काल एका महाराजांच्या दर्शनार्थ भगव्या साड्या परिधान केलेल्या मध्यम वयीन महिलांचा मोठ्ठा जत्था पाहिला रात्रीचे १० सव्वा १० वाजले असतील. सकाळी ऑफिसला जाताना देखील हि रांग गच्च भरलेली होती. तरुण मुल -मुली- लहान पोरं - बापे बाया असा हरएक वयातला भाविक बाबांच्या चरणस्पर्शच्या आशीर्वादासाठी ताटकळत असतांना दिसला यातले काही महाराजांच्या नावाने जयघोष करीत होते . तरुण कार्यकर्ते (मुली - भगव्या सलवार कमीज ...) मुलं - भडक भगवा शर्ट /कुर्ता / टी शर्ट ) त्यावर महाराजांचा फोटो असलेला ब्याच कपाळी केशरी टिळा गळ्यात लखलखती पांढऱ्या मण्यांची माळ असा सात्विक पेहराव करून भाविकांना कंट्रोल करण्याचं काम करतांना दिसलीत. या प्रत्येकाच्या हातात विभागवार भक्तांच्या याद्या होत्या. आता विक्रोळी मंडळ जाईल , त्यापाठोपाठ मालाड मंडळ मग वडाळा ,आणि मग कळवा मंडळ ……………… नंबर जवळ आलेल्या मंडळांची चुळबुळ वाढे यात नवीन आलेल्या साधकाला जुना साधक दर्शनाचे नियम पुन्हा पुन्हा समजावून सांगे तिथ गेल्यावर अस कर ………तस कर………… हे करू नको ………. इत्यादी इत्यादी ………………
आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात माणूस अशा बाबांच्या प्रभावात नक्की काय शोधतोय ? …………… जिवंत बाबाच्या पादुका आणून त्या पूजेला लावणं ………………त्या कुण्या तरुण स्वयंघोषित मां ला उचलून घेण्यासाठी बोली लागणं ………….शिन्दुराच्या डब्या …………पुस्तकं ………….फोटो ………. लॉकेट ………दोरे ………….मानाच्या पूजा …………या उलाढालीतून मग महारांजाना चांदींच सिंहासन ……………विमान प्रवास ………….प्रसंगी private jet ची सोय ………….एकराच्या जागेत पसरलेले मठ ………………मर्जीतल्या भक्तांची चंगळ हे सगळं उघड असतांनाही बाबा बुवाच्या मागे पाळणाऱ्या अशा लोकांना पाहिलं कि वाटतं आजही आपल्या आयुष्यात जगण्याच्या विश्वासाची असुरक्षितता ठासून भरलीय…………प्रत्येकाला सुखाचं जगणं हवंय ………आपण परिस्थिती स्वीकारण्या पेक्षा तिच्या पासून लांब पाळण्याचे अनेक मार्ग शोधतो आहोत . 'मग मुलीचं लग्न ठरत नाही '………….'पोराला नोकरी नाही ' …………नवऱ्याची दारू …………जागा जमिनीचे वाद ………असाध्य आजार …………मानसिक तणाव …………या सगळ्यावर हे स्वयंभू बाबा लोक अध्यात्मिक उपायांची मलम पट्टी करीत मानसिक गुंता घालीत कधी अडकवतात हे कळतही नाही आणि तोवर आपण त्या गोतावळ्यात आपसूक मिसळतो . अनोळखी चेहरे ओळखीचे होतात . एव्हाना डोक्यात महाराजांची हवा काटोकाट भरलेली असते . एक वेगळाच हुरूप येतो . मरगळ निघून जाते . नामस्मरणाच्या एकाग्रतेने चेहऱ्यावर वेगळच तेज येत . आणि आत्मविश्वास अधिक प्रबळ होतो. पूर्वी अनेक प्रयत्नात ज्याला नोकरी मिळाली नाही त्याला आता एकाच मुलाखतीत जॉब मिळतो . जिच्या लग्नाची आशा जवळ जवळ सगळ्यांनी सोडलेली असते तिच्या यावेळच्या प्रयत्नात थेट साखरपुडाच ठरण्याचा चमत्कार होतो. बस्स महाराजांवरच्या श्रद्धेत आणिक वाढ होते. शेजारी -पाजारी - नातेवाईक गावा- शिवात त्यांची महती पसरते …………अडचणीत असलेले असे आणि काही जण या दिशेने आकर्षित होतात . साधना वाढत जाते . दरम्यान महाराज मठाधिपती होतात . पूर्वी डोक्यावर हात ठेवत पर्सनल आशीर्वाद देणाऱ्या महाराजांचं आता फक्त मुखदर्शन दिलं जातं . प्रस्थ - महाप्रस्थ होत ………………… उच्छाद वाढतो. अहंकार -गर्वाच्या लाटा उसळत असतात .एकेकाळच्या सच्या भक्तांमध्ये मतभेत होतात आणि एक ना एक दिवस याही महाराजांचा प्रभाव मावळतो ………….आणि मग पुन्हा नवे महाराज ……………….नवे साधक ………………. नवी भरभराट.
* भावना दुखावण्याचा मानस नाही
© Santo
.jpg)
No comments:
Post a Comment