मुसळधार पावसात आपल्या शेतातल्या चिखलात उतरण्याची मज्जा काही औरच कारण हल्ली आपण बहुतांशजण माती पासून वेगळे झालोयत म्हणजे सध्या गावातल्या घरासमोरही शेणानं सरावलेल्या अंगणाजागी कोटा लादी लाऊन त्याला लॉन बनवण्याचा नवा ट्रेंड आलाय . काळ बदलतोय आणि त्याबरोबर अनेक पारंपारिक गोष्टी या काळाच्या ओघात कालबाह्य होता आहेत . म्हणजे कोकणातल्या अनेक घरात हल्ली जातं - उखळ - पाटा -वरवंटा,व्हाइन , अशा त्या काळातल्या वस्तू एकतर अडगळीत पडल्यात किंवा थेट त्यांना वळचणीला उभ करून ठेवण्यात आलाय . एकेकाळी ज्यांच्यावर दैनंदीन जीवनक्रम अवलंबून होता आज त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न असा ओसरीच्या कोपऱ्याला येऊन थांबलाय . जे ह्या वस्तूंच होतंय ते आपल्या माणसांच आणि शेतीचं होऊ नये यासाठी आपण आता शेतात उतरण्याची गरज आहे . नाहीतर कालांतराने हे फक्त आठवणीत राहील कारण आता राबणाऱ्या हातांचाही उत्साह आणि ताकद कालांतराने मावळणार आहे .
आज कदाचित तुम्ही उच्चशिक्षित असाल तुमचा हुद्दा किंवा सध्याच स्टेट्स असले चिखली प्लान करू नयेत म्हणून रोखत असेल तर त्याची समजूत काढा त्याला सांगा जो आपण आलिशान घराच्या डायनिंग टेबलवर कसल्याशा महागड्या ब्रांडचा वाशीक तांदूळ सिल्वर कोटेट स्पून ने खातो ना तोही याच चिखलात उगवतो तो खाताना जितकं समाधान मिळतं त्यापेक्षा जास्ती स्वर्गीय आनंद तो पिकवण्यात आहे .
गावाकडच्या या राबणाऱ्या हातांना तुम्ही फक्त सोबत द्या ……………वीक एन्डला धबधबे आणि रेसोर्टच्या पार्ट्या झोडण्या पेक्षा थोडा मोह मोडीत गावाकडच्या आपल्या शेतात चार आवे लावण्यासाठी वाट मोडीत गावाकड चला या पावसाळी महिन्यांचा एखाद्या आठवड्याचा शेवट आपल्या शेतीत काम करून अधिक जास्ती यादगार करा कोसळणाऱ्या धबधब्या समोर कसा शेल्फी काढता तसाच शेल्फी नांगराच्या जोडी समोर काढा हवा तर ……………फेसबुकिंग आणि इतर सोशल मिडिया वर टाका हे फोटो मिळवा प्रसिद्धी किमान इतरांनचीही इच्छा जागृत होईल याने ………… शिवाय बांधावर बसून चहा अनुभवा ………………नाचणीच्या भाकरीवर कोलिमाच्या अजोड तोडीच्या चवीची अनुभूती घ्या …………लावणीच्या पारंपारिक गाण्यांचा बाज जरा घुमुडे कानात DJ च थिरकण ठेवा काहीवेळ बाजूला , संध्याकाळी भिजून आणि राबून आंबलेल्या अंगावर गरम गरम पाण्याची शेकत अंघोळ करा बघा थकवा कसा फटक्यात उडून जातोय…………. शहरातल्या "स्पा" च काय घेऊन बसलात या पुढे ………….आणि मग रात्री गरम गरम भातावर कालवण घेत जेवतांना कित्तेक दिवसांनी मन तृप्त होईल तुमचं आणि तुमच्या सोबतच्या माणसांचही कारण त्यांनाही कायिक दिवसांनी त्यांचा माणूस तृप्त जेवल्याच डोळे भरून पाहता येत ……………… तसहि भाकरीच्या शोधत गाव सोडलेल्या तुम्हा आम्हा चाकरमान्यांना या चार चवुत भाकरीची किमंत सांगण्याची गरज नाही. तिच्याच शोधत घर सोडून वणवण भटकताना मात्र घराकडं पाठ होणार नाही याच भान असलं पाहिजे . म्हणजे पुन्हा हे घर आपल्या आठवणींच्या धुक्यात धुसर होत जातं. आभाळ परत कधी निरभ्र होईल या प्रतीक्षेत.
© संतोष टाकळे .

Excellent .really feels fabulous. .
ReplyDeleteExcellent .really feels fabulous. .
ReplyDeleteधन्यवाद Ashish Mhapankar
ReplyDelete