
लंडन मधल डॉ . बाबासाहेबांच ते घर घेण्यासाठी कुणाचाच आक्षेप नासवा कदाचित नसेलही. पण ह्या घराभोवती राजकारण आणि त्यावर उथळ चर्चा कारणाऱ्यांनी जरा आपल्याच देशातल्या स्मारकांचा आढावा घ्यायला हरकत नाही .
बाबासाहेबांनी समतेचा संदेश देत महाड़च्या ज्या चवदार तळ्यातलं पाणी ओंजळीत घेत सगळ्यांसाठी खुल केल.त्या स्मारकाची आजची स्थिती काय.......एकेकाळी ज्या पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह झाला . त्याच पाण्याचं आज काळ्यापाण्यात रूपांतर झालय. याच आवारात असलेल्या ऑडिटोरीयमच्या दरवाज्याला जास्ती वेळ टाळ लोंबकळलेल असत. अस्वछता आणि बाकि इतर नॉन मेंट्नन्स गोष्टींची तर यादिच देता येईल. काही उपवाद वगळता अशीच काहीशी अवस्था देशभरातल्या अन्य स्मारकांची आहे थोड़क्यात काय तर जे आपल्या हातात आहे तेच आपल्याचानी सांभाळता येत नाही तर त्या लंडनच्या घराच काय करणार आहोत आपण ?
आजच्या यावरच आधारित असलेल्या एका वुत्तवाहिनीच्या चर्चा सत्रात हे घर घेतल्याने सामान्य आंबेडकरी जनतेत नेमका काय संदेश जाईल ? या प्रश्नाला अभ्यासु विचारवंतानी दिलेल उत्तर नेहमी प्रमाणे भावना प्रधान होतं.
मुळात इंदु मिल मधल प्रस्तावित डॉ .बाबासाहेब किंवा छत्रपति शिवाजी महाराजांच त्या अरबी समुद्रात वैगरे जे स्मारक बांधण्याचा आपण करोडो रुपये खर्ची घालण्याचा घाट घालतोय त्या पेक्षा महाजांच्या पावन स्पर्शाने इतिहासात अजरामर झालेल्या रायगडावर तो काळ पुन्हा तसाच उभा करणारं एक उत्तम जागतिक दर्ज्याच भव्य स्मारक का नाही उभारू शकत . त्या अरबी समुदातल्या खडका पेक्षा पराक्रमी रायगडचे स्वराज्याची साक्ष असलेले भक्कम बुरुज जास्ती उजवे नाहीत का ? इंदू मिल - अरबी समुद्र आणि स्मारकं यांच्या अस्मितेच्या उपऱ्या भांडवलावर येत्या पुढील काळात किती निवूडणुका होतील हा पाहण्याचा विषय आहे .
अहो हे सगळच ठेवा बाजूला आदि त्या गावाबाहेर आजही पोटा- पाण्यासाठी , याही काळात मानान उभ राहून समाजात खंबीर पणे वावरू न शकणाऱ्या , अन्यायाच्या जोखड़ाखाली दबलेल्या- पिचलेल्या आंबेडकरी आणि इतर उपेक्षित बांधवांना आपण कधी या व्यापातुन बाहेर काढणार आहोत.
जितकी धडपड आणि खळखळ लंडन च्या घरासाठी आहे. त्यातली किंचितशी तळमळ इथल्या वस्तितल्या उंबऱ्याशी पोहचावी हि माफक अपेक्षा .............बाकि देशी -परदेशी आपला डंका वाजलाच आहे. …………………बोलो बजा कि नही ?
© संतोष टाकळे .
* फोटो सौजन्य - ABP MAZA News Network
No comments:
Post a Comment