या उलट इथ शहरात फक्त ११ दिवसात खोऱ्याने पैसा कमावणारी अतिश्रीमंत मंडळ आहेत यांच्याकडे नवसाच्या रांगा किलोमीटर च्या वर लांब लागतात .किलोच्या हिशोभात सोन्याचेकरून चांदीच्या वस्तू दानपात्रात जमा होतात . AC मंडप ,पेड कार्यकर्ते , नेत्या - अभिनेत्या पासून ते शासकीय -प्रशासकीय बड्या हस्तींची इथली हजेरी ………….बाप्पा सोबतचा त्यांचा सेल्फी ………शाल चांदीची प्रतिकृती देत केलेला त्यांचा सत्कार ………….मिडिया पोज ………बाईट ………झेड प्लस सुरक्षा ………ब्ला …ब्ला मेनी VVIP कल्चरचा फील इथल्या सामान्य भक्ताच्या दर्शनात काही तासांनी विलंब करतो . but it's all fine after all this all personality's come along with glamour ............ and that's why our BAPAA Always In media headline till the function going to END . गणेश उत्सवांच्या मागचं हे वास्तव विदारक आहे अनाठाई आहे . मुळात अशाने काही आपली संस्कृती आणि अभिमान टिकवला जात नाही तर हि शुद्ध व्यावसायिकता आहे . लोकांनी स्वतःचे खिसे रिकामे करीत आस्थेपोटी मंडळाच्या दानपत्रात भरलेला हा पैसा पुढे कुठे आणि कसा जिरतो याचाही शोध घेतला तर अनेक गोष्टी समोर यायला मदत होईल . काही मंडळ सामाजिक काम देखील करतात यात वाद नाही पण त्यालाही एक लिमिटेड ओपन फेस आहे जो सहज लक्षात येतो . तिकडे साउथ मधे काही श्रीमंत मंदिरांच्या वतीनं अतिदुर्गम गावांना दत्तक घेत त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी भरगोस निधी वापरला जातो . आणि लोकांनी दान केलेला पैसा लोक कल्याणा साठी वापरल्याच एका प्रतिष्ठित इंग्रजी मासिकात काही दिवसांपूर्वी वाचल्याचं आठवतंय …………आपल्या मुंबईच्या एकतरी करोडपती मंडळाने महाराष्ट्रातलं एक तरी गाव अस आयडियल मॉडेल दाखवावं.
यावर लिहिण्यासाठी अनेक मुद्धे आहेत पण आपल्याच उत्सवाची आपणच किती कारण विमांसा करावी आपल्या बहुत जनांना सगळं न्यात आहे . त्यासाठी कुण्या राजकीय पक्षाला याचा पुळका घेत स्वत:चा बाजार गरम करण्याची गरज नाही . जो मराठी आहे विशेष करून महाराष्ट्रीयन आहे त्याला या उत्सवाचा सार्थ अभिमान आहे हे गौरवार्थ असेलही . पण म्हणून आपण या गणेशउत्सवाचं जे इकोनॉमीकल इवेंट होतंय तिकडे दुर्लक्ष करीत भावनिक गुलालात अधिक रंगत जाण्यात घातक आहे . कारण उत्सवमूर्ती जरी विसर्जित होऊन पाण्यात विरघळल्या तरी मागे उरलेल्या त्यांच्या आरासीच्या प्रत्येक खांबात अनेक नरसिंह दडलेले असतात जे अनेक भक्त प्रल्हाद संपवण्याच काम चोख बजावतात
© संतोष टाकळे



