IPL



IPL आली आणि सगळे आजी माजी क्रिकेटर फिट झाले . पैसा बोलता है भाई …. 

अजित दादा म्हणाले सामने महाराष्ट्रातच होणार तशी दादांना क्रिकेटची घरगुती परंपरा आहे. शेती खात सोडून त्यांचे काका मैदानात अधिक रमले होते हे उभ्या महाराष्ट्राने पहिल आहे. 

परवा माझ्या एका क्रीडा पत्रकार मैत्रिणीची पोस्ट होती. IPL दरम्यान वापरलेलं पाणी म्हणे गवताला घातलं कि जमिनीतच जाणार ना ?? मग काय कशाला हवा विरोध ! बाई hats off for you judgement

मी म्हणतो कशाला करायचा विरोध पण या IPL मधून जमणाऱ्या पैशातली काही रक्कम आमच्या दुष्काळ भागात चाऱ्या पाण्यासाठी देणार का हो ??

बघा जमलं तर ….

कारण जर red light एरियात शरीर विकणाऱ्या बाया त्यांच्या एका दिवसाची कमाई दुष्काळातल्या शेतकऱ्याला देऊ शकतात


तर ……………


धक धक इंडिया करत करोडोच्या जाहिराती आणि लाखोंच्या घरात स्वतःचा लिलाव करणाऱ्या तुम्हा कमर्शियल खेळाडूंना काही हजाराची मदत करणं तस काही अशक्य नाही …


- संतोष टाकळे

No comments:

Post a Comment