साहेब आंब्याची पेटी …………दारावर आलेल्या डिलिवर बॉय ने रसरशीत आंब्यांचे चित्र असलेला बॉक्स समोर धरला …………… पण आम्ही नाही मागवलेत ………. इतक्यात किचन मधून आवाज आला घ्या ती पेटी मीच ऑर्डर केलीय . ऑनलाईन शॉपिंग केलीय माझ्या नवीन क्रेडीट कार्ड ने ……… ३ हजाराचा बॉक्स चक्क २५०० ला मिळालाय. ………अग पण २५०० पण जास्तीच आहेत कि ……………तुम्ही ती पेटी आधी घ्या हो हिशोब कसला मांडताय ………. ऐकून चार सह्या केल्यावर आंबे माझ्या ताब्यात आले . वर ते डिलिवरी करणारं पोरगं म्हणालं सर एन्जॉय mango सिझन ……………… काय डोम्बल एन्जॉय करू अडीच हजाराचे आंबे ……………. एके काळी वृत्तपत्रात महिनाभर बातम्यांचा रतीब दिला कि तीन एक हजार मिळत तेही TDS चे १४० रुपये कापून ……………सरकारी नोकरी असलेली बायको असण्याचे फायदे पूर्वी ऐकले होते आज ते अनुभवता येतायत असे अनेक विचार मनात मोहरून येत असतानाच बाई पुन्हा उद्गारल्या अहो ऐकलत आज आमरस करू का हो ? केशर घालून …………….सोबत चार पुऱ्या करते खूप दिवस गोडाचा बेत नाही झालाय आज जमवतेच कशी ……………मी काय बोलणार त्या महागड्या रसरशीत आंब्यांचे चित्र असलेल्या बॉक्सकडे पाहत म्हटलं कर तुझी इच्छा असेल तर पण आधी आईला विचार फोन करून कस करावं नेमकं ती फर्मास बनवते आमरस …………स्मिता तुला आठवतय तू पहिल्यांदा आपल्या कोकणातल्या घरी आली होतीस तेंव्हा आईने आमरस पुरीचा घाट घातला होता . डीगीच्या माळवनातले आंबे उतरवले होते तेंव्हा त्यातल्या पिवळ्या धम्मक आंब्याचा रस काढून त्यात वेलची पूड आणि थोडसं जायफळ घालून केलेला तो आमरस आजही जिभेवर चव टिकवून आहे. तू केलेल्या खरपूस पुऱ्या पाहून आईन सून सुगरण मिळाली हो अस चार जणीत कवतुक मिरवलं होतं. मी पार एव्हाना कोकणातल्या चुलीकडल्या पडवीत पोहचलो होतो. आणि पुन्हा भानावर आलो ते स्मिताने कणिक भिजवायला समोर ठेवलेल्या परातीच्या खानकिणी आवाजान .
आई पुराण संपल असेल तर जरा एव्हड कणिक मळून द्या . तोवर मी मिसेस पाटीलना फोन करते त्यानी "mango pulp सामोसा" हि नवी रेसिपी इनोवेट केलीय संध्याकाळी चहासोबत करता येतील. ……………… साला एकदा लग्न झालं कि पुरुष माणसाच जगणं चूल मुल आणि जन्माची दिशाभूल असच रे बाबा . ……………तिकडे बाई टेरेस गार्डन च्या झुल्यावर झोका देत ……अय्या हो का ……. ह्म्म्म, ओह्ह्ह्ह्ह्ह्ह काय सांगताय काय ……… खरं आहे …………. हो ना …………. अहो म्हणून तर online मागवली पेटी . pure देवगडी हापूस आहेत हो म्हणजे त्यांनी तसं certificate दिलंय पेटी सोबत आणि ५०० रुपये discount मिळाला शिवाय फ्री home delivery……… . आणि हल्ली कोण जातंय बाजारात. काय ती गर्दी , उकाडा आणि तिथ जाऊन पण मेली बार्गेनिंग आलीच आणि हल्ली भय्ये हातोहात फसवतात हो . आमच्या ह्यांनी गेल्या वर्षी बाराशेला आणलेला हापूस नुसता आंबट ढांण होता . एक किलो साखर घातली तरी मेली चव आली नाही त्या आमरसाला ……………त्यांना साधे टोम्याटो निवडून आणता येत नाहीत ते आंबे आणणार म्हणजे पाटील वाहिनी तुम्ही कल्पनाच न केलेली बरी ह्हाहाहा ( बायकांना आपल्या नवऱ्याची अशी शोभा करतांना काय स्वर्गीय आनंद मिळतो कोण जाणे ) सो म्हणून आय order my mango this time online. बरं तुम्ही mango pulp सामोश्याची रेसिपी सांगतायना एक मिनिट हा ………………. अहो तो नोट प्याड आणि पेन घेऊन या ………. हम्म बोला हे घेतायत लिहून …साहित्य - मैदा २ वाट्या , साजूक तूप चार मोठे चमचे , आंब्याचा रस १ मोठी वाटी चवी पुरतं मीठ …………………. कृती - प्रथम मैदा ……………………………………. ओह thank you पाटील वाहिनी आज करतेच आणि कळवते कसे झाले होते. बरं ठेवू ………… ( बाई १ पाऊन तास झाला आवर आता ) माझ्या सारखे अनेक पुरुष लग्न झाल्यावर मनातल्या मनात बडबडण्याच्या रोगाला बळी पडतात. बाई पुन्हा ओरडल्या काय हो किती घाण अक्षरात लिहिलंय हे आणि चवी पुरतं पीठ नाही हो मीठ लिहायचं होतं सामोसे लालसर तळायचे असतात हो काळसर नाही हो कुणी केलं बुवा पत्रकार तुम्हाला त्यांची गाठ घालून द्याच एकदा ………….
