८७ व्या साहित्य संमेलनाच्या समारोपाच सर्वपक्षीय "सूप " राजकीय नेते आणी स्थानिक पुढारी पाखडीत असतांनाच . आमचे साहेबही साहित्यिकच आहेत अशी घोषणा करीत . एका जेष्ठ पुढारी बाईंनी जमलेल्या सगळ्याच शब्द रसिकांना गोंधळात टाकल . व्यासपीठावर हे जाहीर करताच साहित्य म्हणजे काय रे भाऊ असा संभ्रम असलेल्या कार्यकर्त्यांनी मात्र जोरदार टाळ्या पिटल्या आणी लगेच साहेबांशेजारी बसलेल्या माधवी आजींनी साहेबांच्या कानात पुटपुटत असतांनाची पोझ देत वृत्तपात्रांच्या फोटोग्राफरना उद्याच्या अंकाच्या फ्रंट पेज फोटोची व्यवस्था केली . आम्ही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नाही तर साहित्य प्रेमी म्हणून इथे आलोय अस म्हणणारे आदरणीय पाहुणे माईक मिळताच मी सांस्कृतिक मंत्री असतना……… हा निर्णय घेतला मी अमुक केलं आणी तमुक करीन ह्या घोषणा करायला मात्र विसरले नाहीत पत्रकार कक्षातून याची डोळा हे पाहतांना अतिव कीव येत होती. पण तसही आपण "आम " वाले फक्त बोलघेवडे आहोत हे तर आता सिद्धच झालंय .
संमेलनाबद्दल सविस्तर लेख लवकरच …………. !
संमेलनाबद्दल सविस्तर लेख लवकरच …………. !
© संतोष टाकळे

No comments:
Post a Comment