राज्यस्तरीय स्तंभ विचार परिषदेच हे माझं पाहिलंच वर्ष .प्रियाने दोन चारदा बजावून सांगूनही मला उशीर झालाच अर्थात इथल्या धावत्या मुंबईतून थोडं बाहेर पडावं म्हटलं तर कायिक गोष्टी मार्गी लावाव्या लागतात . आधी पेडींग सगळं पूर्ण करा आपलं काम सहकाऱ्याच्या पदरात घाला त्याची इच्छा असो वा नसो …………… अगदी त्याच्या गळ्यात मारून कितीदा सुटावं लागतं . मग ऑफिसच्या लिफ्ट मधून खाली येता येता परत एकदा उजळणी घ्या काय बाकी राहिलंय का ? आता गाडी कितीची मिळेल ती कितीला पोचणार तिथून पुढं काय करायचं……… या विचारांची भेळ होत असतांना पोटातहि आग पडलेली असते आणि इतक्यात आठवतं गडबडीत चार्जर राहिला .आता पुन्हा वर जायचं म्हणजे अजून पुन्हा नवीन कामात अडकण्याचे चान्सेस जास्ती म्हणून मग सरळ पुन्हा स्टेशनच्या दिशेने निघावं म्हणीत सिंग्नल कॉर्स करावा तर पुन्हा प्रियाचा मेसेज कुठे आहेस कार्यक्रम सुरु होईल एक तासाभरात. इतका राग येतो स्वतःचा अशा वेळी आपण कधीच वेळेत पोहचत नसल्याचा संताप आवरता येत नाही . but work come first …………रस्त्यात पोटात भर म्हणून दोन बिस्किटाचे पुडे घेत एकदाची लोकल पडकून मार्गस्थ झाल्यावर खिडकीतून येणाऱ्या सुसाट हवेत अनेक जुने दिवस ताजे होतात कितीतरी गोष्टी नव्याने आठवतात आणि वाटत ते दिवस तसे जास्ती बरे होते . कुठेही कधीही जाता येत होतं. पण जगायला पैसेही लागतात या मताशी सहमत होतांना अंधुकसा कपाळावर ताण येतो . आणि पुन्हा नको ती चर्चा म्हणीत ब्यागेत टिपणं ठेवलेल पुस्तक काढीत त्यात डोकं खुपशीत नव्या विषयाकडे लक्ष वळवाव लागतं . अखेर तासाभरात पनवेलच्या फलाटावर गाडी लागते . घडाळ्यात उशीर झालेली वेळ पुन्हा पायात त्राण एकवटते आणि आता अजून ५- ६ किलोमीटरच्या अंतरकापीसाठी पुन्हा शोधा शोध ………………यात अर्धा तास मोडल्यावर एकदाची बस मिळते.कोकणातल्या ओळखीच्या रस्त्यावर लागेलेली बस जेंव्हा थांब्यावर उतरवते तेंव्हा पार काळोखात युसुफ मेहरअली सेंटरचा बोर्ड दिसल्यावर अक्षरश: एस फायनली म्हणीत धावत आत जाण्याच्या घाईत. अंधारात ठेचकळायला होतं तेंव्हा उजेडात पोहचण्याच महत्व आणि एकदा प्रकर्षाने जाणवतं .