२ एक तासांनी पान वाढलीयेत या आता आणि TV बंद करा आधी तो चोवीस तास त्याचं त्याच बातम्या डोकं गरगरत कस नाही तुमचं . तशी कितीही बडबड केली तरी स्मिताच्या हाताला चव आहे. पानात पुऱ्या आणि आमरसाची कठोकाठ भरलेली वाटी विशेष आकर्षण होती. मी सवयी प्रमाणे भाजी सोबत पुरी मोडली ………पुन्हा बाई पेटल्या अहो दोन तास खपून आमरस केलाय त्याचा घास घ्यायचा सोडून भाज्या कसल्या चाखताय . अगदीच कसे हो अरसिक तुम्ही तरी माझी मैत्रीण म्हणत होती. बातम्या देणारा नवरा नको करूस त्यांना फक्त शब्दात रस असतो. बाकी सगळचं अवांतर ………… तिची बडबड सुरूच होती. पण मला पुन्हा कोकणात चुलीकडच्या पडवीत जावसं वाटलं जिथे आई चुलीवर पुऱ्या करतेय . तळ गाठत आलेल्या आमरसाच्या टोपातला चमचा पुन्हा पुन्हा भरून माझ्या पानात वाढतीय. चागलं झालंय का रे घे ना अजून दोन पुऱ्या ……….रस टाकू अजून …………….पोट भर जेव रे ………तू येणार आहेस गावाला असा निरोप मिळाला आणि ह्यांनी आपला शेडी आंबा उतरवला ………बंडा अण्णा चढले होते झाडावर त्यांना जाताना चहापाण्याला दे तेव्हडे न विसरता . हल्ली ते येतात म्हणून कामं होतायत नाहीतर यांचा हात दुखावल्या पासून सगळंच अडलंय बाबा …………. उद्या फणसाची भाजी आणि कोकमाची कढी करू का रे आपल्या बरक्या फणसाच्या कुवऱ्याना भारी चव हाय. आता जेवलास कि पडवीत पड जरा उन्हातून फिरत बसू नकोस मग जा वाडीत संध्याकाळी ………… ताक करू घेशील ग्लास भर विरजण मोडून नवीन लावते आज. जेवून उठताना एक नजर आमरसाच्या टोपात उरलेल्या चमचाभर रासाकड गेल कि या किंचित रसात आई किती पुऱ्या मोडिल हा प्रश्न काळजात कुरकुरतो पण शेवटी तीच एक वाक्य अमाप सुख देत . तू पोटभर जेवलास ना माझा आत्मा तृप्त झाला बग …………………………अहो आमरस खाऊन झाला असेल तर उठा आता आणि ताट बेसिन मध्ये टाका सुवर्णा येईल इतक्यात तिचा खोळंबा नको तिला आपल्याकडे नेहमी लेट होतो म्हणून तिची कुरबुर चालू असते. मला अजून बरीच कामं पडलीयत संध्याकाळी "mango pulp सामोसा" करायचाय , सोसायटीच्या महिला मंडळाच्या पिकनिक संधर्भात मीटिंग आहे. आणि पार्लरची पण नेमकी आजचीच apportionment आहे . तुम्ही काय आता झोपा काढाल . बाईचा जन्मच मेला कामासाठी झालेला. आंब्याच्या सीझनमधली पहिली आंबापेटीचा फोटो टाका हो FB वर आणि मलाही tag करा माघाचच्या गडबडीत राहुन गेलं फोटो description मध्ये एन्जॉय mango सिझन लिहा.
© संतोष टाकळे