गिरणगाव रोजगार हक्क समितीचं कार्यालय एक दाढी वाला माणूस दत्ता ( गिरणी कामगार नेते - दत्ता इस्वलकर ) सरांशी बोलत बसलेला ……………त्याचा आवाज एव्हडा कि आम्ही जिन्यात असतानाही तो स्पष्ट ऐकू येत होता .आम्ही तेंव्हा गिरणगावात सर्वे करून पुन्हा ऑफिसात परतत होतो . योगिता ,ज्योती , रोशनी , पराग , आणि मी अशी आमची टीम तेंव्हा गिरणगाव रोजगार हक्क समितीच्या कामात पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करत असू ………………दत्ता हे बरोबर नाही अरे अशाने हा लढा इथेच संपेल वैगरे वैगरे तावातावात तो माणूस हातवारे करीत इस्वलकर सरांशी बोलतांना बघून आम्ही कार्यालयाच्या दारापाशीच थांबलो . तब्बल १ तास हा माणूस सखोल विश्लेषण करीत बोलत होता . आम्ही सर्वेत नोंद केलेले अनेक मुद्धे त्यांच्या बोलण्यात येत होते . ज्या survey analysis ला आम्हाला किमान ५ ते ६ दिवस लागले असते ते या माणसाने एका तासात फिल्टर करून विस्तृत मांडले आणि लक्षात आल हि असामी साध काम दिसत नाहीये ………….एव्हाना आम्ही खूप वेळ बाहेर उभ असल्याचं दत्ता सर आणि त्या असामी पाहुण्यांच्या लक्षात आल असावं आणि आतून आवाज आला अरे आत या रे पोरांनो बाहेर कशाला थांबलाय ……………आणि मग एक एक करून सगळ्यांशी ओळख झाली . तेंव्हा कळल हि असामी म्हणजे पत्रकार निखिल वागळे ……………अगदी down to earth व्यक्तिमत्व प्रचंड अभ्यासू ………….सडेतोड वैगरे वैगरे …………तेव्हा ते महानगर चे संपादक होते ……………पुढे ते अनेक कार्यक्रमात भेटत राहिले आणि तेंव्हा ते आवर्जून ओळख देत……………हि आपल्या दत्ताची पोरं गिरणी कामगारांच्या लढ्यात हि सगळी तळमळीन काम करतायत अशी तारीफ करीत ते अनेक नव्या लोकांशी आमची गाठ घालून देत आणि मग आमचाही उत्साह दोन हात अधिक वाढे.
पुढे त्यांचा "आमने - सामने" हा TV शो आला. आणि निखिल वागळे महानगरच्या डेली पेजच्या ज्वलंत संपादकाच्या फ्रेम मधून बाहेर पडत थेट स्मॉल स्क्रीन वरचे तुफान anchor म्हणून प्रसिद्ध झाले . त्यांच्या या शो मध्ये यायला राजकीय नेते अनेकदा तयार नसत . कारण वागळे आयत्या वेळी काय विचारतील याचा नेम नव्हता . कितीदा बहुचर्चित नेत्यांनी वागळेना हा प्रश्न विचारू नका म्हणून गळ घातल्याचं आम्ही स्वतः पाहिलंय ……………इतका गाढा अभ्यास …………अचूक चकवा चकवी …………अलगत जाळ्यात अडकवण यात वागळेंचा हातखंडा होता आणि आजही तो टिकून आहे. काही दिवसांनी हा शो बंद पडला आणि वागळे पुन्हा महानगरकडे वळले पण इथेही पुन्हा नवा twist आला आणि वागळेना "IBN -लोकमत " च्या संपादक पदाची ऑफर आली . अर्थात ती त्यांनी लगेच स्वीकारली नाही त्यातही अनेक घडामोडी घडल्या आणि शेवट अखेर त्यांनी "IBN -लोकमत " च संपादक पद स्वीकारलं …………… पुन्हा वागळे स्क्रीनवर आले आणि त्यांनी पुन्हा नव्याने धडाका सुरु केला . "आजचा सवाल "ने तर प्राईम टाइम चा आजवरचा रेकॉर्ड मोडला . महाराष्ट्रातल्या घराघरात वागळेना लोकांनी डोक्यावर घेतलं ……………"आजचा सवाल" ची वेळ झाली कि लोक लोकमत लाव आता वागळे येतील म्हणत tv समोर ठाण मांडून बसत ……………भल्या भल्यांना हा माणूस चितगार करी याचं काय अप्रूप असे लोकांना एक सच्चा पत्रकार म्हणून देखील "निखिल वागळे" हे नाव लोकांच्या मनात घट्ट झालं . मी पत्रकारिता केलीय अस कुणाला कळल तर लोक विचारीत त्या वागळेना कधी भेटलाय का तू …………नसशील भेटलास तर भेट ……………शिक काही तरी त्यांच्याकडून ………………असा सल्ला ऐकताना खूपच भारी वाटायचं तेव्हा …………………
अन नेहमीप्रमाणे IBN - लोकमतच यशहि फार काळ टिकलं नाही . अखेर वागळे बाहेर झाले आणि "IBN -लोकमत " चा TRP घसरला वागळे पुन्हा या वाहिनीवर येणार नाहीत यावर अनेकांचा विश्वास बसेना . इतकं जबरदस्त गारुड या माणसाने प्रेक्षकांच्या नजरेवर घातलं होतं हे अधोरेखित करण्यासारखं आहे . पण प्रसिद्धीची चमक कायम राहण्यासाठी visibility च ताईद सतत गळ्यात असावं लागतं. आणि IBN -लोकमत सुटल्यापासून काहीदिवस वागळे पडद्याआड गेले . इथ आजच्या ब्रेकिंग उद्या विसरणारे लोक कुणा कुणाला लक्षात ठेवणार . अर्थात वागळेंच तेच झालं .काही दिवसांनी ते "मी मराठी" या नव्या वृत्तवाहिनीवर दिसल्याचं कुणा कुणा कडून कळल तेंव्हा लोकांनी पुन्हा या नव्या channel चा शोध घेत वागळेना पुन्हा एकदा TRP बहाल केला . जो आजही काही प्रमाणत वर खाली होतो आहे .
आज वागळेंन बद्दल लिहण्याच निमित्त म्हणजे सध्या ते सोशल मिडीयावर जे तथाकथित प्रक्षोभक लिहितायत त्यांमुळे ते अधिक negative शेड मध्ये गुंतत जाता आहेत . आणि त्यांच्या या नव्या इनिंगमुळे त्यांची खरी इमेज अधिक पुसट होते आहे . मान्य आहे वागळे जरा अधिक भडक शब्दात आणि संकुचित मानसिकतेत व्यक्त होतायत म्हणून त्यांच्यातल्या आजवरच्या अनुभवी आणिक अभ्यासू पत्रकाराच्या प्रतिभेला इतक्या खालच्या भाषेत टीका टिपणी करण्याची सध्याच्या नवोदित नवविचारवंताची आणि स्वयं घोषित समाजसुधारकांची लायकी नाही . हे वायफळ बडबड करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि आधी अभ्यासाला सुरवात करावी मुळात विषय समजून घ्यावा त्यावर सखोल माहिती गोळा करावी मग त्याचं विश्लेषण करावं थोडा अनुभव गाठीशी जमवावा आणि मग तोंड उघडावं .
कारण पत्रकारिता हि काही मानद पदवी नाही त्यासाठी प्रचंड मोठी मेहनत आहे . स्वतःची ओळख निर्माण करणं तुम्हाला वाटत तेव्हड सोप्पं काम नाही . शब्दांची किमया प्रत्येकालाच जमते अस नाही . आम्हा पत्रकारांना पत्रकारितेची डिग्री घेतांना जी प्रतीज्ञा दिली जाते ( दिली जात असे ) त्यात म्हटलंय - .
"समाजातल्या हरएक अन्याया विरोधात मी माझ्या लेखणीतून प्रखर विरोध करीन" .
"लोकांना न्याय देण्यासाठी मी कायम प्रामाणिक पत्रकारिता करीन "
" मी माझ्या पेशाचा कधीही गैरवापर करणार नाही ."
"या पदवीचा सन्मान ठेवण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे ."
वागळे सरांना हि प्रतीज्ञा ज्ञात असेल यात शंकाच नाही . पण' निखिल वागळे' नावाचं वादळ काहीसं भरकटतय हे मात्र खरय …………………
© संतोष टाकळे

No comments:
Post a Comment