खालीदकड मटन आणायला बाबांच्या सायकलवर सकाळी ५ च्या सुमारास फणसाच्या वाकणातून मार्केटच्या दिशेला जातांना. आज मटण या नुसत्या कल्पनेने तोंडाला पाणी सुटलेलं असायचं . बाबा दोन नळ्या घेऊया हा …………कलेजी वेगळी मागा ……२ किलो कसं पुरेल ३ किलोतरी घ्या ………असा हवरटपणा चालू असतांना बाबा मात्र सायकल पळवत रस्ता कापत असायचे थोडा उशीर झाला तरी गर्दी वाढेल हवं तसं मटन मिळणार नाही या काळजीत ……………आम्ही मार्केटला पोहोचायचो तेंव्हा खालीद चाचा पहिला बकरा कटवायची तयारी करीत असायचे . शब्बीर पानी ले बेटा ………चल जादा टाईम निकालू नक्को ………सलटादे जल्दी ……५ एक मिनिटांत बकऱ्याची एक ओरड कानावर पडायची आणि मग मोजून १५ मिनिटात निथळणारा बोकड शब्बीर अकड्यात उलटा लटकवायचा.
खालीद चाचा अल्लाचं नाव घेत पहिला घाव घाली आणि मग लायनीत उभ्या असलेल्या २०-२५ जणांच्या किलो वारी पिशव्या पुढे होत . कुणाला चापच हवेत तर कुणी इतनी चरबी मत डालो चाचा म्हणीत वाद घाली . आणि १० वाजायच्या आत बोकडाचा बाजार उठत असे ……………………खालीद चाचाने माझ्याकडे बघत ……मेरे बच्चेकू ये थोडा जादा कलेजी म्हणत दिलेला extra काळजाचा एक कोपरा आई वेगळ्या टोपात शिजवी …………….मटन- वडे यांच्या दर्पान घरभर पसरलेला गटारीचा माहोल त्यात बाहेर कोसळणारा धो - धो पाऊस ……………संत्री -नारंगीची एक कॉटर मारून रंगात आलेल्या अण्णांची जुनी गाणी चुलीच्या निखाऱ्यात भाजलेल गावटी कोंबडीची खरपूस कलेजी असं बरंच काही आजही कोकणात होत असतं ……………फक्त आपण तिथ नसल्याची हुरहूर लागून राहते. शिवाय इथल्या शहरातल्या मटणातल्या चवीत कितीही ब्रांडेड मसाले घाला त्या गावच्या चवी इतकी रियल टेस्ट इथ मिळत नाही. कारण गटारी शिमगा निमित्त मात्र आहेत खरं तर आपल्या माणसां सोबत दोन घास समाधानान खावं ह्यात खरा आनंद दडलेला आहे नाही का ?
© संतोष टाकळे .
Note - आज दिवसभर गटारीच्या शुभेछ्या देणाऱ्यां मित्रांना हि पोस्ट समर्पित

No comments:
Post a Comment