"आपल्याकडे आधी वाद - प्रतिवाद आणि मगच मिळेल पुरस्कार " असा नवा ट्रेंड सेटल होतोय . यात अभ्यासकां पासून ते नवख्या प्रसिद्धी वलयात थोडे उजळ झालेले लोकही भरभरून बोलतांना दिसतायत. त्यात आता आपल्याकडे राजकारण्याचा मुलगा राजकारणी च्या चाली वर सामाजिक कार्यकर्त्याचा वंशज समाजवादी वैगरे असं उत्तम घराणेशाहिच्या बेस वर सगळं सेट होतांना दिसतंय आणि अशा चर्चेत आता नवे चेहरेही वारसा हक्काने बोलतांना दिसतायत . "पुरंदरें" यांना महाराष्ट्र भूषण देऊ नये या मागणीत मोजके चार दिग्गज सोडले तर बाकी सगळेच न्यू कमर्स आहेत. इतकंच काय तर "मलाला आणिक "सत्यार्थी" ना नोबेल मिळाल्यावरही यापैकी अनेकांनी तोंडसुख घेतल.
एकंदरित आपली सन्मान देण आणि घेण या बद्दलची संकुचित मानसिकता, राजकीय हस्तक्षेप, विचारवंतांची लॉबिंग , टार्गेटीकरन अशा अनेक गोष्टी नव्या वादांना जन्म देतात वा निर्माण करतात . आणि आपल्या या धसमुसळ्या गोंधळात आपण सर्वोच्च बहुमानाच्या प्रतिष्ठेच्या आणि अभिनामाच्या सन्मानांच गांभीर्य घालवून बसतो आहोत. हे ज्यांच्या लक्षात येतंय तेहि मुग गिळून गप्प आहेत हे जास्ती विदारक चित्र आहे.
तो पुरस्कार राहिलाय एका बाजूला आणि आपण एस्ट्या जाळतोय ,एकमेकांच्या जाती चा उद्धार करतोय , कुणी पान भर बॉल्ग लिहत त्याचा समाज किती योग्य बाकी कसे अयोग्य याची तुलनात्मक मांडणी करतोय , आगलावे बारामती कर वातावरणात अधिक उष्मा घलतायत, राज ठाकरे स्पेशल मुलाखती देतायत , मिडिया उथळ चर्चा घडवयतायत ,उशिरा का होईना संजय राऊत ही सामना करायला पुढे आलेत , बाकि पेड़ विचारवंत त्यांच्या त्यांच्या क्षमतेने कोकलतायत , सोशल नेटवर्किंगवर तर अक्षरशः उत आलाय.
पण या निमित्ताने अनेक कट्टर चेहरे मात्र उघडे झालेत. त्यांची नेमकी वैचारिक पातळी किती हेही सिद्ध झालय. पुरोगामी म्हणणारे कसे चतुर संधी साधू आहेत याची प्रचिती आलीय.
पन तरी महाराष्ट्राच जे जगभर हसु झालय त्याला आपण सगळेच जबाबदार आहोत.
ज्या महाराजांनी या मुलखाच्या इब्रति खातर रक्त सांडल त्याच महाराजांच्या इतिहासाचे वाभाड़े काढित काही टोंनगे जो आतंक मजवता आहेत त्यांना ठेसल पाहिजे कसले ब्रिगेड चलावतायत हे खंडणी खोर ..........यांची खरतर लायकी नाही महाराजांच नाव घेण्याची.
पण आज अत्यंतीक वाईट वाटतंय मराठी विशेष करुन महाराष्ट्रियन म्हणून हा इतक्या खालच्या लेवलवर गेलेला वाद आणि झाला प्रकार पहतानां
.
शेम ऑन यु डर्टी मांइड महाराष्ट्रियन्स
No comments:
Post a Comment