आज त्याचा निस्तेज चेहरा मला भयाण वाटत होता. कदाचित काहीतरी बिनसलंय त्याचं नाही तर गरम खिचडीवर तुटून पडणारा निल्या आज भूक मारावी म्हणून घास घशात ढकलत होता. मला राहवलं नाही ८ - १ ० घास खाऊन झाले असतील मी पाण्याचा ग्लास पूढे करत म्हटलं निल्या काय झालंय नेमकं सांगशील का विस्कटून त्यावर एक आवंढा गिळत म्हणला संत्या जॉब गेला माझा अचानक मेमो दिला मला माझ्यासोबत अजून काहीजण आहेत त्यांना पण काढलंय वृत्त वाहिनीच्या हेड ऑफिस मधून हा निर्णय झालाय जॉब गेल्याचं वाईट नाही वाटलं मला पण त्यांनी performance not good remark टाकलाय त्यानं फार अस्वस्थ आहे मी साला रात्रीचा दिवस केला . आणि पहिली ब्रेकिंग न्यूज दिली. जीवावर बेतून आतली बातमी काढली त्यांनी असं कारण देवून बाहेर काढावं
काही क्षण भयाण शांतता निल्याच स्किल आहे खरतर पत्रकारितेत त्यांनी आज पर्यंत केलेल्या अनेक बातम्यांनी लोकांना न्याय मिळवून दिलाय मी म्हटलं निलू मी मेहता वकिलांना कॉल करतो केस करूया news channel च्या विरोधात खिचडीचा ढेकर देत निल्या सिगारेटच्या पाकिटावर दोन बोटं वाजवत म्हणला नको झाली तेव्हडी शोभा खूप झाली. बघूया मिळेल कुठेतरी काम एक दम मारून झाल्यावर त्याच्या लालशार डोळ्यांमध्ये प्रचंड राग धगधगतांना दिसला. मी पुन्हा हटकलं मला वाटत आपण अन्याय सहन करू नये पत्रकारांनीच अशी माघार घेतली तर काय impact होयील society मध्ये …
खिडकीच्या हिरव्या ग्रेनाईट वर लास्ट दम मारून झालेली सिगारेट विझवत निल्या म्हणला हिच्या सारखंच आहे आपलं light केल्या केल्या दोन तीन दमात आपण अर्धे होतो . आणि फिल्टर जवळ आला कुठे विझवू म्हणून डोक्यात विचार येतो मिळेल त्या जागेवर दाबून शांत करावं असं झालंय सगळं …
मला निल्याची सगळी गणितं माहित आहेत गेली चार वर्ष आम्ही एकत्र राहतोय नुकताच त्याच्या बहिणीचं लग्न झालंय नाही म्हणतांना आजच्या घडीला निल्याच्या अंगावर होम लोन आणि इतर मिळून १ ० ते १२ लाखाचं कर्ज आहे. दर महिन्याचा पगार वाटण्यावारी जातो. महिन्याच्या अखेरीला निल्या हमखास विचारतो काय रे परवा त्या मासिकातल्या कथेचा आलेला चेक क्लियर झाला का ? १ ० ० ० रुपये देना असतील तर अरे साला दुपारी वडापाव खायला पण पैसा नाही खिशात …
प्रसिद्धी , नाव ,मान -सन्मान असं बरच काही जमा आहे . पण नाव आणि प्रसिद्धीच्या गोड चटणी सोबत भाकरी मोडून खाता येत नाही त्याचं काय ???
- संतोष टाकळे
पोस्ट काल्पनिक असली तरी यातले बरेच संधर्भ सत्य घटनेशी निगडीत आहेत . याची कृपया नोंद घ्यावी … निल्या हे पात्र मी रंगवलं आहे ते अस्तित्वात नाही

No comments:
Post a Comment