आकशवाणीच हे मुंबई केंद्र आहे आपण ऐकत अहात सकाळच्या बातम्या आणि ठळक घडामोडी पुढील प्रमाणे …………… भारताची अणु करार करण्यास अखेर तयारी ……………… राज्यात हंगामी रोजगार योजना लागू करणार - मंत्रीमंडळाचा एकमतान निर्णय मंजूर ,जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर आणि महाराष्ट्रभर थंडीचा तडका कायम पारा अधिक खाली जाण्याचा हवामान खात्याचा इशारा.……………. आता बातम्या विस्तारानं …………………गावात एकेकाळी दिवसाची सुरवात रेडियोवरच्या या बातम्यांनी होत असे माजघरातला जगाशी संपर्क ठेवणारा हा ट्रांजिस्टर रेडियो ग्रामीण जगण्यातला अविभाज्य घटक होता. पावसाळा असो वा हिवाळा मुंबई केंद्राने प्रसारित केलेल्या बातमी पत्रात हवामान खात्याचा अंदाज त्या काळी अचूक निघत असे ………बरेचदा पावसाळी शाळेत दांडी मारण्या करिता वेध शाळेचा अतिरुष्टीचा इशारा पुरेसा असे……….रेडियो संधर्भात अशा अनेक आठवणी आहेत .
आकाशवाणीच्या याच मुंबई केंद्रात एकदातरी जावं अशी खूप वर्षांची इच्छा आज पूर्ण झालीय . अस्मिता वाहिनीच्या "भेटीगाठी" या लोकप्रिय कार्यक्रमात अभय करंदीकर या मित्राने घेतलेली माझी "सोशल नेटवर्किंगच्या लाटेवरवरचा युथ " या विषयावरची मुलाखत आपण येत्या १९ मार्चला रात्री १० वाजता ऐकू शकाल . आपल्यापैकी बऱ्याच जणांचा यात संधर्भ येणार आहे. मुळात अभय ने विचारलेल्या काही क्लीन बोल्ड प्रश्नांना उत्तरं देताना आज कस लागला खरा सोबत तो काळ पुन्हा आठवणीत ताजा झाला. एकूणच धम्माल झालीये हि मुलाखत आपण नक्की ऐका आणि कळवा तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियाहि .
विशेष आभार - प्राजक्ता खेडेकर , अभय करंदीकर , आरती मॅम ,आणि तुम्ही सगळेच जिवलग मित्र.
© संतोष टाकळे

No comments:
Post a Comment