रवा ,डाळी, डालडा प्रत्येकी किलोभर सोबत वेलची सुका मेवा यांची घाऊक यादी करायला बसलं कि दिवाळी १० एक दिवसांवर आलेली असायची . जालगावातल्या गो. म.फाटक दुकानात तेंव्हा गर्दी म्हणजे यादी दिली कि अर्ध्या तासाने नंबर लागायचा डालड्या साठी आणलेला स्टीलचा डबा , तेलासाठीचा कॅन त्या गर्दीत मध्ये मध्ये कडमडत असायचा जाम राग यायचा आईचा तेंव्हा तेलाचा बंद कॅन आणि डालड्याची पॅक बरणी मिळते ना मग घरून कशाला आणायचे
नुसता अंगाचा साबण म्हणजे कोणता . मैसूर वाला देऊ कि अजून भारी ...जास्त महागातला नको आप्पा पण जरा चांगल्या वासाचा द्या इतक्या गर्दीत तुझा साबण शोधायला वेळ नाही.देईन तो घ्यावा लागेल बदलून मिळणार नाही . यादी नुसार एक एक घट्ट दोरा गुंडालेल्या जिन्नसाच्या पुड्या आई तिन नेमलेल्या पिशवीत भरल्या जात . वहिनी उटण याद्या पूर्ण झाल्या की निघताना पावती टेबलावर न विसरता घ्या त्याचे पैसे लावले नाहियेत.
याद्या संपत आल्या की माझ सगळ लक्ष फटाक्यांच्या टेबलाकड़ असायच .कधी एकदाचा जिन्नस घेवुन होतोय आणि मी कधी फटाके घेतोय नुसती चुळबुळ वाढत जाई .आई आवर पटकन म्हणत पिशव्या धरतांना हातातला त्राण निघुन जाई .आणि परत आप्पा खेकसत काय रे फटाके काय संपणार नाहीयेत.आधी एक काम पूर्ण कराव मग दूसऱ्याकड़े वळाव बाळ.
वहिनी फार लाड बरे नव्हेत मुलांचे आजकाल ची पोरं म्हणजे . आता पुढची किमान 10 मिनिटे आप्पा यावरच बोलणार म्हणून मग काढता पाय घेत आपल्याला झेपणाऱ्या पिशव्या भराभर दुकाना बाहेर आणाव्यात म्हटल तर डालडा पोह्यांची पिशवी सोडली की सगळच कस जड़ काम पण तरीही आपली तडमड पाहून आईला दया येई .रुमालातल्या नोटि तपासून ती म्हणे जा तुळशीच्या लग्ना पर्यंत पुरतील तेव्हडे फटाके घे जास्त म्हागातले नको घेवुस बाबू अजुन पणत्या घ्यायच्या बाकि आहेत.मनात असूनही खुप सारे फटाके घेता येत नसत फार फार तर एक चक्र बॉक्स, अर्धा पाऊस बॉक्स ,अर्धा डजन फुलबाजा बॉक्स, चार लक्ष्मी बार चे प्याकेट, लवंगी बार ची अक्खी लड़ी ,दोन सुरसूऱ्या ,एक नागगोळी बॉक्स , एक सिंह बॉम्ब बॉक्स (हे शक्यतो दिवाळी च्या सकाळी जो पहिला उठेल त्यांनी लावण्याच्या मानाचे विक्रमी बार म्हणजे यांच्या आवाजाची दहशद असे) ,अर्धा बॉक्स सुरसुरी बाण इतक्यात टोटल शंभर च्या वर जाई आणि आई म्हणे खुप झाले. बस कर आता नाहीतर बाबा ओरड़तील ....बाबांच नाव घेतल म्हणजे चार सुतळी बॉम्ब एकत्र लावल्यागत वाटे त्यांचा दरारा म्हणजे चड्डी ओली व्ह्ययची त्याकाळी पुढे अजुन काय घ्याव वैगेरे धाडसच होतच नसे.
जितक मिळाल ते पुरुन वापराव त्याउपर अपेक्षा करण्याच सोय नसे त्याकाळी .आणि आजकाल ची पोरं हजार दोन हजार चा चुराडा करूनही त्यांच समाधान होत नाही अर्थात काळ बदलालय आणि वेळही.सध्या फटाके बंदी चालू आहे त्या निमित्ताने आठवल म्हणून शेअर केल बाकि काळ कायम बदलत राहतो हे वास्तव स्विकारणे ओघात आलच आमच्या वेळी वैगेरे युक्ती वादाला तसहि काही महत्व नाहीच काळाअनुरूप.
© Santo

No comments:
Post a Comment