अंधुक आकृत्या ............!



घरकुलच्या मेन गेट वर रिक्षा थांबली आणि तो धावत आला . दादा दादा करत त्याने माझी ब्याग घेतली. माझा हात धरून त्यांनी ओढत मला घरकुलच्या प्रांगणात नेलं . क्रिकेट चा डाव सुरु होता. 

गज्या ची गुगली बोलिंग चालू होती २ बॉल नंतर प्रकाश म्हात्रे क्लीन बोल्ड झाला आणि एकच जल्लोष उडाला अगदी झहीर ने एखादी महत्वाची विकेट काढल्यावर उसळतो तसाच उत्साह आणि जोशहि  

मुळात मी उशिरा पोहचलो. म्हणून बऱ्याच गोष्टी मिस झाल्या पण घरकुलच्या त्या वातावरणात मी चटकन मिसळलो . शिल्पा , आप्पा , अश्विनी ,जयश्री , आणि असे बरेच जन पाहुणे आले पाहुणे आले म्हणत आनंदाने अक्षरशः नाचत होते. यांना समाज मतीमंद म्हणून ओळखतो ती हि सगळी शहाण्या माणसांमधून वेगळी काढलेली . हळव्या मनाची ,कोवळ्या हृदयाची आणि भावनेच्या फसव्या कल्पनेत हरवलेले हे मोकळे जीव , चाळीशी पार केलेला संतोष जोशी ( परभणी एक्सप्रेस ) जेंव्हा एका दमात न चुकता लयीत मारुती स्तोस्त्र म्हणतो तेंव्हा आम्ही शहाणे अचंबित पणे नुसते पाहत राहतो. रंगीबेरंगी खेळणी जमा करणारा साठीच्या घरातला आप्पा ताई माझ्या सोबत खेळशील म्हणत मीनाक्षी म्याम ना गळ घालतो. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कितिक भाव क्षणात बदलत जातात आणि नुसतं हो म्हटलं तरी आप्पा आनंदाच्या भरात दोन गिरक्या घेत thank you ताई म्हणत खेळणी लागलीच मांडायला घेतो. दादा तू कधी आलास माझ्या दिशेने येणारा हा प्रश्न मी थोडा गांगरत ह्म्म्म अग हे काय अत्ताच तू नाही का ? पुस्तक वाचत होतीस तेव्हा बाकी कशी आहेस तू  संध्या तिला थोडा राग येतो ती चिडून म्हणते काय रे दादा माझ नाव विसरलास जा तू  इतक्यात  आणि वसंत आजोबा हाक मारतात शिल्पा काय चाललंय दादाला त्रास देवू नकोस नाही तर निघून जाईन तो ... हिरमुसल्या स्वरात शिल्पा हात जोडते दादा नको रे जावू मी तुला गाणी म्हणून दाखवते. बाई सांगा ना याला …………. 

मतीमंद मुलांसोबत माझा हा पहिला अनुभव नाही मी या पूर्वीही अनेक मुलं पाहिलेत. पूर्वी अशा मुलांना नुसतं पहिल तरी मला भीती वाटायची माझ्या एका मैत्रिणीचा भाऊ पण असाच पण तो फार हायपर होतो एकादी गोष्ट मनासारखी झाली नाही कि काय मिळेल ते उलटा पालट करतो त्याला असं बेभान झालेलं मी जेंव्हा पाहिलं त्या दिवसापासून मी अशी मुलं दिसली कि लांब पळत असे पण गुरुकुल मधल्या या मुलांनी मात्र मनात घर केलं .दिवसभर आपण काय करणार मतीमंद मुलांच्या आश्रमात मीनाक्षी शिंदे या माझ्या प्रश्नावर थोडं मार्मिक हसल्या होत्या तेव्हाच माझ्या लक्षात आलं काहीतरी भन्नाट असणार या ठिकाणी आणि नेमकं तसच झालं. पाय निघत नव्हता माझा इथून ……… 

