बशा " धुणारे हात …………!


मुंबईत काम करणार काय ? जाधवाच्या शंकरन दिन्याला विचारल ……उन्हाळच्या सुट्या लागलेल्या आणि तसही रोजच्या पैशाच्या कटकटीचा वीट आलेल्या दिनेशन झटक्यात हो म्हटलं …………कधी निघनार हाव ……माझ्याकड तिकिटाला पैसं नायत …………तिकडं नेमकं काय काम हाय ……एका पाठोपाठ सगळं एका दमात विचारून दिन्या शंकरच्या तोंडाकड बघत राहिला . फाट्यांच्या गोयल्याचा (मोळी ) सुंब आवळीत शंकरन मी हाय ना तू कशाला
 एव्हडा गांगरतोस म्हणत तुटक उत्तर दिलं . दिन्या पण मनात म्हणाला अन्ना असतांना कशाला भियाला पाहिजेल …………पण म्हातारीला कोन समजावल ती नाय पाठवायची इतक्या लांब …… शंकर अन्ना बोलला तर निघल कायतरी तोडगा …………
पडसडीच्या वाटेनं डोक्यावरचा गोयला सावरत घराकड येता येता स्वतःशीच पुटपुटत दिन्या मनात भांबावला होता . शिकायची आवड हाय पण पैसा नाय . म्हातारी तरी किती लोकांच्या दारात काम करील तिच्यानं जमतंय कुटं……………मरुदे शाळा बिळा आता मुंबई गाठायचीच. खोपीच्या तोंडाशी गोयला टाकून दिन्या मागच्या पडवीतल्या अंगण्यात लांब झाला. भारा मानेत बसला होता . अंग घामानं ओल -चिब झालेलं घसा तानेन सुकलेला आता खरतर घोटभर चाय मिळाली तर जरा जीवात जीव येईल अस नुस्त मनात येतंय इतक्यात काटोकाट भरलेल दोन पेल घेऊन म्हातारी आलीच …………….दिन्या वैतागत म्हातारीला म्हणाला ……तुला चैन पडत नाय काय ग म्हातारे आता नको होता मला च्या दुपार बघ किती वर आलीय ……… तुझ्या च्यायच्या तल्पीच माझ्या परिस कोनाला जास्त माहित हाय ………….तुझी आइस पण च्यासाठी हवरट होती . दिवसभर च्यायचा पातेला वयलावर तापत असायचा . डोळं शून्यात घालीत पेल्यातल्या काळ्या चायचे भुरके वढित म्हातारी पुन्हा माग गेली होती. किती आणि काय आठवलं तिला देव जाण पण आज दिवसभर म्हातारीचा पदर सारखा डोळं पुशीत राहील हे मात्र खरं .
जा पायावर पानी घे सुकटीचा कालवण केलाय घासभर खाऊन घेवया ………म्हातारी पदर डोळ्याशी चेपत हात टेकत उठली . दिन्याच्याहि हुंदका फुटला होता ………कालवणात भाकरी मोडताना दिन्या मुंबईच्या कामाच बोलला . रानात शंकर अन्ना आणि त्याच्यात काय बोलणं झालं ते त्यांन म्हातारीच्या कानावर घातलं. त्यावर म्हातारी जाम भडकली कशाला पायजेल म्ह्मबै इथ मिलतात त्यात भागवू शाला सोडून नको ते नाद करायचे नाय त्या शंकऱ्याला कामला पोरं पायजेत तर स्वताच्या पोरग्याला न्हे म्हना माग त्या सुताराच्या पोराला नेलाय आणि हॉटेलात लावलान कामाला दिन रात पोरगा मरमर काम करी नीट जेवायला नाय का पोटाला पोटभर तुकडा नाय पोरगा कामीन (कावीळ )होऊन मेला आणि ह्याच मेल्या शंकऱ्याने कोर्टातला दावा दाबलान आणि पैसं खाल्यान मदल्या मदी …………उर्वरित कथा दिवाळी अंकात वाचा .

"बालकामगार "आणि अर्थात "आजी - नातवाच्या" नाते संबंधावर आधारित हि दिवाळी अंकासाठीची यंदाची पहिली कथा ……………तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे स्वागतच आहे नेहमी प्रमाणे


* फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा
© संतोष टाकळे 

No comments:

Post a Comment