बारावीचं वर्ष मुंबईतल्या कीर्ती कॉलेजमधल.... एक तर गावातून थेट शहरात आल्यावर उडालेला गोंधळ त्यातही किमान कीर्तीचा क्राउड तसा हेल्पिंग नेचरचा होता म्हणून तितकसं जड गेल नाही म्हणा. पण इथ एक मोठा लोचा म्हणजे आर्ट्स मराठी मिडीयम मधून नाही म्हणजे तुम्ही लेक्चर इंग्लिश मधेच अटेंन्ड करा आणि पेपर हवा तर मराठी मधून लिहा .एकतर इंग्रजीच आणि आपल वाकड त्यात history -geography सारखे विषय इंग्रजीमधून शिकणं म्हणजे आधीच हौस आणि त्यात पडला ............... अशी गत history च्या मॅम तर पानन -पान नुसत्या वाचून दाखवायच्या ५ - ५ मिनिटांने नुसत गॉट इट म्हटलं कि आगे बढो................ पोरांना काय कळल नाय कळल त्यांना काही देणं घेणं नसे . आणि वर दुपारी रीसेस नंतर चा यांचा तास शिवाय क्लास रूम पण टॉप फ्लोअर सी फेस view असलेली . वाटल वर्ष समुद्राच्या लाटा मोजण्यात जाणार बहुतेक कारण बाकी सगळ तसही डोक्यावरूनच जात होत . एकदा तर डोळा लागला चक्क आणि त्यांच लक्ष गेल. सेकंड लास्ट बेंच आर यु स्लीपिंग इन द क्लास नो नो मॅम then explain me what i am talking about. अठराशे …...... साली उत्खलनात सापडलेल्या ……. talk in English .................. mam but i am from Marathi medium आणि तुम्ही इंग्लिश मध्ये वाचून दाखवलेल आम्हाला मराठी वाल्यांनाच काय English वाल्यांनाही कळत नाही . सगळ्या क्लास भर लाफ्टर .................... ओह्ह ओके विल explain इन हिंदी सम टाईम . पण मग मात्र त्या नेहमी हिंदी मध्ये सारांश सांगत राहिल्या. कळो न कळो हजेरी नसेल तर परीक्षेला बसू देणार नाही म्हणून बहुतेक सगळे तास भरता भरता वर्ष संपत आल. आणि परीक्षा लागली . १० वी च्या बोर्डाच्या वेळी होती इतकी भीती १२ वीच्या बोर्डाला नसली तरी धाक- धुक होतीच. आणि टाइम टेबल डिक्लेअर झालं .
परीक्षेच्या आधी उरल्या सुरल्या दिवसात जेमेल तेव्हडा अभ्यास करावा म्हणून सिद्धिविनायकाच्या गार्डन मध्ये संध्याकाळी दिवे लागेस तोवर उजळणी सुरु झाली . राजेश - परीकक्षित- मेघा - मंजुळा ह्या आमच्या मराठी वाल्यांचा ग्रुप एकत्र बसून घोकम -पाठ वैगेरे चालू झाली. एकाने अपेक्षित मधली प्रश्न उत्तरं वाचायची तर एकाने ती इतरांना समजावून सांगायची. रिविजन चा हा फॉर्मुला आमच्या प्रायवेट क्लासच्या मनीषा पाटील म्यांमचा .
सतत २० दिवसातले ८ तास अशी पूर्वतयारी ज्या मंदिरा समोर केली त्या सिद्धिविनायकाच दर्शन घेवून पेपर ला जाऊया अस शेवटच्या दिवशी ठरलं आणि ज्या माळी काकांनी आम्हाला या गार्डन मध्ये वेळी अवेळी येण्या जाण्याची मुभा दिली त्यांचे आभार मानत सराव सत्र संपल आणि तीन दिवसांनी परीक्षेचा दिवस उजडला त्यावेळी काही मोबाईल वैगरे नव्हते म्हणून ठरल्या ठिकाणी सकाळी ५ च्या सुमारास जमतील ते मंदिरात काकड आरती नंतर पाहिलं दर्शन घेतील सोबत गणेशाचे चरणस्पर्श करण्यासाठी हॉल तिकीट न चुकता आणा असा नियोजित प्लान . पण प्रत्यक्षात परीक्षित , आणि राजेश ठरल्यावेळेत पोहोचलेले .परीक्षार्थी आहोत हे कळल्या वर स्पेशल गेट न प्रवेश देत . थेट गाभाऱ्या समोर आम्हाला उभं केलं गेलं आणि अगदी २ मिनिटात मुख्य गाभाऱ्याचे दरवाजे उघडले (आजवरच्या दर्शनातल हे कायम लक्षात राहणार दर्शन ). तेंव्हा खरतर अतीव देवभक्त होतो म्हणून जरा जास्तीच भारावून जाण वैगेरे झालं खरतर .................एकूण ४० एक परीक्षार्थीची गर्दी होती तिथे ............ कित्तेकांचे पालकहि होते सोबत होते .त्यातले काही सोनू चांगला साष्टांग नमस्कार कर हो भरघोस यश माग बाप्पा कडे ..................,तर कुणी मने मेरीट मध्ये आलीच पाहिजेस असा आशीर्वाद माग मनोभावे गजानना कडे अग बुद्धीचा देवता आहे तो त्याला शक्य आहे ते आणि आम्ही जे केलंय त्यातलं येऊदेत फक्त वर्ष वाया जाता कामा नये.
पेन -प्याड- आणि हॉल तिकीट घेऊन परीक्षा केंद्रावर जेंव्हा पोहचलो तेंव्हा आई - वडील - भाऊ -बहिण अशा गर्दीतून वाट काढत अच्छा -ओके -हो आहे लक्षात- वैगेरे अशा सूचनांच्या गारोळ्यातन पोरं एकदाची बाहेर पडून येतांना दिसली तेंव्हा वाटलं आपल्याला कोणी नाही आल अस चीअर अप करायला. सुशिक्षित घरातल्या लोकांची काम हि आपल्या इयत्ताही घरच्यांना ठावूक नाहीत त्यांनी केंद्रावर याव म्हणजे जरा जास्तीच अपेक्षित केल जातय . इतक्यात बापुन (मोठे भावोजी आणि माझे dad सुद्धा ज्यांनी गेली १२ वर्ष मला सांभाळल ) सारख कुणी तरी येतांना दिसल. बापू तुम्ही कसे काय इथ .......थंड पाण्याची बाटली समोर धरीत म्हणाले परीक्षा म्हटली म्हणजे तुला १० -१० मिनिटांन पाणी प्यायची सवय. ही बाटली घरीच विसरून आलास ना . वेळ झाली असेल जा नीट ली पेपर . त्यांना घट्ट मिठी मारत thank यू dad म्हटलं आणि परीक्षा केंद्राकड़े वळलो.
आज १२ विचा पहिला पेपर म्हणून आठवणीतलं हे काही
मुळात तुमची मेहनत महत्वाची बाकी फक्त नवस वैगरे करून कधी यश मिळत नाही . मंदिरात जायचंच असेल तर सकारात्मक उर्जा घेऊन येण्यासाठी जा तिथल्या प्रसन्न वातावरणात मन शांत करून या साष्टांग नमस्कार घालतांना तुमच्यातल्या ओवर confidence ला नमवून फक्त आत्मविश्वास घेऊन वर उठा. शेवटी

No comments:
Post a Comment