
डॉ.दभोलकरांना मारणारी आणि कॉ.पानसरेंची हत्या करणारी विकृत माणस आपल्यातलीच आहेत.किंबहुना अनेकांना या बाबतची नेमकी माहिती असण्याची शक्यता आहे .यंत्रणा सफशेल अपयशी ठरतेय हे मान्य पण मग किमान ज्यांना यातला धागा दोरा माहित आहे त्यांनी पुढे येत गुन्हेगारांना पकडून देण्यात पुढाकार घेतला पाहिजे . मुळात हा विचारांचा खून आहे .हे असले उद्योग आपण सहन करीत गेलो तर अशा आतंकी लोकांच धैर्य अधिक वाढत जाईल.
नुसत्या तिथीला या विचारवंतच्या हत्येचा आक्रोश व्यक्त करीत त्यांच इव्हेंटीकरण घडवीत . मेंणबत्या पाजळीत फिरण्यात काय पॉइंट आहे . दाभोलकर गेल्यानंतर दोन वर्षात नेमकं काय विधायक काम आपण केलय याचा प्रसार व्ह्ययला हवाय ,किती वेळा सरकारला धारेवर धरित या तपासा संधर्भात जाब विचारलाय याच्या बद्दलचे अपडेट लोकांना दिले पाहिजेत , माणूस मारला की त्याचे विचारही मारले जातात ही अंधश्रद्धा खोडून काढली पाहिजे ,तथाकथित लोकांना लुबाडणाऱ्या ढोंगी बाबा -मातांना जेरबंद करण्यासाठी आपण आग्रही असल पाहिजे .माध्यमांना चर्चेचे गुराळ पुरवण्यात, फोटो क्यांप्शन स्टोरीज क्रिएट करण्यात आणि चला हवा येवूद्या च्या सेट वर भावनिक होत आपण जो माहोल तयार करतोय तो डॉ दाभोलकरांना कधीच अपेक्षित नव्हता .
सर तुमची प्रत्यक्षात कधीच भेट झाली नाही पण सतत तुम्ही तुमच्या लिखणातून भेटत राहिलात.
आज व्ययक्तिक आयुष्यात कर्मकांडाना नाही म्हणण्याच बळ तुमच्या मुळेच आलाय .
हीच काय ती तुम्हाला श्रधांजली............!
© संतोष टाकळे .
No comments:
Post a Comment