खुप वर्षानी बाबा महाराज सातारकर याचं निरूपण ऐकायला मिळाल ऑन साम टीवी ........आजवर ज्यांच्या पायावर नतमस्तक व्हाव अस वाटल ते हे एकमेव अध्यात्मिक अलौकिक व्यक्तिमत्व ........दापोलीत असतांना खणखणित आवाजात टेपरेकॉर्ड वर सुरु असलेल्या यांच्याच निरूपणाने आमची सकाळ होई .बाबा यांचे परम भक्त एकीकडे सहानेवर गंध उगाळीत महाराजांच्या दाखल्यांना दाद देत मंत्रउच्चारात साग्रसंगीत पूजा करतांना मधेच बघ महाराज काय म्हणतायत अस attention नोटिस करत त्यांच उदाहरण जगण्यात कस महत्वाच आहे हे जाणून घे अशी तंबीच असे बाबांची आणि मग हळूहळू वास्तव आयुष्यातल्या प्रसंगांचे विस्तृत विश्लेषण करणारे हे सातारकर महाराज आम्हा भावंडांचे कधी मेण्टोर झाले.हे आता आम्हालाही सांगता येणार नाही. त्यांच्या कोकण भेटित आम्ही सहपरिवार त्यांना भेटलो तो खुप भाग्याचा क्षण होता. त्यांचे चरण स्पर्श करतांना अगणित आंनद लहरी संचारल्या अंगात .आजही त्यांचा नुसता आवाज ऐकला तरी स्वानंद मिळतो मनाला आणि हीच ती गुरुंची अनुभूति नाहीतर नुसती
राख विभूति म्हणून कपाळाला फासण्यात काय अर्थ आहे .

No comments:
Post a Comment