
चर्चगेटला त्या तिघी रोज दिसतात.लोकं काम संपवून घरी जायला निघालेले असतांना यांच्या वर्किंग अवर्सने मात्र नुकताच स्टार्ट उप घेतलेला असतो . प्लाटफॉर्मच्या अगदी सुरवातीच्या बाकांवर त्यांच्या खास लकबीत बसून कस्टमर शोधित फिरणाऱ्या नज़रा ..... ग्लॉसी पावडरचा हलका थर , गडद शेडची लीपस्टिक , डार्क केलेल्या भुवया , यांनी उठून दिसणारे यांचे चेहरे ......केसातन बाहेर खेचलेल्या बटांनी बोल्ड झालेली यांची इमेज .....विशीष्ट प्रकारात दूमडन सिग्नल म्हणून छातीवरून काहीसा ढळलेला पदराचा काठ . आणि विशेष म्हणजे चेहऱ्यावर धीटपणे वागण्याचा सराईतपणा .आज वुमन्स डे म्हणून नव्हे तर प्रत्येक सणावारी त्यांच जरा जास्ती निटसर आवरून येण. एकमेकींशी बोलतांना निखळ हसण.….... तरण्या -तरुण दलाल पोरांशी मस्करी करण .......................जुन्या कस्टमरशी वाद घालीत लाडात येणं. आणि अगदीच कुणी फालतुगिरी करतोय अस वाटलं जरी तरी त्याला लागलीच तिथच झापण. थोडक्यात काय तर परिस्थिती कशीही असली तरी जगण्यातला आनंद स्वीकारत रहाण .....मनात कितीही प्रश्नांचा काहुर माजला तरी डोळ्यात मात्र हे सगळ निभावुन नेण्याची ताकद असण .तारुण्य ढासळत असतानांही जे शिल्लक आहे त्याला तितक्याच दमान बाजारात मांडणं , कधी कस्टमर्स ची रीघ असतांना दोन घास खाण्याची फुरसत नसण . तर कधी एका एका गिऱ्हाईकाला पटवण्यासाठी जीवाचा आटा पिटा करण दलाल ,गर्दुल्ले , चर्सी , बेवड्यांच्या नादाला तोंड देता देता खुपदा पोलि सांचीही चिरीमिरीची सोय करणं. रोजच लॉजच्या शिड्या चढतांना . प्रत्येक पायरीगणिक कस्टमर खुश झाला पाहिजेल म्हणूनची इच्छा वाढवत मजले चढण . आणि रात्र सरता सरताकेव्हातरी पुन्हा त्याच पायऱ्या उतरतांना आंबलेल अंग झाडीत झोपेची डुलकी उडवत नको हा जन्म पुन्हा म्हणीत या जन्माचा वीट येणं .पर्स मधल्या नोटाना त्या येण्याआधीच पाय फुटलेले असतात म्हणजे पुन्हा रात्री उभ रहाव लागणार हे ठरलेलं.
आता म्हणून यांचा आदर्श वैगरे घ्या अस म्हणता येणार नाही .
पण यांच्यातली हिम्मत मात्र घ्या बायानो ,जगतांनाचा संघर्ष तोडण, आयुष्याला प्रत्येक आव्हाना समोर नेटान खंबीर उभं करण , उलट तुम्ही मात्र तुमच्यावर अन्याय होतोय हे उघड असतांना त्यावर पांघरुण घालीत कन्हत बसताय , समाज काय म्हणील याची बोडकी भीती बाळगताय , भोग- नशीबाला दूषण देत टुकार ओझी उरावर घेत जगताय अशा कित्तेकींनो तुम्ही पेटून उठाल तेंव्हाच बदल शक्य आहे .
बाकि मावळणाऱ्या संध्याकाळी फुलणाऱ्या या फुलांचा सडा असा रोजच सांडतो .विर्याच्या चिखलात दोन- चार नोटांच्या पैशा पायी .म्हणून त्यांनी पुन्हा उमलंण थांबवलय का ?
*फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा
© Santo