फेसबुकच्या ओळखीतून तयार झालेला आमचा नेटफ्रेंडचा हा ग्रुप वसंत आजोबांनी तयार केलेला सामाजिक जाणीवा जपणारे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात सध्या कार्यरत असलेले एकूण आम्ही २ ० जण  जमलो होतो. घरकुलच्या निमिताने अमी पहिल्यांदा ऑफ लाईन भेटलो. विशेष म्हणजे यात ७ ५ वर्षाच्या आजी पासून १ ६ वर्षांच्या तरुणांचा सहभाग होता. प्रत्येक जन मनापासून हे सारं अनुभवत होता. या मुलांच्या आनंदात रमत होता. आज दिवसभर हि मुलं धम्माल करत होती. क्यारम बोर्ड वर अचूक नेम साधत राणी खिशात घालत सलग दोन वेळा डाव जिंकणारे  विनायक - अश्विनी, लागोरीच्या थप्पीला एका फटक्यात तोडणारे विश्वास आणि प्रभू , दोन हातात कॅन घेवून धावत पळत झाडांना पाणी घालणारा संतोष परभणीकर या सगळ्यांच्यात शिस्त , अचूकता , नेटकेपण आणि भरभरून असलेला आपलेपणा आपल्याला भारावून टाकतो . कदाचित नॉर्मल मुलं कमी पडतील यांच्या समोर इतका आत्मविश्वास आणि सहजता यांच्यात पाहायला मिळाली . 

घरकुलच्या आवारात आणि इथल्या मुलांसोबत अख्खा रविवार संपत आला होता. वीक एन्डला तसे बरेच बेत असतात . पण आजच्या सारखा एखादा रविवार या मुलांसाठी राखून ठेवायचं मनात ठरवलं आणि निघायची तयारी सुरु झाली. आमची लगबग त्यांच्या लक्षात आली असावी ते सगळे एकत्र झाले आणि त्यांची कुजबुज सुरु झाली पाहुणे निघाले पाहुणे निघाले म्हणत आम्हाला सोडायला ती मुलं गेट पर्यंत आली. याल न नक्की म्हणत हात घट्ट पकडत पुन्हा याच असा आग्रह करीत होती. थोडेसे नाराज झालेले चेहरे नियमांची मर्यादा पळत गेटच्या काठोकाठ केव्हाची उभी होती . आम्ही बऱ्याच दा मागे वळून टाटा करताना त्यांचा टाटा तितक्याच उत्साहात परत येत होता. आम्ही दिसेनासे होई पर्यंत त्यांच्या अंधुक आकृत्या डोळ्यासमोर रेंगाळत होत्या अगदी विस्कास्लेल्या पण तरीही अप्रतिम कलाकृती झालेल्या रंगीत चित्रा प्रमाणे …… 


घरकुल बद्दल … 

१ ९ ९ ५ ला घरकुलची स्थापना झाली. अगदी लहान स्वरुपात सुरु झालेला हा उपक्रम हळूहळू विस्तारत गेला आज डोंबिवली पासून १ तासाच्या अंतरावर असलेल्या खोणी गावात घरकुलचा प्रोजेक्ट सुरु आहे. २० ते ७० वयोगटातली मुलं इथ दाखल आहेत. अमेय पालक संघटनेच्या घरकुलने अजूनही सरकारी अनुदान स्वीकारलेलं नाही. जे चाललय ते हितचिंतक , मित्र मैत्रिणी ,आणि मुलांच्या पालकांनी दिलेल्या देणगीवर . 

अतिशय शांत , झाडा फुलांनी भरलेल्या आवारात घरकुलची इमारत आहे. दर आठवड्याला विझिटर येतात . आणि मुलांसोबत रमतात , काही कलाकार मंडळी देखील इथ येऊन मुलाचं मनोरंजन करतात. काहीजण त्यांचा वाढदिवस इथे येवून साजरा करतात. 

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा 







- संतोष टाकळे 

No comments:

Post a Comment