नहि रहा वो राज …………!



महाराष्ट्रात नांगी टाकणाऱ्या नेतृत्वात हि एकमेव असामी आहे . पण सध्या ते फक्त बोलतात करीत काहीच नाही हा समज सर्व सामान्य माणसात पसरत चाललाय शिवाय आज मनसे कार्यकर्ते देखील त्यांच्या अशा वागण्याने नाराज आहेत . तोड फोड झालीच पाहिजे हे गरजेचं नाही पण आंदोलन तडीस नेण्यासाठी तो टेम्पो टिकून राहिला पाहिजे अन्यथा बंद म्हणजे बंद अशी कडक हाक मारूनही कुणी धूप घालणार नाही . आज ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत त्यात ते या पुढे आपसूकच अडकत जातील . याची जबाबदारी घेणार कोण ? .

मुळात आम्ही सगळेच या महाराष्ट्राचा आणि पर्यायी देशाचा सर्वांगीण विकास या मूळ मुद्यावर कुणाचीही सोबत द्यायला तयार आहोत. पण सर्वसामान्यांना वेठीस धरून आल्या दिवस हरएक राजकीय पक्ष अशी आंदोलन करणार असतील तर आम्ही नेमकं करावं काय ? ……… तोडल्या येस्ट्या- फोडली दुकानं - जाळंला टोल आम्ही हा लाहिव तमाशा २४*७ चालणाऱ्या वृत्त वाहिन्यांवर बघत राहतो. दिवसभराच्या या घटनेवर आधारित मनोरंजक महाचर्चा देखील आम्ही चवीनं पाहतो. दिवस संपतो आणि पुन्हा नवीन काहीतरी सुरु होतं किमान आता तरी हे थांबायला हवंय …… सध्या मार्केट टाईट आहे . रोजगाराचा प्रश्न तसाही यक्ष खडा आहे . रोज किमान दोन -चार बलात्काराच्या बातम्या ठरलेल्याच. खड्यातले रस्ते - हंडा भर पाण्यासाठीची राडारड -बिलाच्या आकड्याने झटका देणारी महागडी वीज , दलालांच्या बोलीत अडकलेला शेतकरी , सरकारी कार्यालात वाढलेलं चहा पाण्याचं प्रमाण , बाजारू शिक्षण -खालावलेलं आरोग्य या आणि अशा अनेक इतर सोयी सुविधा आणि व्यवस्थेची बोंब आहेच . पण तरीही राज यांचा फक्त टोल आणि झोल मधला इंटरेस्ट खटकणारा आहे . एक हाती सत्ता माझ्याकडे द्या बघा मी एक ऐकाला वठणीवर आणतो म्हणणाऱ्या ठाकरेंना त्यांच्या पदाधीकाऱ्याना दावणीला बांधता आलं नाही .नाशिकच्या निमित्ताने करून दाखवलं म्हणता येणारी संधी त्यांनी सफ़शेल गमावली. या टीम ने काय होत नाही मग दुसरी टीम तयार आहे अस म्हणायची वेळ साहेबांच्या शिलेदारांनीच आणली हे खरं आहे ना ?

तसही राजकीय गणित नेमकी कशी आणि कोण सोडवेल याचा नेम नाही पण सर्वसामान्य नागरिक यात भरडला जातोय त्याचं काय ? बरं यावर उपाय म्हणून आम्ही आम आदमी नामक झाडू बाजारात आणला तर तोही भलत्याचच झाडण्यात गुंतला आहे . अण्णा जी & जगप्रसिद्ध आंदोलनकार केजरीवाल दिल्लीकर यांनी जनतेला जे नारळ वाटलेत त्या रोषाने आम्ही निवणुकीच्या रिंगणात उतरतो म्हटलं तर लोक आता आम्हाला दारात उभ करणार नाहीत सगळी कडून आमची फसवणूक होतीये राव . बाकी तुमचं चालू राहूद्या जय हो !

© संतोष टाकळे

No comments:

Post a Comment