हार्ट ऑफ द सिटी - पुणे..........!



पुण्यात जायला काही निमीत्त लागत नाही. पुणं तसही माझं फेवरेट destination ………….पण हि ट्रीप लक्षात राहिली ती मंगला भोईर या फेसबुक मैत्रिणीच्या भेटीनं. माझ्या आईच्या वयाच्या या अवलिया मैत्रिणीशी गप्पा रंगल्या आणि ३ तास उलटून गेले तरी आवरत घेता येईना. खूप दिवसांनी गप्पांचा फड रंगला होता.त्या बद्दल थोडसं …………….

पुण्यातल्या हार्ट ऑफ द सिटी अर्थात टिळक रोड वरच्या मंगला ताईंच्या गार्डन टेरेसच्या फ्लाट (flat ) चा शोध मी आणि सुपेकर ( पुणेकरी मित्र ) घेत असतांना पुणेकर दत्त म्हणून धावून आले आणि एकदाचं ते ठिकाण सापडलं …………… लिफ्ट नसलेल्या ५ मजली इमारतीचे जिने चढताना चांगलीच धाप लागली . दारावर मंगला भोईर ची पाटी दिसली आणि एस घावलं बाबा एकदानी सुपेकरची लातुरी प्रतिक्रिया अगदी माझ्या कोकणी प्रतिक्रियेशी मिळती जुळती अशीच …………… ताईनी स्वतः दार उघडत स्वागत केल . घर अत्यंत नेटकं मुला माणसांनी भरलेलं आणि महत्वाचं म्हणजे उत्साही - आनंदी …………… अवनी आणि नील या ताईच्या नातवांशी लगेच गट्टी जमली . ताईंच्या नेव्ही ऑफिसर मुलानेहि अगत्य दाखवत विचारपूस केली …………. राजकीय- सामाजिक -फेसबुकिंग आणि इतर विषयावर महाचर्चा सुरु असतानाच पुण्यातली प्रसिद्ध खमंग कचोरी तितकीच क्लास तिच्या सोबतची आंबट गोड चटणी , मंगला ताईंनी स्वतः बनवलेला उत्तम शिरा यांच्या गच्च भरलेल्या प्लेट समोर येऊन धडकल्या आणि इतकं सगळं आवरतय इतक्यात मंगला ताईंच्या मानस कन्या संगीता ताई यांनी फक्कड बनविलेला एकच नंबरचा वाफळता चहा आलाच ………अहा संध्याकाळ मावळून काळीशार झालेली असतानाच हि सुखद वेळ सरूच नये अस आज कइक वर्षांनी वाटत होतं. मन गुतलं होतं इथल्या माणसांत हिरव्यागार फुला- झाडात. मंद गंधाळनाऱ्या रातराणीत शिवाय टेरेस गार्डनच्या झोपाळ्यावर झोका देत राहावं अजून काहीवेळ ………आपलंसं करणाऱ्या या माहोलात मंगला ताईंनी उलगडलेला त्यांचा जीवनपट झरझर डोळ्यासमोरून ओझरता सरला आणि पहिल्याच भेटीत ताईंनी दाखवलेला मोकळेपणा अधिक मनाला भावाला …………पण शेवटी येणारी वेळ जाण्यासाठीच येत असते . इच्छा नसतानाही त्यांचा निरोप घेणं अपरिहार्य होतं . निघतांना ताईनी दिलेला गुलकंद गुलाब आणि रातराणीच्या टपोऱ्या फुलांचा झुबका स्वीकारतांना त्या फेसबुक बनवणाऱ्या mark zuckerberg ची प्रकर्षाने आठवण झाली .त्याचे कित्ती आभार मानावे तितके थोडेच FB निव्वळ time pass साठी बनवलेल्या या नेट चक्रात मला भेटलेली अशी अनेक अव्वल माणसं priceless म्हणावी लागतील.

दरम्यान अमोल सुपेकर या लातूरकर मित्राने आणि त्याच्या मंगेश कुलकर्णी , सचिन , आणि इतर ग्रुपने रंगवलेला वीक इंड आणि एकंदरीत केलेला पाहुणचार , घनश्याम सर -हेमांगी दी आणि प्रिया हिंगे बाईची चुकलेली भेट. PMT या अतिशय टुकार public transport ने केलेला प्रवास . पत्ता शोधताना भेटलेले काही विक्षिप्त पुणेकर या सगळ्या गोड तिखट आठवणी pack करून शिवनेरी पकडली आणि पुणं सोडलं ते पुन्हा कधी करू प्लान याचा झोल मांडत असतानाच ………………. express वे चा टोल कधी सरला कोण जाणे जाग आली ती दादर लास्ट stop अशा धमकी वजा सूचनात्मक अलर्ट देणाऱ्या शिवनेरीच्या चालकाच्या आरोळीने ………. ! 

@ संतोष

No comments:

Post a Comment