समग्र महाराष्ट्राची इज्जत चव्हाट्यावर ………… !



काल मराठी भाषा दिन होता. अभिमान आहे मला मराठी असल्याचा , गर्जतो मराठी , मी मराठी , मराठ्याची जात , मर्द मराठा अशा अनेक उत्तेजक सुविचारांनी FB च्या वॉल ओसंडून वाहत होत्या आणि इतक्यात राज ठाकरेंना कुणी तरी दगड मारला अशी बातमी आली .अर्थात पहिले आपणच असे जाहीर करणाऱ्या वृत्त वाहिनीच्या  FB update वर हि ब्रेकिंग झळकत होती. मी काही reports बनवत होतो आणि इतक्यात  मंगेश धावत आला. तोड फोड झाली साहेबांना कुणी तरी दगड मारला. मी म्हटलं अरे पण आपले साहेब नाहीत या जगात त्यांच्याकडे वर मान करून बघायची कुणाची हिम्मत नव्हती. मग कळलं हा नवोदित साहेबांन बद्दल बोलतोय . reports जरा बाजूला सारून मी माझ्या चेंबरचा TV ऑन केला. आणि scroll फिरताना दिसला. राष्ट्रवादी आणि मनसेची जुंपली, कार्यकर्त्यांचा राडा , राज ठाकरेंची सुरक्षा वाढवली. उद्धव ठाकरेंनी घेतली राज यांची बाजू  ,नवाब मलिक यांनी केला निषेद ,  धडाधड ब्रेकिंग update होत होती. आणि मी  TV बंद केला. रोज action picture बघायचा कंटाळा आलाय आता. मागे राज ठाकरे एक पात्री प्रयोग करता आहेत हि टीका तशी काही वावगी नाही. कोकणातल्या सभेत राज ठाकरे बेताल बोलले ते आपण पाहिलंच असेल ,एका जेष्ठ पत्रकारांनी केलेल्या research ला अस ग्राह्य धरता येणार नाही. कोकणात जागेचे व्यवहार सोन्याची कोंबडी विकावी असे होतायत हे मान्य ,लोक नवश्रीमंतीच्या फेसावर उडता आहेत हे खरं उघड सत्य आहे. पण आपण नेमकं कोकणात काय नव निर्माण केलत. याची यादी जाहीर करा आणि मग एकपात्री प्रयोगाचे हाऊस फ़ुल्ल शो गाजवा आमची काहीच हरकत नाही. 

मुद्दा दुसरा … 

शाब्दिक फटके बाजी आणि महाराष्ट्राची  दैना 

तोंडाला येयील ते बरळत राहा आणि ४ एक डझनभर झालेल्या वृत्तवाहिन्याच्या ब्रेकिंगन्यूज चे हिरो व्हा, सध्या असल्या अभिनेत्यांची  पिकं महाराष्ट्रात सुखा दुष्काळ असूनही जोमानं आलीयत . विषय आहे तो कुणी कुणाला मोठ केलं अजित दादा आणि पवार काका असा आक्षेप घेताना राज मात्र विसरले जर साहेब नसते तर कदाचित त्यांनाही ओळख मिळाली नसती . राजकीय background नसेल तर कार्यकर्त्याला काय घासावी लागते हे तुम्हाला आता आम्ही नवीन सांगायला नको . साहेबांनी सर्वसामान्य माणसाला कुठच्या कुठ पोहोचवलं तो चुकला तर त्याला कान धरून थोबडल म्हणून ते पहिले आणि शेवटचे साहेब झाले. नेतृत्व आई -बाबां कडून घेता येत नाही ते तुमच्या व्यक्तीमत्वात असाव लागत नाही तर आधाराच्या  सोबती नेत्यांची गर्दी वाढते आणि एकाच जागी इतके साहेब होतात. कि कार्यकर्ता गुदमरतो बावचळतो आणि मग बाहेर पडतो.

हे जे काही चाललंय  ते अराजकीय आहे. मी राज्यशात्र घेवून BA केलंय. भारतीय आणि परकीय अशा दोन्ही political विषयाचा अभ्यास करता आला पण मला वाटत. हा अभ्यासक्रम बदलायला हवा आताच्या राजकारणासाठी काही उपयुक्त असणारे धडे यात add करावी लागतील त्यात , राडा आणि त्याच्या पद्धती , सेटिंग विथ लॉबिंग , प्रसिद्धीच गणित ,साहेब होण्याची गुणसूत्रे , भारतीय संविधान तोडण्याचे 1001 पर्याय , घोटाळ्याचे पचन तंत्र , असे अनेक नवीन धडे मी लिहितोय लवकरच ते शिक्षण मंडळाकडे सुपूर्त करीन 

काका मला वाचवा म्हणालात तरी आज तुम्हाला कोणाही वाचवू शकत नाही कारण , संसदेतच्या विकास तक्त्यात कितीही आकडे खेळले तरी आज महागाईने सामान्य माणसाच्या पोटावर जी लाथ मारली आहे तिची कळ पोटातून मस्तकात पोहचलीय . आम्ही पेटून उठलो तर दगड नाही गोळ्या घालू मग शिंदे काकांना आमच्या दहशदवादाचा काय रंग ठरवायचा आहे तो ठरवुदे 


चित्र कधीच बदलणार नाही इतका मी निराशावादी नाही मात्र जर हे थांबल नाही तर मग जे चलचित्र तयार होयील ते अत्यंत भयानक भायावाहक असेल हे तुम्हाला अधोरेखित करून सांगायची गरज नाही

- संतोष टाकळे 


No comments:

Post a Comment