यमांच्या चर्चांना उत आला होता. राज नेमकं काय करणार याची भविष्यवाणी सगळे राजकीय जोतिष आपआपल्या परीनं मांडत होते. आणि काहीदिवसात राज ठाकरे समतेचा झेंडा घेवून मिडिया सोमर आले. जेव्हा मनसेची अधिकृत घोषणा झाली .तेव्हाचे आणि आत्ताचे चेहरे हळू हळू बदलत गेले . प्रत्येकाने आपली ओळख तयार केली . राम कदमांनी सर्वात उंच दही हांडी बांधून त्यांची राजकीय उंची वाढवली. पुण्याचे वांजळे Gold man झाले. आणि इकडे मुंबईत आमच्या आदेश भावोजींना दणका देत सरदेसाई निवडून आले. गेल्या काही वर्षात मनसेला मिळालेल्या यशा नंतर ज्यांनी राज बच्चा है अभी वो क्या राजनीती खेलेगा अस म्हणणारे तेच ते नेते आज राज ठाकरे जी को ऐसा बोलना शोभा नही देता . हम उनके इस टिपणी कि निंदा करते है ! अस शिस्तीत बोलतात अर्थात राज ठाकरे आता प्रादेशिक नेते राहिले नाहीत.

सत्ता ….
मनसेचा झेंडा जेंव्हा नाशिकच्या महानगर पालिकेवर फडकला. तेव्हा दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील म्हटलं असेल राज पठ्या करून दाखवलस. तसही साहेबांच्या मनात राज यांच्या साठी खास कप्पा होता हे वेगळे सांगायला नको. साहेबांनी मध्यंतरी राज यांच्यावर जी उघड टीका केली. ती फक्त पक्षाची भूमिका म्हणून असेल. मनापासून साहेब राज यांना अस काही बोलू शकतील यावर माझा विश्वास नाही आणि कदाचित तुम्ही देखील हे मान्य कराल. राज आजही जर शिव सेनेत असते तर काय झालं असतं ? जेष्ठ पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर साहेबांच उत्तर होतं . राज हुशार आहे त्याला हव ते त्यांनी केलंय आणि मिळवलंय भविष्यात तो चांगला नेता बनू शकेल याची खात्री आहे मला . साहेबांच्या या उत्तरात त्यांना नेमकं काय सांगायचय ते आपण समजून गेलोत .

मनसेची लोकप्रियता …...........

लक्षवेधी गर्दी , टाळ्यांचा पाऊस , घोषणांची आतिषबाजी आणि मिडियाचा TRP यातच मनसेची लोकप्रियता गुंतली आहे. राज साहेबांच्या प्रेमाखातर मनसेच्या सुरवातीला मराठी माणूस या नव्या पक्षात सामील झाला. काही विचारवंत देखील यात सहभागी होते. पण ज्या नवनिर्माणाच्या दिशेने जाणारी वाटचाल जेव्हा थोडी भरकटली तेव्हा विचारवंत आणि नामवंत यांनी काढता पाय घेतला. राज ठाकरे यांचा करिष्मा आजही तितकाच चालतोय हे सध्याच गाजलेल्या राज यांच्या सभेमुळे पुन्हा एकदा मान्य करावंच लागेल. त्यांच्या भाषणात साहेबांची लकब आहे. आणि ती वंशतह म्हणावी लागेल ते साहेबांची कॉपी करतात अस म्हणता येणार नाही . कारण जे राज ना जमलं ते मग इतरांना का जमू शकलं नाही . मनसेच्या लोकप्रियतेचं केंद्र बिंदू एकमेव राज ठाकरे आहेत. आणि म्हणून हा पक्ष अजूनही एक नेता एक निर्णय असा चालला आहे .एका पक्षात बोलके अनेक प्रवक्ते आपण सध्या झेलतो आहोत ते काय कमी आहे .माझ मत मांडायला मी का म्हणून बोल बच्चन माणसं ठेवायची.

वादग्रस्त विधानं …...........

