चवीचा हात ……!








काल सुर्वे सोबतच्या आस्वादि खादाडीन अनेक सुगरण हातांच्या चवींच्या आठवणी तर्तरुन आल्या .अगदी मिसळीवर तरंगणाऱ्या रश्या  सारख्याच  आजवर जे चवीचं खाल्लंय त्यात कित्तेक हात आज काळाच्या पडद्याआड गेलेत पण काल बसल्या पानावर त्याच तोडीच्या चवीचा घास मोडताना मात्र कंठ दाटून आला आणि जिचा चेहरा क्षणाधार्त  डोळ्यासमोर उभा राहिला त्या बद्दल थोडसं …………………

चिपळूणात जायच ठरलं आणि बेबी ताईला फोन केला कि तिचा पहिला प्रश्न काय करू जेवणात ………आणि मग आमच्या फर्माईशांची गर्दी वाढत जाई पण ती मात्र आनंदानं  एकहाती सगळं  करी ……………चिपळूणात उतरलं कि अधे मधे कुठेही वेळ वाया न घालवता थेट बेबी ताईच घर गाठायचं पायावर पाणी घेईस्तोवर पानं लागलेली असायची   तिनं केलेले तांदळाचे फुलके …………डाळींब्याची उसळ …………विना फोडणीच वरण …………….बेदाणी भात त्यावर तुपाची धार, लिंबाच लोणचं आणि तिळाची चटणी अहाः आता लिहितानाही तोंडात पाण्याचे झरे फुटलेत ………शर्टाची बटणं ताणेपर्यंत पोटात गेलं तरी आणिक दोन घास खाण्याचा मोह आवरता येत नसे …………अर्थात तिच्या हातात साक्षात अन्नपूर्णा होती. हे वेगळं सांगायलाच नको …………अगदी ती जाण्यापूर्वी २ महिन्या अगोदर तीन खास बोलावून सगळ्यांना जेवू घातलं पानात वाढतांना कधीही कमी नसलेला तिचा हात त्या दिवशी मात्र काचरत होता . कदाचित हे शेवटचं वाढप आहे. हे दिसलं असावं तिला ………………… 
पण कालचं सात्विक जेवण खाताना आणि एक ठिकाण आठवलं ते म्हणजे दापोलीतलं फाटक यांचं "प्रीतिवर्धन " कार्यालय इथला मसाले भात …………वाटाणा उसळ …………….कोशिंबीर ………… मट्टा , जलेबी - बुंदीचे लाडू याची चव काही ओर्रच ……………पत्रिकेत स्थळ -"प्रीतिवर्धन मंगल कार्यालय " दिसलं कि ते लग्न चुकण अशक्यच कितीही गर्दी असली तरी लोक इथून जेवल्या शिवाय जात नसत आणि आजही जात नाहीत कारण तीच quality आणि तीच टेस्ट आजही इथे टिकून आहे. 

खाण्यावर लिहायचं म्हटलं तर अनेक ठिकाणं आणि कयिक आठवणी उतरवता येतील पण जितकं लिहावं तितका जीभेला पाझर फुटावा अस अस्सल चवीचं आजवर खाण्यात आलंय पण आजही वरण भात आणि त्यावरच्या साजूक तुपाचा अप्रूप टिकून आहे . याचं समाधान आहे कारण या वरण भाताच्या "मुदित "आपली सारी मराठमोळी खाद्य संस्कृती एकवटलीय.



© Santo


2 comments: