मावशी काय हाय काय म्हणत तीन दारतून आत डोकावल आणि तिच्या हातातल्या प्लास्टिक पिशवीतल्या भातावरच्या बूंदीच्या लाड़वाकड़ नजर गेली . नेमकी जेवताना आलीस बाय अस अजुन थोड़ अधिक कमी ऐकवत ताईमाँ न दुपारच्या दोन चपात्या वर आताची ताजी मेथिची भाजी दिली तरी ती घुटमळत तिथच उभी अजुन काय पाहिजे बाय आता...... तिन पापड़ा कड़ बोट दाखवत पुन्हा आर्जवि चेहरा केला. एक आख्या तूकड़ा घेतलांन तेव्हा कुठ ती गेली.
पण तिच्या पिशवीतला लाडू मात्र काही काळ माग घेवून गेला .
हेच ते दिवस कडाक्याची थंडी .....शाळेतन आल दप्तर टाकल की थेट मळ्यात ..... मुळा- माठ -पालक - कोथिंबीरिच्या जुड़या बांधायच्या पाटातल्या व्हावत्या पाण्यात त्या स्वछ धुवायच्या आणि हारा भरायचा अगदी काठोकाठ .....मग सकाळी आई चारला उठून पाणी तापवायची इतक्या हुडहुडनाऱ्या थंडीत अंगावर पाणी घेण म्हणजे काय ते ज्याच त्याला माहित ........बाकि सगळ उरकेपर्यंत वैलावरचा चहा उफाळून यायचा मग डायरेक बशीत त्यांचे दोन चार भुरके मारले आणि मग गरम स्वेटर चढवला की चिंबुळ नीट बरोबर ठेवत हारा डोक्यावर घ्यायचा . आणि मग हातात सकळच्या काळोखात मोकाट कुत्र्याना हटकायला काठी घेत पायात चपला सारित अंधारातल्या रास्त्यान दापोलिच्या दिशेनं लगबगिने पावल टाकित उजाडायच्या सुमारास भाजी घ्या भाजी ची कमर्शियल advt सुरु करायची.बऱ्याचजणी तर आईचा आवाज ऐकूनच गलका करायच्या कुणी नुसतीच् भाजी उलटी पलटी करी घ्यायच तर काय नाव नाय पण उग्गाच भाव करायच्या ....तर उलट एखादी बाई एकदम चार चार जुड़या घेई. आशाना मग आई करंट स्पॉट ऑफर म्हणून कधी अजुन एक जुडी अशीच फुकट देई तर कधी तिच्या नेहमीच्या गिराईकाची स्पेशल रिक्वेस्ट म्हणून आणलेल्या बचकी भर घोळीच्या ढिऱ्यांचे -केळफुलाचे........वाटिभर साजुक तुपाचे ......डबाभर दह्याचे ती कधी पैसे घेत नसे ......अशा खास घावुक आणि फिक्स गिर्याइकाकडे मग आम्हाला चहा ठररेला सोबत खारी, टोस्ट ,बिस्किट आणि गोड धोड .....अस बरच काही ........पण खायला तितका वेळ नासायचा कारण खात बसलो तर दूसरा भाजी वाला पुढ़ जायचा आणि आज काय वाहिनी येत नाहीत म्हणून ठरलेले गीराहाईक पण त्याची टोपली खाली करायचा म्हणून मग नुसता चहा पोटात ढकलून बाकि सगळ पिशवीत जमा करीत आधी माल संपवायचा आणि मग उन्ह थोड़ी सरळ पडलित की घरी आल्या आल्या मागच्या दारात पिशवी पालथी घालायची ....जे असेल त्याच्या चार वाटण्या व्ह्ययच्या मघाशी मागायला आलेल्या त्या पोरिच्या पिशविताला लाडवा सारखा लाडूही या पिशवीत यायचा अनेकदा आणि मग त्याचा अधिक हिस्सा मिळावा म्हणून त्याचे तूकड़े पाड़ताना आपला भाग जास्ती पडेल याची केलेली हेराफेरी आजही आठवते आहे .
मघाशी तिच्या पीशवितल्या भातात अड़कलेला तो लाडू एव्हाना वाटून खावुनही झाला असेल पण त्याच्या त्याच बूंदीच्या बांधणीत घट्ट वळून ठेवलेल्या आठवणी आज पुन्हा मोकळ्या झाल्या आणि त्या दिवसांची ती अविट गोडी पुन्हा मनात घोळत राहिली कितीतरी वेळ ........... सध्या सुखवस्तु घरात खावुचे डबे तुडुंब भरलेले असतांना आणि आज हवी ती मिठाई घेता येण्याची परिस्थिती असतांनाही त्या एक तूकडा लाड़वाची किंमत मात्र कधीच अवाक्यात न येणारीच.
© Santo