दीदी सोबत गेली अनेक वर्ष ईद साजरी करतोय.ईद के पहिले रात सेवकूर्मा ,बिर्यानी, घोष ,भाकऱ्या आणि इतर फराळाच्या तयारीची दरवर्षीची लगबग यंदाही आहे. खुप धम्माल असते यादिवशी....... प्रत्येकाच्या हातात कहीना काही काम असत .आता मध्यरात्रीचे 3 वाजलेत आणि जीजू मटन आणायला गेलेत गर्दीत नंबर लागायला किमान सकाळचे 6 वाज़तील . तोवर इकडे फरीद बिर्याणीचा चावल उकड़वतोय,दीदी भाकऱ्या करतेय ,सपना आणि मी शेव शेकवतोय ,समीर अमीना सुका मेवा चिरतायत अख्ख घर लागलय ईदीच्या तयारीला आपल्याकडे दिवाळीच्या अदल्या दिवशी पर्यंत लाडू, करंज्या, चकल्या करायची जी धांधल उड़ते ना अगदी तसाच माहोल आहे इथेही मधेच आइसक्रीम ,फिरनी ,रबड़ी असा गोडाचा नाश्ता येतोय काम करणाऱ्या मेहनती पोराना सोबत जुन्या नव्या आठवाणींची मैफिल साउंड सिस्टम वरच्या मंद आवजातल्या गजल्स ......भाईजान और एक फिरनी तो बनती है म्हणत आग्रह करणारे दिदीचे जेठ आणि देवर शिवाय मामू लो ना म्हणत भावनिक गळ घालणारा माझा भाचा समीर ..........शेवटी सण -सण म्हणजे काय हो आपल्या माणसांनी आपल्या माणसांसोबत घालवलेले सुखाचे चार क्षण ........
दहा वर्षापूर्वी एका प्रवासात भेटलेली फातिमा दीदी आज सख्या बहिनी प्रमाणे माझ्यावर प्रेम करते बहिण म्हणून तिचा हक्काचा दरवर्षी ईदचा न्यौता न चुकता येतो.
दापोलीत दीदी लग्नाला आली तेंव्हा बहिणीचा मानपान घेताना तो नुसता कोरडा हातात न घेता आपल्या पद्धतीने हळद कुंकु लावित दूपटयात स्वीकारला.तिचा दुवा देणारा बुरख्यातला हात अनेकांना खटकला पण त्याचा तिला संकोच वाटला नाही. मुस्लिम बाई काय मुहूर्ताच्या शकूनाचा ताट हातात घेत आरती करते यावर नाक मुरडली गेलित पण माझ्यासाठी तिच्या धर्मा पेक्षा तिची माया माणुसकी जास्ती पवित्र वाटते
आजही नुसत प्रोफाइल फोटो डोक्याला रुमाल बांधलेला ठेवला तर धर्म बदल वैगरे सल्ले देणारे मेसेज आले . मुळात मी धर्मा पेक्षा माणसाला जास्ती मानतो आणि म्हणून आज सागळ्याच धर्मातले माझे जिगरी दोस्त आहेत .आणि नुसतेच दोस्त नाहीत तर जीवाला जीव देणारे यार आहेत .आपण एकीकड़े समतेच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे मात्र कट्टर द्वेष पाळत कटुता बाळगतो हे दुप्पटि आहे . मान्य आहे अनेक आक्षेपार्य गोष्टी आहेत या सगळ्यात पण सगळ्यांना एका मापात तोलता येणार नाही .कारण माणूस जन्माला येताना जात धर्मं सोबत घेवून येत नाही त्याला तो जन्मेल तिथला धर्म दिला जातो. पण त्याची खरी ओळख फक्त माणुसच
अब और क्या कहे
ईद मुबारक आप सबको ......!
© संतोष टाकळे .
© संतोष टाकळे .

No comments:
Post a Comment