पाहिलं प्रेम


एन के वराडकर चे दिवस जुनियर कॉलेजला नुकतीच सुरवात झालेली . दापोलीच्या एका बाजूला  अगदी टेकडावर असलेलं हे महाविद्यालय तालुक्यातल्या अनेक गावांसाठी एकच पर्याय होता आणि म्हणून दापोली ग्रामीणच्या अनेक गावातून १० वी पास आउट झालेली पोरं कला आणि वाणिज्य शाखेत इथ प्रवेश घायला येत . डोंगर दऱ्यांच्या कुशीतलं हे महाविद्यालय पंचक्रोशीत अनेक गोष्टी करिता फ़ेमस आहे …………इथल्या क्लासरूम मधून दिसणारी हिरवळ अधिक प्रसन्न करणारी .एकंदरीत अतिशय आल्हादायी वातावरणातलं हे ठिकाण …………… त्यातही कॉलेज सुरु झालं ते पावसाळ्याचे दिवस आणि कोकणातला पाऊस तर जास्तीच romantic आणि लहरी देखील खुपदा कॉलेज सुटायच्या वेळीच याला मुसळा उपटायचा .………….अनेकदा मग पुस्तकं पिशवीत गुंडाळायची आणि  सायकल हातात घेऊन चालत निघायचं …………आम्ही आमची अर्नाल्डो (कितीदा रिपेर केलेली आणि अनेक कंपन्याचे पार्टला आपलंसं करणारी म्हणून ती अर्नाल्डो ) लायब्ररी समोर उभी करत असू सकाळी आधी लायब्ररीत १ तास आवांतर वाचन आणि मग पुढे बाकीचे तास अभ्यासक्रम ………पण लायब्ररी एकटा जाणारा मी बाहेर पडतांना मात्र सोबत आणि कुणीतरी असे …………हे अनेकांनी नोटीस केलं आणि ते आता आम्हा दोघांना जाणवू लागलं होतं …………  beauty with brain म्हणावं अस व्यक्तिमत्व अगदी सहज भुरळ पडणारं …………………त्या दिवशी तुफान पाऊस पडत होता. वर्गात इन मीन १० - १२ जन फक्त दोन तास झाले आणि अतिवृष्टीच्या सबबी खाली कॉलेज लवकर सोडण्याचं प्राचार्यांच नोटीस आलं …………१० मिनिटात पोरं सटकली ज्यांच्या गाड्या होत्या ते ट्रिपल सीट वैगरेचा झुगाड करीत मार्गस्थ झाले आता उरले सायकल वाले आणि पाई जाणारे आमच्या सारखे सामान्यजन ……………त्या दिवशी अर्नाल्डो पुन्हा सर्विसिंगला असल्याने आम्ही पायीच कॉलेजात आलो होतो . छत्री उघडून कोसळत्या पावसात पाय टाकणार इतक्यात हाक आली . मी पण येऊ का …………छत्रीच्या तारा तुटल्यात सकाळच्या वाऱ्यात भिजत जावं लागेल नाहीतर . ओह वृषाली तू ……….ह्म्म्म्म एस  ये कि …………………आम्हा दोघांना एकत्र बघून आता नुसते चिडवणारे जास्ती चेतवणार हे उघड होतं आणि तशा कमेटहि आल्याच ………………पण आयुष्यात पहिल्यांदाच प्रेमात पडल्याचं हलकेपण या चीडवण्याने अधिक अलवार तरंगत होतं . तिच्या स्पर्शाने आणि सोबत असण्याने पहल्या वहिल्या तारुण्याची जाणीव प्रखरपणे जाणवत होती . वयात येणं म्हणजे काय याची अनुभूतीच म्हणा हवं तर……… आजवरच्या पावसातला तो पाऊस अगदीच स्मरणात राहणारा आणि दरवर्षीच्या प्रत्येक पहिल्या सरीत तिची आठवण पुन्हा गंधीत करणारा ……………हे खरं आहे पाहिलं प्रेम आयुष्यात परत कधीच होत नाही . कारण ते अमर होत अजरामर नाही . 

* फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा

© संतोष टाकळे 

No comments:

Post a Comment