राज ठाकरे बोलले आणि बेर्किंग न्यूज झाली नाही असं क्वचित घडलं असेल. आक्रमक आणि वादग्रस्त विधान करण्यात राज ठाकरे पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यांनी केलेले आक्षेप , आरोप आणि टीका विरोधकांच्या जिव्हारी लागणारी असते. लागलीच ब्रेकिंग न्यूज ची रिमझिम चालू होते . tv समोर लोक आ करून हे सारं पाहत असतात. कुणी म्हणत साहेब बरोबर बोलले कुणी म्हणत काय चाललय हे आम्ही यासाठी तुम्हाला मत देतो का ? साला राजकारणाची जत्रा केलीय यांनी कुणी यावं आणि पी पी करत भेळ खावून जावं, भेळी वरून आठवलं परवा म्हणे राज साहेब डोसा खायला पुण्यात जाणार होते काय हे साहेब निदान तुम्ही तरी असले पाणचट विनोद करू नका . परवाच्या सभेत राज ठाकरे म्हणाले जे काळे झेंडे दाखवतील त्यांचे लाल बावटे करून पाठवू . या विधानावर कुणीही आक्षेप घेवू नये हे दुर्देव म्हणावं लागेल. एरवी स्वतःला कम्युनिस्ट म्हणवून घेणारे आणि वृत्त वाहिन्यांच्या स्टूडीवोत थंड गार ऐ. सी तही शिरा ताणत बोलणारे नेते गेले कुठे . राज यांची शेरे बाजी फार काळ टिकणार नाही कारण सध्या करून दाखवलं आणि म्हणून दाखवलं
चा जमाना आहे . आम्ही राम मंदिर पुन्हा एकदा बांधू रे चलो अयोध्या गर्वसे कहो हम हिंदू है अशा भावनिक लाल गाजरांचा जमाना गेला.

विनाशाच्या वाटेवर राजकारण ………….

आपल्याकडे कितीही निधी दिला तरी विकास होत नाही कारण आपली विकास करायची तयारीच नाही. निधी आला रे आला कि लगेच त्या उमेदवाराचा आर्थिक विकास होतो. मारुती ८ ० ० मधून फिरणारा भाऊ अचानक टाटा सफारी कसा घेतो हा प्रश्न आपल्याला का पडत नाही . आज जर महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांची प्रामाणिकता आणि नैतिकता पैशा साठी विकली नसती. तर कदाचित आपण गुजरातच्या विकासाचे गुणगाण गात बसलो नसतो . आज महाराष्ट्रात का नाही झाला कुणी मोदी, ज्या राज्यात पाण्याचा घोटाळा करून आम्ही पुन्हा सक्रिय राजकारणात मानाने वावरतो आणि तिकडे दुष्काळात माणसां सहित गुरा ढोरांना तडफडून मारतो. अशा राज्याला विकासाची ABCD कोण शिकवणार ……. आज भारत आंतरराष्ट्रीय मनोरंजक देश अशी आपली ओळख तयार होते आहे.कारण भारतीय घोटाळे , राजकीय आरोपबाजी अशा खरपूस बातम्यांना परदेशांतून प्रचंड मागणी आहे.


मनसे कडून अपेक्षा ………

फक्त मराठी माणूस म्हणून मी मनसेकडे पाहत नाही. तर राज ठाकरे यांच्या नेतृत्व गुणांच्या आशेवर माझी सामान्य माणूस म्हणून अपेक्षा आहे

राज तुम्ही महाराष्ट्राचे विकासक नेते होवू शकाल , तुमचा धाडसी , कणखर, आणि करारीपणा विस्कटलेल्या महाराष्ट्राची घडी पुन्हा निट करू शकेल मात्र आता फक्त भाषण बाजी करून चालणार नाही तर मूळ कामाला लागलं पाहिजे ज्या नेत्यांना तुम्ही लक्ष करून टीका करता त्यांनी प्रामाणिक काम कराव या साठी मनसेचे सैनिक त्या नेत्याला का नाही घेरावं घालत ? महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिल्लीतुन पार्सल आणावा लागतो या पेशा अधिक किती वाईट दिवस आम्ही पाहायचे बाकी आहेत या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरे तुम्ही दिलंच पाहिजे कारण जसं मोठ्या साहेबांवर आम्ही जीवापाड प्रेम केलं तसंच तुमच्यावर प्रेम करणारे असंक्य चाहते आहेत. सध्या असलेल्या नेत्यांच्या गर्दीत राज ठाकरे हे नाव आम्हाला अधिक ठळक दिसतय ….

- संतोष टाकळे

santoshtakale07@gmail.com

ज्यांना इथे प्रतिक्रिया देणं शक्य नसेल त्यांनी ९०२९३२४०९० या क्रमांकावर आपला अभीप्राय कळवावा.

धन्यवाद .......!

No comments:

Post a Comment