गणेशउत्सवातली राजकीय "टगे" गिरी ………………!





मुळात गणेश उत्सवाला कुणाचाही विरोध नाही आणि पाकिस्थानमधेही कुण्या भक्तांनी गणपती बसवला तर त्यालाही हरकत नाहीच विषय आहे तो या दरम्यान होणाऱ्या अमर्याद खर्चाचा ……ओघळ प्रदर्शनाचा ………राजकीय हस्तक्षेपाचा …………आणि तब्बल १० दिवस यंत्रणावर येणारा अतिरिक्त ताण ………अशा अनेक गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे . "गल्ली गल्लीत बाप्पा आणि देणगीदार अण्णा आप्पा " या कॉन्सेप्ट खाली जी दरवर्षाला नवीन मंडळ रजिस्टर होता आहेत त्यांना आवर घालायला हवाय ……………एका एका विभागात ७-८ वेगवेगळे बाप्पा हवेत कशाला ……एकाच मंडळाच्या मंडपात आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र येत श्री गणेशाची आराधना करण का नाही जमत आपल्याला ………असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे येतात ……………मध्यंतरी" एक गाव एक गणपती" ह्या शासनाच्या उपक्रमाला अनेक गावांनी प्रतिसाद देत ती संकल्पना सत्यात उतरवून दाखवली कारण गावा -शिवात आजही हा उत्सव अध्यामिक आस्थेने आणि परम उत्साहाने साजरा केला जातो . शहरातल्या भंपक दिखावे गिरीचा आणि व्यावसायिकतेचा वायरस अजून खेड्या पाड्यात पोहचला नाहीये हे त्यातल्या त्यात चांगलं आहे . पण सध्या गावाच्या तालुक्याच्या ठिकाणी मुंबई स्टाईल अमुक गावचा राजा वैगरेचा ट्रेंड एव्हाना सुरु झालाय आणि आता तालुक्याच्याहि रस्त्यांवर उंच च्या उंच व्यावसायिक गणेश विराजमान होऊ लागलेत . आणि ज्यांना मुंबईत येणं शक्य नाही अशांना आता तालुक्याच्या ठिकाणी हि सुविधा उपलब्ध झाली आहे . अगदी प्रती शिर्डीच्या धर्तीवर हा नवा ट्रेंड जम धरू लागलाय . यात तिथल्या लोकल राजकीय पार्ट्या सक्रिय झाल्यात अर्थात या निमित्ताने त्यांनाही काही आर्थिक -राजकीय आणि पॉवर टेस्टिंगच्या अनुषंगाने चेक मेट करता येत . याच दरम्यान यंदाच्या हंगामात कोण उभ राहणार त्याचा मागमूस घेण्याचा हा उत्तम काळ समजला जातो . तालुक्याच्या मुख्य ठिकाणी १० दिवसाच्या या उत्सवातल्या  ……………गणपती एव्हढा मोठा ………तिथ लावलेली ८ फुटाची अगरबत्ती ………५० किलोचा लाडू ………….खऱ्या सोन्याचे मोदक वैगरे वैगरेची वाड्या खेड्यात चर्चा होते आणि खेड्यापाड्यातल्या लोकांची हे सारं बघण्यासाठी झुंबड उडते . हे सगळ उत्तम organized करणाऱ्या भाऊला ही रग्गड लोकप्रियता मिळते ते वेगळंच ……

या उलट इथ शहरात फक्त ११ दिवसात खोऱ्याने पैसा कमावणारी अतिश्रीमंत मंडळ आहेत यांच्याकडे नवसाच्या रांगा किलोमीटर च्या वर लांब लागतात .किलोच्या हिशोभात  सोन्याचेकरून चांदीच्या वस्तू दानपात्रात जमा होतात . AC मंडप ,पेड कार्यकर्ते , नेत्या - अभिनेत्या पासून ते शासकीय -प्रशासकीय बड्या हस्तींची इथली हजेरी ………….बाप्पा सोबतचा त्यांचा सेल्फी ………शाल चांदीची प्रतिकृती देत केलेला त्यांचा सत्कार ………….मिडिया पोज ………बाईट ………झेड प्लस सुरक्षा ………ब्ला …ब्ला मेनी VVIP कल्चरचा फील इथल्या सामान्य भक्ताच्या दर्शनात काही तासांनी विलंब करतो . but it's all fine after all this all personality's come along with glamour  ............ and that's why our BAPAA Always In media headline till the function going to END . गणेश उत्सवांच्या मागचं हे वास्तव विदारक आहे अनाठाई आहे . मुळात अशाने काही आपली संस्कृती आणि अभिमान टिकवला जात नाही तर हि शुद्ध व्यावसायिकता आहे . लोकांनी स्वतःचे खिसे रिकामे करीत आस्थेपोटी मंडळाच्या दानपत्रात भरलेला हा पैसा पुढे कुठे आणि कसा जिरतो याचाही शोध घेतला तर अनेक गोष्टी समोर यायला मदत होईल . काही मंडळ सामाजिक काम देखील करतात यात वाद नाही पण त्यालाही एक लिमिटेड ओपन फेस आहे जो सहज लक्षात येतो . तिकडे साउथ मधे काही श्रीमंत मंदिरांच्या वतीनं अतिदुर्गम गावांना दत्तक घेत त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी भरगोस निधी वापरला जातो . आणि लोकांनी दान केलेला पैसा लोक कल्याणा साठी वापरल्याच एका प्रतिष्ठित इंग्रजी मासिकात काही दिवसांपूर्वी वाचल्याचं आठवतंय …………आपल्या मुंबईच्या एकतरी करोडपती मंडळाने महाराष्ट्रातलं एक तरी गाव अस आयडियल मॉडेल दाखवावं. 

यावर लिहिण्यासाठी अनेक मुद्धे आहेत पण आपल्याच उत्सवाची आपणच किती कारण विमांसा करावी आपल्या बहुत जनांना सगळं न्यात आहे . त्यासाठी कुण्या राजकीय पक्षाला याचा पुळका घेत स्वत:चा बाजार गरम करण्याची गरज नाही . जो मराठी आहे विशेष करून महाराष्ट्रीयन आहे त्याला  या उत्सवाचा सार्थ अभिमान आहे हे गौरवार्थ असेलही . पण म्हणून आपण या गणेशउत्सवाचं  जे इकोनॉमीकल इवेंट होतंय तिकडे दुर्लक्ष करीत भावनिक गुलालात अधिक रंगत जाण्यात घातक आहे . कारण उत्सवमूर्ती जरी विसर्जित होऊन पाण्यात  विरघळल्या तरी मागे उरलेल्या त्यांच्या आरासीच्या प्रत्येक खांबात अनेक नरसिंह दडलेले असतात जे अनेक भक्त प्रल्हाद संपवण्याच काम चोख बजावतात 


© संतोष टाकळे 

No comments:

Post a Comment