स्तंभ विचार परिषदेचा कार्यक्रम कुठे आहे . इकडून आत जा आणि मग उजव्या हाताला वळा तिथे पुढे स्टेज आहे तिकडं चालू आहे तो पोग्राम - सेंटरचा कर्मचारी एका फटक्यात इतकं सांगून वळता होतो . त्याने सांगितलेल्या दिशेने साउंडच्या डेक वर ओळखीचा आवाज येत असतो . दोन चार परिचित नावं एका मोगोमाग मनात येतात आणि अगदी समोर पोहचल्यावर त्यातलं एक नाव तंतोतंत खरं निघतं प्रा. हरी नरके . मोजून १५ मिनिटे त्यांचा समारोपाचा मुद्धा कानावर पडतो ज्याचा तसाही काही संधर्भ लागत नाही कारण त्या आधीच तासभर मांडलेलं उडून गेलेलं असतं ………………जेष्ठ विचारवंत लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्या ताई बाळ , प्रा . हरी नरके सर , मुक्ता दाभोलकर ताई यांचा एक अख्खा परिसंवाद हातचा गेल्यान किल्मिष होते मनात पण तेव्हड्यात आता कवी संमेलन अशी घोषणा होत ८-९ कवी व्यासपीठाकडे जातांना दिसतात आणि मूड काहीसा चेंज होतो . एकापाठोपाठ एक असे कवी व्यक्त होतांना त्यातल्या काहींच्या ओळी वाहः व्हां अस आपसूक वदवून जातात तर काहीचं अरे संपली का कविता बरं वाजवूया टाळ्या अशा अनुशंगाच एकंदरीत पण प्रत्येकाचा प्रयत्न तसा प्रामाणिकच हो …………………पोटात मगाचची ची आग पुन्हा जाळ वाढवते आणि व्यासपीठाला अगदी लागून असलेल्या जेवणावळीच्या हालचालींचा वेध घेत मान अनेकदा तिकडे वळते ………….यादरम्यान कवी संमेलन संपल्याची घोषणा कानावर आली तेंव्हा वाटलं आयोजकांनी घ्या रे पानं लावायला असा हुकुम तत्काळ द्यावा कारण आता थांबणे शक्य नाही.
युसुफ मेहर अली सेंटरच अतिशय घरगुती पद्धतीचं जेवणाचा आस्वाद घेतांना अनुप जात्राटकर या युवा फिल्मेकर मित्राशी गप्पा झाल्या शॉर्ट, कॉर्पोरेट ,कमर्शियल आणि ट्रेंड्स फिल्मस संधर्भातल्या आणि इतर विस्तुत चर्चेत एक मुद्धा कॉमन आला आपल्या मराठी मुलांचं या क्षेत्रातलं काय स्थान, किती योगदान आणि कुठ नेमकं कमी पडतोय आपण असे अनेक चांगले मुद्धे यात समोर आले. आणि पुन्हा फिल्म स्क्रीनिंगची घोषणा झाली . पुन्हा सगळा काफिला व्यासपीठाकडे वळताना दिसला .मग लागलीच "स्मोकिंग झोन", "हुलड" आणि पुण्याच्या अक्षय इंदिलकर ने दाखवलेली इराणी फिल्म तर तुफान आवडली सगळ्यांना त्यावर अनेकांनी त्याची निरीक्षणं नोंदवली प्रत्येकाचा दृष्टीकोन किती निराळा कुणी वरवर तर कुणी किती खोलवर जात अनुभवतो याचा उलगडा पाहणं अचाट होत. या दिवसाचा समारोप अश्लेषा मॅम आणि त्यांच्या टीमच्या वहाण या अभिवाचनाने झाली . अनवाणी बाया ते कॅटवॉक करणाऱ्या वुमन्स असा प्रवास उलगडणारी हे अध्यामिक मार्मिक अंगाने व्यक्त होणारं अभिव्यक्ती वाचन निघता निघता तुमच्या तुमच्या वैचारिक वाहणा किती रुंद -अरुंद आहेत याचा विचार करायला लावणारं होत . आणि आता अनेकांना झोप आवरत नसल्याचं त्यांचे चेहरे स्पष्ट सांगत होते. अर्थात सगळ्यांनी काढता पाय घेत ज्यांची त्यांची ठिकाणं गाठली. एक- एका कुटीरात ५ जण अशी राहण्याची नीट सोय होती . पण आता इथेही अजून एक प्रश्न यात नाशिकचे सुनील सर सोडले तर बाकीचे सगळेच अनोळखी . १० -१५ मिनिटे थोडं अव्हघड्ल्यागत झालं पण नंतर तो जमाल -गुत्था जमलाय तो असा शब्दात सांगता येणार नाही . राहुल, पाटील सर ,माने , संदेश असा आमचा अनोळखी जणांचा मैत्रैय आणि नुसती धम्माल राहुलची शेरे बाजी त्यावर सुनील पाटील सरांचा अजून एक extra पंच …………कुटीराच्या भिंतीना या हसणाऱ्यांचे कुतूहल भेडसावत असावे बहुतेक इतका कल्ला तिनेही पहिल्यांदा अनुभवला असावा . या गोंधळात आमच्या कुटीरच्या अगदी समोर मोजून १० पावलांच्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या कुटीरच्या पडवीत मुंबईचे सकाळ वृत्तपत्राचे संपादक संजय आवटे सर आणि इतर साथीगण चर्चा करीत असल्याचं कळलं आणि आमचा कालवा शांत झाला . दुसऱ्या दिवशीच्या चर्चा सत्रांचा नियोजन , मांडणी आणि इतर गोष्टींवर ते मार्गदर्शन करीत होते . चक्क पायरीवर बसून ते one to one एकेकाशी बोलतांना पाहतांना फार ग्रेट फील झालं . एका संपादकाचा इतका informal वावर अधिक भावाला शिवाय समोरच्याचं सगळ ऐकून घेत मग त्यावर बोलतांना कुठेही त्याचा मुद्धा न खोड्तां हे असं केलं तर या optional पद्धतीनं त्याला मुख्य विषयाकडे आणण्याचा त्यांचा हातखंडा सॉलिड आवडला. पोर्नोग्राफी'वर खुली चर्चा उघड करा असं सांगताना त्यात सर हे इतकं उघड बोललं तर चालेल का ? या माझ्या प्रश्नावर त्याचं उत्तर होतं ……………अरे आपण अश्लील अंगाने हे मांडल तर चूक पण जर का हा मुद्धा म्हणून तू प्रामाणिकपणे मांडशील तर लोक ते नक्कीच स्वीकारतील. आणि काही अपवाद वगळता सगळ्यांनी हा विषय गांभीर्याने समजून घेतला हे विशेष .
हल्लीच्या लॉबिंगच्या जमान्यात इथ आलेल्या प्रत्येकाला समान संधी मिळावी म्हणून चाललेली संजय सरांची धडपडच या उपक्रमाचा मुख्य आधार स्तंभ आहे. अस म्हणायला हरकत नाही . संजय आवटे स्वतः बोल्ड विचारांचे आहेत जे नाही पटलं ते तोंडावर बोलणारे उग्गाच सो कॉल्ड डिप्लोमसीचा गोंडा फिरवीत लोकांना मिस गाईड करण्याऱ्यातली हि आसामी नाही यावर इथ आलेल्या प्रत्येकाचं एकमत होत आणि ते अगदी खरं असल्याचं या दोन दिवसात जाणवलंही .
दोन दिवसांच्या या आश्वासक समानधर्मी - उत्सवात अनेक गोष्टी शिकता आल्या . जमिनीवर राहूनही अपेक्षित उंची कशी गाठता येते याची उकल होण्याची किमान सुरवात झाली . आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतक्या भिन्न विभिन्न विचारांच्या माणसांना इतक्या गुण्या गोविंदाने एकत्र नांदतांना
………एकमेकांच्या मतांचा आदर करतांना पाहतांना भारावून जायला झालं . जाता जाता संजय सर आणि इथल्या सगळ्याच सहकाऱ्यांसोबत प्रियदर्शनी हिंगे या माझ्या सामानधर्मी मैत्रिणींचे मन:पूर्वक आभार मानायचेत तिनं पुढाकार घेतला नसता तर कदाचित इथ पोहचता आलं नसतं कारण अशा नवविचारांच्या शोधत निघालेल्या माझ्या सारख्या अनेकांना प्रवाहात घेणाऱ्या हातांची गरज आहे . नाहीतर आम्ही वर्षोन वर्ष प्रवाहाचा वेग पाहत काठावरच शिंतोडे झेलीत राहू या वाहत्या प्रवाहात टिकाव लागणार नाही या भीतीने .
© संतोष टाकळे .

No comments:
Post a Comment