ठिकाण -कर्जत स्टेशन
या कर्जत च्या वड्याला साधी पीठाचीही चव राहिलेली नाही.या माणसाला दोन सांगितले आणायला तर चार वड़े घेऊन आला .वेधळा कुठला जरा म्हणून डोक वापरायच काम नाही.इतक्या वर्षात नाही वापरल आता काय नुस्त केस उरलेत म्हणून डोकं .....
दुसऱ्या काकू -तुम्ही खुप खमंग वड़े करता वहिनी.
पहील्या काकू -हो तसे होतात माझ्या हातचे बरे.
दुसऱ्या -बरे नव्हे उत्तम होतात .तुमच्या हळदी कुंकवाला नाही का केले होतेत . वर दोन बांधूनही दिलेत.नितीन ला फार आवडले हो म्हणाला आई तू पण कर एकदा. मला ते तळण म्हटल की वैताग .बर झाल विषय निघला तुमची पाककृती सांगा ना.
पहिल्या काकू -सोप्पय हो वहिनी . बटाटे बेतान उकड़वायचे .टोपात हो कुकरला नाही .कुकरला नुस्ता चुरा होतो . आल -लसुण- मिर्ची वैगरे ची जाड्सर पेस्ट वरून थोडा कडीपत्ता .........मग बेसनाचा घोळ करायचा. त्यात थोड़ तेल घालायच. बेसन ते सम्राटच घ्या आपल्या अंबिका वल्याकड़ मिळत प्याकेट .पीठ चांगल घोटूंन घ्या .मग काय तेल गरम करा बेतान आणि सोडा वड़े
दुसऱ्या -अहो आणि ती सोबतची चटणी ....
पाहिल्या काकू -ती ह्यांना येते पुदीना बीदिना घालून करतात ते ......चटण्या बिटन्या करायच्या असतील तर आम्ही यांनाच सांगतो ...अहो मसाला पण कसला गंधा सारखा बारीक़ करतात . एकदम दोन आठवडयाला पुरतील एव्हडे कांदे आणि खोबर दिल की तास -दीड तासात दोन डबे मसाला तयार .रिकाम्या हाताला काहीतरी काम नको का.
दुसऱ्या काकू -अहो नार्वेकरांना नुस्ता चहा ओतून घ्या म्हटल तरी डोळे वाटारुन बघतात .
पहिल्या काकू -आता काय घश्याखाली उतरत नाहियेत वड़े द्या टाकून पुन्हा शहणपणा करत काय आणलत तर बघा .
*माणुस असो वा पदार्थ जरा जरी ढासळला की त्याला कायम दुय्यम स्थान मिळत.
*फोटो सौजन्य - गुगल
© Santo
No comments:
Post a Comment