मनस्पर्शी नाती ………… !





उज्जू ताई आणि माझी फेसबुकची ओळख खूप दिवस आम्ही नुसते FB वर बोलत होतो. अचानक त्या दिवशी मी खारघरला गेलो होतो. आणि सहज तिला कॉल केला दि  फ्री असशील तर भेटूया तिनं तडक घरी यायला सागितलं.  आणि मी पत्ता शोधत शोधत पोहचलोहि . घरी ती आणि हर्ष होता. जीजू अजून आले नव्हते.  अर्जुन क्लासला गेला होता. अतिशय सुबक मांडलेलं माजघर प्रत्येक वस्तूची एक खासियत लगेच लक्षात येणारी होती . आम्ही पहिल्यांदा भेटतोय असं अजिबात जाणवलं नाही.  दि हर्षला म्हणाली हर्षु हा तुझा मामा तो बिचारा माझ्याकडे बघत बसला कदाचित मनात म्हणालाहि  असेल . हा इतक्या दिवस होता कुठे ? आज कसा काय अचानक उगवला……………. त्याच्या चेहऱ्यावर ते सारे गोंधळलेले भाव मला स्पष्ट दिसत होते . चहा -पाणी झालं आणि जीजू आलेच बंर हा माणूस देखील खूपच मन मोकळ्या स्वभावाचा बायकोचा FB वरचा Friend च आहे ना अशी typical प्रतिकिया त्यांनी दिली नाही.…………… तर, अरे बरं वाटलं तुला भेटून आधी तुझ्या बहिणीशी बोल निवांत मग आपण बोलूच ………… सारखी तुझ्या बद्दल चालू असत.  संतोष ने आज हे लिहलय  ,नवीन फोटो टाकलाय ,त्याचा कॉल आला होता रे आम्ही खूप वेळ बोलत होतो .आणि अस बरच काही ……………

डोळ्याच्या कडा किंचित ओल्या झाल्या . खरतर ………… "नाती जुळायला माणसं रक्ताचीच असायची गरज नसते". हे आज पुन्हा सिद्ध झाल होतं.  तशी माझी मानलेली बरीच नाती आहेत. कोकणातून येतांना खचाखच भरलेल्या एसटीत  बसायला जागा दिली आणि ओळख झालेली शोभा दीदी आज माझ्यावर सख्या भावा पेक्षा जास्त प्रेम करते. मी नुसत म्हटल दीदी आज हे खायचं मन झालंय दुपारच्या जेवणात  ती डिश ताटात असायलाच हवी. एक प्रसंग मला आठवतोय एका शनिवारी सहज  दीदी कडे राहायला गेलो होतो.आणि अचानक ऑफिस मधून कॉल आला. उद्या सकाळी ६. ३ ० च्या फ्ल्याइट ने तुला दिल्लीला जायचय एकाच दिवसाचं काम होत.  म्हणून इथूनच सकाळी निघू अशा बेतात मी होतो. दीदी कडे दिवसभर खूप पाहुणे होते त्यांची उठबस करून ती पार थकलेली. मी तिला म्हटलं दीदी मी बाहेर हॉल मध्ये झोपतो सकाळी माझ आवरून मी निघीन . एअर पोर्टवर तू नको उठूस इतक्या सकाळी तसही आज दिवसभर तुला जराही विसंत मिळाली नाहीये . …………ती म्हणाली बर चालेल. सकाळी मी जेव्हा बाथरूम मध्ये अंघोळीला गेलो.  तेव्हा देसी घी च्या पऱ्याठ्याचा मस्त खरपूस खमंग आला.मनात म्हटलं दीदी पण काय मस्त बनवते असले पराठे . ………मी जेंव्हा जेंव्हा  तिच्याकडे येतो तेव्हा सकाळी आमचा हा ठरलेला नाश्ता . बाथरूम मधून बाहेर आलो . तर दीदी किचन मध्ये पराठे करत होती. बाजूला चहा उकळत होता . पाण्याची बाटली भरून तयार होती , भिजलेले बदाम सोलून डिश मध्ये काढलेले होते .अगदी हात रुमाल पण मस्त घडी घालून ठेवलेला माझ्याकडे शब्द नव्हते काही बोलायला. तिच्या हातचे माझ्या आवडीचे ते पराठे खाताना गळा दाटून येत होता. आणि वाटलं कोण हि बाई खरचं काही तरी अतूट नातं असेल हिच्याशी मागल्या जन्मी .  मी ब्याग उचलली आणि खाली आलो. तर समोर अरविंद उभा …………सर ब्याग दो गाडी तयार है भाभी ने कल रात को ही  फोन करके बोल था! आपको एअरपोर्ट पर छोडना है ! जल्दी करो लेट हो जायेगा !. निमूट पणे मी गाडीत बसलो आणि दीदीला msg केला. त्यात लिहल होतं दी thanks म्हणणार नाही पण मला सुचत नाहीये काय चाललंय हे माझ्यासोबत . इतकं कसं कोण कुणी अनोळख्या माणसावर जीव लावतो. त्यावर तिचा reply आला. अरे रक्ताची नाती अतूट असतील. पण मानलेल्या नात्यांनाही तितकाच हळुवार पीळ असतो. तो अधिक घट्ट करणं मात्र आपल्या हातात आहे.

शोभा दीदी ,उज्जू दी ,मीनाक्षी मॉम अशी अनेक नाती आपसूक जुळत गेली आणि आज ती इतकी महत्वाची आहेत. कि मीनाक्षी मॉम कुठेही गेल्या तरी लेकासाठी आवर्जून खावू आणतात . एखादं नवीन पुस्तक आवडलं तर ते लगेच विकत घेवून मला पाठवून देतात . यंदा त्या संक्रांतीला बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी द्यायला विसरल्या तर अजूनही त्यांच्या मनाला ते लागून राहिलंय , दीदी ला आठवड्यातून दोन दा कॉल नाही केला. तरी ती माझ्यावर भडकते , ऊज्जु दी चा अर्जुन जेव्हा मला बिलगतो आणि म्हणतो मामा आज तुला राहाचय मी नाही सोडणार तुला मला ice क्रीम खायला घेवून जा आधी नाही तर बघ मी काय करीन..... भावना अनावर होतात अशावेळी मला ,पुढे मागे जर कुणी नात्यांच्या श्रीमंतीची यादी काढली तर  मी नक्कीच या यादीत पुढल्या क्रमांकावर असेन.

मला नाती पाऊसारखी वाटतात. ………………… रिमझिमणारा पाऊस मनात जसा पिंगा घालतो तशी काही  हळुवार नाती असतात. तर कधी या पावसाचा वेग वाढला कि नद्या- नाले ओसंडून वाहतात तशीहि  नाती असतात . आणि कधी कधी तर आभाळ फाटाव तसा पाऊस पडतो.  आणि सार उधवस्त होतं तशीसूद्धा नाती असतात .काहीहि असो पण हर एक नात्याला ओलावा असतो. हे निश्चित  आपण ठरवलं तर या ओलाव्यात नवीन नाती रुजू शकतात.  नाहीतर नुसताच  रिप -रिपणाऱ्या पावसाचा  चिखल व्हायला फार वेळ लागत नाही.


- संतोष टाकळे

फोटो - चंद्रशेखर ठाकूर

- उज्जू दी आणि माझा भाचा अर्जुन

No comments:

Post a Comment