पुकार (Partners for Urban Knowledge Action and Research) साठीच्या एका संशोधनासाठी काही संधर्भ पुस्तकांचा अभ्यास करायचा होता . ती पुस्तकं काही केल्या कुठे सापडेनात तब्बल २ आठवडे शोध घेतल्या नंतर एका मित्रा कडून दासवा ( दादर सार्वजनिक वाचनालय ) बद्दल कळल. धीरज पाटील आणि मी संध्याकाळी ७ च्या सुमारास दादरला पोहचलो. पत्ता माहितच होता त्यामुळे थेट दासावाच्या दारा समोर जाऊन धडकलो. तेंव्हा ७. १५ झाले होते . वातानुकुलीत सुसज्य अस हे वाचनालय काहीसं सरकारी बँकच्या शिस्तीचं वाटलं कारण आत गेल्या गेल्या समोरच्या काउंटर वरचा तडक स्वगतौसुक सल्ला …………नवीन मेंबरशीप हवी असल्यास ४ नंबर वरून फॉम घ्या आणि मुख्य दरवाज्या शेजारच्या काउंटरला फी सोबत जमा करा . तुमचं ओळखपत्र मिळाल्या नंतर लगेच तुम्हाला पुस्तक मिळेल ८ वाजता वाचनालय बंद होतं तेंव्हा तात्काळ हे करा नाहीतर उद्या यावं लागेल ………एका दमात हे सगळं सांगणाऱ्या त्या बाई पुन्हा तत्काळ कामाला लागल्या . एकंदरीत हे प्रकरण सोप्पं नसल्याचं पहिल्याच दिवशी जाणवलं. ………
अर्ज घेणाऱ्या बाई - पैसे वर्षभराचे भरणार कि सहामाई ?
धीरज - सहामाई
अर्ज घेणाऱ्या बाई- ६४० आणि वरचे ४० सुट्टेच द्या
धीरज- एक मिनिट ( २-४ मिनिटे शोधा शोध )
अर्ज घेणाऱ्या बाई- अहो किती वेळ ग्रंथालय बंद होण्याची वेळ झाली . हिशोब करणं बाकी आहे अजून नसतील सुट्टे तर उद्या या .
धीरज - अहो तुमच्या चाळीस सुट्टया साठी आम्ही परत उद्या १०० रुपये मोडून येऊ का ?
अर्ज घेणाऱ्या बाई- ते तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते तुमच्याशी वाद घालण्यात आम्हाला रस नाही म्हणत
काउंटर बंद चा बोर्ड लावत त्या बाई निघत्या झाल्या .
जाम डोक्यात जाणारं होतं हे सगळं अजिबात इथे मेंबरशीप नको म्हणत मी धीरजला निघायचं म्हटलो तर याने ब्यागेतून चिल्लर वैगरे जमा करीत ४० रुपयाची म्याजीक फिगर गाठत शेवटी मेंबरशीप घेतलीच . आणि आम्ही दासावाचे अधिकृत सभासद झालो.
पुढे दा. सा. वा.ने अनेक उत्तमोत्तम लेखकांना पुस्तकाच्या निमित्ताने भेटण्याच एक दालन खुल केलं प्रत्येक आठवड्याला नवीन दोन लेखक करीत ग्रामीण ते शहरी अशा अनेक लेखाकांच्या हुन्नरी बाजाची मज्जा घेत कधी भावनिक कधी आत्मिक चिंतनात स्वतःच्या आयुष्याशी जोडीत पुस्तकांची पानं उलटत गेली. त्याला आज तब्बल पाच वर्ष झालीत . गेल्या पाचवर्षात जो शाब्दिक प्रवास झालाय त्यादरम्यान भेटलेली अनेक पात्र आजही इतकीच स्पष्टपणे स्मरणात आहेत . सुधा मूर्तींच्या" वाईज अन्ड अदर वाईज" मधली सगळीच व्यक्तिचित्र आजही अनेक संधर्भी पुन्हा नव्याने भेटतात . रंगराव पाटीलांच्या "मळा" या गावरान कादंबरीतली लीला तर अनेकदा पुस्तकाबाहेर डोकावून बोलतेय असा भास होतो . पुस्तकं वेगळ्या दुनियेत नेतो ते अनुभवलच पाहिजे. कारण यात शब्दांच्या अनुभूतीची परम आनंदमय पर्वणी असते . शेवटी शब्दांच्या सेटलाइट ची रेंज थेट मनाशी भिडते आणि पुताकांच जग आणिक आत खेचत नेत
© Sannto

No comments:
Post a Comment